मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा|
अंगमोड्याचा पाडाव

प्रसंग सतरावा - अंगमोड्याचा पाडाव

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


अंगमोडा व्यापी शरीर । म्‍हणे मी अहंकाराचा शिलेदार । एकला एकांग वीर । कोणासहि नाटोपे ॥१३६॥
आम्‍ही आळसाचे बंधु धारे । ब्रह्मादिक केले पाठमोरे । तेथें आत्‍मा काय बिचारें । तोंड दावूं शके ॥१३७॥
आत्‍म्‍यानें मारिलें अहंकारा । आश्र्चय्र जाले गा सर्वेश्र्वरा । आतां व्याकुळ करूनि शरीरा । आत्‍म्‍यातें जिंतीन ॥१३८॥
जेव्हां संचरे अंगमोडा बरवंट । तेव्हां सकळ शरीराची करी मोट । मग सकळ चेतनेचा येतसे वीट । हा पुरुषार्थ माझा ॥१३९॥
मग कसुनी सोडिली काठी । वोंविली अंगमोड्याची सुटी । बहु करित होतासी तोंडपिटी । स्‍वयें आत्‍मनाथ म्‍हणे ॥१४०॥
पडतांचि अंगमोडा वीर । मागून दीपास चढली शीर । म्‍हणे म्‍यां सितरले सुर नर । तुज वेळ लागों नेदीं ॥१४१॥

N/A


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.