मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा| संताप आळस प्रसंग सतरावा सद्गुरु व पीर सारखेच द्वैताद्वैत जाणतपण-नेणतपण गारेचा दृष्टांत संग्रामारंभीं सद्गुरुचा निरोप देहसंग्रामास प्रयाण योगसंग्राम सरस्वतीस नमन शेख महंमदाची विनवणी अज्ञानतिमिराचा नाश-आगमन ब्रह्या (चक्रा) ची भेट विष्णू (चक्रा) ची भेट शिवा (चक्रा) ची भेट स्वाधिष्ठान चक्रीं निवास अष्टदळ-झडती स्वारीची तयारी अहंकाराशी भांडण विकल्पाचा पाडाव संकल्पाचा पाडाव अहंकाराचा पाडाव अहंकार मारल्यानें सर्वत्र आकांत अंगमोड्याचा पाडाव दीपाचा पाडाव स्वार्थ संताप सत्ता यांचा विलाप संताप आळस आपापल्या पुरुषार्थाच्या वल्गना अहंकाराचा प्रभाव संतापदमनार्थ मुक्ती रिद्धिसिद्धीचीं कुमक संतापाचा पाडाव संग्राम करतो तोच योगेश्र्वरराणा अहंकाराच्या स्त्रियांबहिणींचा विलाप अहंकाराच्या स्त्रिया सती जातात मन तेजियास थोडी विश्रांति प्रसंग समाप्ति प्रसंग सतरावा - संताप आळस श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत संताप आळस गुणावगुण भांडणास सिद्ध Translation - भाषांतर संताप तेव्हां भोंवते पाहे । म्हणे मज पाठीराखा कोण आहे । आळस म्हणे आलों पुढें पाहे । जांभई आरोळी दिधली ॥१५४॥संताप म्हणे आळसराया । तुजसारिखा असतां मज साह्या । आत्मा येऊं न शके आमुच्या घाया । आतां पाडाव करीन ॥१५५॥मग आळसें तुबक घेतली शिंक । भीतरी दारू भरली भूक । रंजक चेतविली ते गोळा दुःख । भडिमार केला ॥१५६॥मग अविचाराचा धूर । अविवेक कुटुंब दाटला चौफेर । पडला गुर्मीचा अंधःकार । उमज नाहीं कटकासी ॥१५७॥संताप म्हणे रे आळसा । आतां आत्म्यास करूं वळसा । मग भांडण येऊं दिधल्या कळसा । मग आत्म्यास ठाव नाहीं ॥१५८॥मग पातले गुण अवगुण । म्हणती आत्म्यास करूं भांडण । तुम्ही पाठ राखावी संपूर्ण । आळसा संतापा ॥१५९॥गुण अवगुण पुरुषार्थें । बोलती आपुलाली मतें । सांवरूनि भांडण मागुतें । देऊं म्हणताती ॥१६०॥आपुल्या पुरुषार्थाची वाणी । सांगती एकमेकांलागुनी । ते ऐकावें श्रोतेजनीं । प्रश्र्निकपणें ॥१६१॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP