मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा| विकल्पाचा पाडाव प्रसंग सतरावा सद्गुरु व पीर सारखेच द्वैताद्वैत जाणतपण-नेणतपण गारेचा दृष्टांत संग्रामारंभीं सद्गुरुचा निरोप देहसंग्रामास प्रयाण योगसंग्राम सरस्वतीस नमन शेख महंमदाची विनवणी अज्ञानतिमिराचा नाश-आगमन ब्रह्या (चक्रा) ची भेट विष्णू (चक्रा) ची भेट शिवा (चक्रा) ची भेट स्वाधिष्ठान चक्रीं निवास अष्टदळ-झडती स्वारीची तयारी अहंकाराशी भांडण विकल्पाचा पाडाव संकल्पाचा पाडाव अहंकाराचा पाडाव अहंकार मारल्यानें सर्वत्र आकांत अंगमोड्याचा पाडाव दीपाचा पाडाव स्वार्थ संताप सत्ता यांचा विलाप संताप आळस आपापल्या पुरुषार्थाच्या वल्गना अहंकाराचा प्रभाव संतापदमनार्थ मुक्ती रिद्धिसिद्धीचीं कुमक संतापाचा पाडाव संग्राम करतो तोच योगेश्र्वरराणा अहंकाराच्या स्त्रियांबहिणींचा विलाप अहंकाराच्या स्त्रिया सती जातात मन तेजियास थोडी विश्रांति प्रसंग समाप्ति प्रसंग सतरावा - विकल्पाचा पाडाव श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत विकल्पाचा पाडाव Translation - भाषांतर विकल्पें येऊनि आत्म्यापाशीं । म्हणे राया माता परियेसी । अहंकार म्हणे तुम्हांसी । संवदळी भांडो ॥१०२॥श्रवणी इतुकी बोलतां बोली । आत्मा राऊतें कमान वाइली । कटी मस्तकीं विंधिली । विकल्पाचे ॥१०३॥विकल्प पाडिला धरणी । स्फुरण चढलें आत्म्यालागुनी । म्हणे यश आलें पहिलेंच भांडणीं । सद्गुरुप्रसादें ॥१०४॥आत्मा ब्रह्मानंदे वोसंडला । तेजियातें मैदान दाखवूं लागला । तेजीहि बळें थरकों लागला । ठायीचें ठायीं ॥१०५॥पश्र्चिम दिशे ऐकले अहंकारें । कटक गजबजलें महा मारें । तें सांगेन ऐका उत्तरें । श्रोते हो तुम्ही ॥१०६॥अहंकाराचा कटक मेळा । एकाहून एक वीर आगळा । तो सांगेन ऐका निर्वाळा । बयाजवार परियेसा ॥१०७॥ओळखा पांचाचें पंचविस गुण । लिंगदेहाचे पंचविस जाण । ऐसे हे पन्नास मेळऊन । तोंडावरी दिधले ॥१०८॥मागें पाठीवरी अहंकार । पुढें चाले सकळ परिवार । ठायीं ठायीं तोलतील भार । संग्रामालागुनियां ॥१०९॥फार जळ आटल्याउपरि । जळचरें आकांतती परोपरी । तैसें अहंकाराचें कटक करी । चळबळ अविचारे ॥११०॥कटक सांवरून अहंकारानें । दिधली अविश्र्वासाची पानें संकल्पासी बोलाऊनि अभिमानें । विडा दिधला ॥१११॥अहंकार म्हणे रे संकल्पा । तुवां पुढें झिज लावावी रे बापा । मागुनी माझिया दापा । कटक फुटों न शके ॥११२॥संकल्प म्हणे जी अहंकारा । विकल्प माझा धारा । तो मारीला श्रेष्ठ मोहरा । आतां मी उणा पडलों असे ॥११३॥येथून आतां अपेशाचें मूळ । मज दिसतें गा प्रबळ । आत्मा राउत जाला सबळ । मन तेजी फिरवूनियां ॥११४॥मन विकल्प होते श्रेष्ठ राउ । ते जेधवां केलें पाडाउ । तेधवांच खुंटला उपाउ । पुरुषार्थ भांडणाचा ॥११५॥अहंकार बोले संकल्पाप्रती । म्यां गड राव जिंतिले असंख्याती । सिद्ध साधक मज भेणें कांपतीं । सूड घेईन तुझ्या बंधूचा ॥११६॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP