मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|संतचरित्रे| राका कुंभार संतचरित्रे कबीर कमाल मिराबाई भानुदास जगमित्न नागा संताजी पवार बोधलेबावा जनजसवंत जनाबाई गोरोबा कुंभार राका कुंभार नरसी मेहता चोखामेळा संतचरित्रे - राका कुंभार संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevअभंगनामदेव राका कुंभार Translation - भाषांतर कुंभार तो राक कांता त्याची बंका । कन्या नाम रंका तिघे जण ॥१॥पंढरीक्षेत्रांत राहतां आनंदें । वाचे गोविंद आळविती ॥२॥करिती आपुला स्वकर्म व्यवहार । वाचे निरंतर रामनाम ॥३॥घडोनि भाजणें ठेविली घरांत । व्याली डेरियांत मांजर ते ॥४॥न देखितां त्यानें आवा तो रचिला । अग्नि तो लाविला तेचि वेळां ॥५॥फिरूनि मांजर घरासि ते आली । नाहींत तीं पिल्लीं डेरा तोही ॥६॥आव्यापाशीं तेव्हां आली ती धांवत । ओरडत फिरत भउताली ॥७॥पाहूनि राका समजला मनीं । आहा चक्रपाणी काय केलें ॥८॥जळो जळो माझा प्रपंच व्यवहार । नाहीं म्यां विचार केला देवा ॥९॥करावया गेलों प्रपंचाचें हित । पापाचे पर्वत झाले माथां ॥१०॥अज्ञान हीं बाळें जळतील आतां । धांव पंढरीनाथा येचि वेळां ॥११॥पांडव ते रक्षिले लाक्षातें जोहरी । तैसी करी परि पिल्लियांसी ॥१२॥आगीमाजी तुवां प्रल्हाद रक्षिला । अगाध हें तुला काय झालें ॥१३॥रक्षीं यासी आतां येऊनियां अंगें । घेईन वैराग्य नवस हाचि ॥१४॥तिघांजईं तेव्हां त्यजिलें अन्नपाणी । धांव चक्रपाणी लवलाहीं ॥१५॥तीन रोज झाले शांत झाला अग्नि । पाहाती उकलूनि आवा तेव्हां ॥१६॥सर्वस्व भाजणें भाभूनियां गेलीं । खेळताती पिल्लीं डेरियांत ॥१७॥कच्च असे डेरा नसे आंच त्याला । माझें नवसास पावला पांडुरंग ॥१८॥पाहती सकळ पंढरीचे लोक । अगाध कवतुक देवाजीचे ॥१९॥आनंदोनी राका बोलवी ब्राम्हण । दिलें तें लुटून घर तेव्हां ॥२०॥वेंचूनियां चिंध्या लाविती ढुंगासी । भावें ह्रषिकेशी आळविती ॥२१॥जाऊनियां वनीं वेंचिताती काष्ठें । उदरापुरतें विकिताती ॥२२॥अखंड करिती नामाचा गजर । ध्यानीं मनीं वर रखुबाईचा ॥२३॥बंका गेली असे चंद्रभागे स्नाना । नामयाचि कन्या धुया आली ॥२४॥बंका बोले बाई सिंतोडे येतील । ऐकूनियां बोले येरी तिसी ॥२५॥जातीची कुंभार कामीक वैराग्य । घेतलेंसे सोंग कासीयासी ॥२६॥ऐकूनियां बंका करीत उत्तर । बौद्ध अवतार पांडुरंग ॥२७॥रडका हा नामा घॆतलीसे आळी । त्यानें वनमाळी बोलविला ॥२८॥अबोल हा देव बोलविला यानें । काय थोरपण आलें यासी ॥२९॥वाढविली कीर्ति जगांत डांगोरा । बोलविला खरा पांडुरंग ॥३०॥चंद्रभागे तीरीं झाला वृत्तांत । श्रुत झाली मात नामयासी ॥३१॥नामदेव तेव्हां आले राउळासी । विनंति देवासी करुनी बोले ॥३२॥राकाकुंभारानें घेतलेंसे वैराग्य । कांहो केला त्याग संसारींचा ॥३३॥बोले पांडुरंग निष्काम हे भक्ती । दावितों प्रचिती तुजलागी ॥३४॥विठ्ठल रखुमाई नामा असे संगें । आलीं तेव्हां तिघें बनाप्राती ॥३५॥रुक्मिणीनें तेव्हां काढुनी कंकण । ठेविलें झांकून काष्ठामाजी ॥३६॥राका बंका वंका वेंचिताती काष्ठ । आली अव्चित तया ठायां ॥३७॥उचलितां काष्ठ देखिलें कंकण । दिलें तें ढाकून तेचि वेळां ॥३८॥म्हणती याजलागीं विटाळ जाहला । न घेती तयाला म्हणोनियां ॥३९॥पाहुनी रुक्मिणी विस्मय करीत । निष्काम हे भक्त देखीयेले ॥४०॥बोले रखुमबाई अहो पांडुरंगा । भेटावें श्रीरंगा याज लागीं ॥४१॥नामा म्हणे देवा वंदितों मी चरण । धरा आलिंगून तिघांजणा ॥४२॥होती हे आवडी देवाजीचे चित्तीं । आलिंगिलीं प्रीतीं तिघेजण ॥४३॥राका बंका वंदिती चरण । कांहो येणें केलें देवराया ॥४४॥उष्णकाळ दिन श्रमली माझी आई । बैसा रसुमाबाई छायेखालीं ॥४५॥ऐसी असे ज्याची देवावरी माया । करी त्यासी दया पांडुरंग ॥४६॥नामदेव बोले त्यचा मी हा दास । शरण तयास वारंवार ॥४७॥ N/A References : N/A Last Updated : January 14, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP