मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|संतचरित्रे| जगमित्न नागा संतचरित्रे कबीर कमाल मिराबाई भानुदास जगमित्न नागा संताजी पवार बोधलेबावा जनजसवंत जनाबाई गोरोबा कुंभार राका कुंभार नरसी मेहता चोखामेळा संतचरित्रे - जगमित्न नागा संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevअभंगनामदेव जगमित्न नागा Translation - भाषांतर परळी वैजनाथीं जगमित्र नागा । ध्यानीं पांडुरंगा आठवीत ॥१॥सर्वांभूतीं त्यासी दिसे वासुदेव । नाहीं दुजाभाव त्याचे मनीं ॥२॥निद्य आणि वंद्य लेखितो सारिखे । पाहे ब्रह्मरूप सर्वत्रांसी ॥३॥रात्रंदिवस करी हरीचें भजन । सुखें आनंदानें राहतसे ॥४॥सज्जन हे त्यासी बहुत मानिती । दुर्जन द्वेषिती त्याज लागीं ॥५॥परि त्याचे चित्ती वाटेना हें दु:ख । मानी प्रेमसुख आनंदानें ॥६॥दुर्जनांनीं त्याच्या घरासी तो अग्नि । लाविला येऊनि रात्रीमध्ये ॥७॥अग्नि मोठा तेव्हां प्रदिप्त तो झाला । वृत्तांत कळला सज्जनांसी ॥८॥धांवुनी ते आले पाहती नयनीं । कांहो चक्रपाणी ऐसें केलें ॥९॥तुजवीण कोण राखे यासी आतां । धांव तूं अनंता येचि वेळां ॥१०॥पांडव राखिले लाक्षांतून जो हरी । तैसी करीं परी नागयासी ॥११॥येथें नाहीं देवा कोणाचा उपाय । घालीं आतां घाय पांडुरंगा ॥१२॥प्रल्हाद रक्षिला अग्नि तो माझारी । तैसी करीं परी त्यासी आतां ॥१३॥ब्रीद हें सांभाळीं आपुलें अनंता । राखीं आतां भक्तां आपुलिया ॥१४॥ऐकोनियां स्तुस्ति आले नारायण । शांत झाला अग्नि तेचि वेळां ॥१५॥स्वस्थ असे नागा आनंदानें सुखें । पाहती सर्वलोक परळीचे ॥१६॥सज्जन संतोष अंतरीं मानिती । धांवण्या श्रीपति धाविन्नला ॥१७॥दुजेंनांचीं तेव्हां तोडें जाहलीं काळीं । साह्य वनमाळी भक्तालागीं ॥१८॥चाहुर एक भूमी इनाम त्या दिली । पत्रिका लिहिली त्याच्या नांवें ॥१९॥ग्रामवासी त्यासी पिकवुनी धान्य । देती तें नेऊन नाग्या घरीं ॥२०॥वारसीक नेम चालविती लोक । आला नवा एक अमलदार ॥२१॥करोनी पाहणी मागतसे सारा । नायके विचारा कोणाचिया ॥२२॥तयासी उत्तर करिती ग्रामवासी । नवसिलें देवासी सर्वत्रांनीं ॥२३॥जगमित्न नागा हरिचा तो भक्त । सांगती वृत्तांत त्याजलागीं ॥२४॥याचे मनीं नाहीं कांहीं दुजा भाव । सर्वांभूतीं देव पाहतसे ॥२५॥कृपावंत असे यासी चक्रपाणी । नका तुम्ही मनीं आणूं दुजें ॥२६॥मनामाजी त्यानें केला तो विचार । पाहूं चमत्कार याचा आतां ॥२७॥जगमित्र नागा त्यानें बोलाविला । बोलता त्या झाला सुभेदार ॥२८॥आमुचिया घरीं मुलींचें तें लग्न । व्याघ्राचें कारण असे आम्हां ॥२९॥घेऊनियां आतां यावा तुम्ही व्याघ्र । म्हणवितां जगमित्र पाहूं कैसें ॥३०॥व्याघ्ररूप असे माझा नारायण । येतों मी घेउनी आतांची हा ॥३१॥आनंदानें नागा निघाला तेथुनी । आला असे वनीं अरण्यांत ॥३२॥धांवूनियां तेथें आले पांडुरंग । पुसतसे अंगें त्याजलागीं ॥३३॥कोठें जासी बापा घोर अरण्यांत । भय असे तेथें श्वापदांचें ॥३४॥मारतील तुज फिर तुं माघारी । येरु म्हणे हरि रक्षीं आम्हां ॥३५॥सुभेदार माझा असे परम मित्न । पाहिजे हा व्याघ्र त्याजलागीं ॥३६॥येरु म्हणे सुभेदार आहे नष्ट । काय त्याची गोष्ट ऐकसी तूं ॥३७॥तया चांडाळासी वधितों मी आतां । झाला तो बोलतां जगन्मित्रा ॥३८॥तूंचि हा चांडाळ बोलसी या गोष्टी । नको करूं कष्टी मित्र माझा ॥३९॥जाय तूं वाटेनं आपुल्या या आतां । होतसे बोलतां उशीर मज ॥४०॥व्याघ्र तेचि वेळां जाहले नारायण । धरी आलिंगुनी नागा त्यासी ॥४१॥गळांत्याचे तेव्हां बांधिलें अंगवस्त्र । घेऊनियां व्याघ्र आला नागा ॥४२॥भयाभीत झाले तेव्हां ग्रामवासी । लावियेया वेसी गांवीचिया ॥४३॥ग्रामवासी यांनीं लावियेलें द्वार । करी सुभेदार विचार तेव्हां ॥४४॥करीत गर्जना भयानक व्याघ्र । कांपती थरथर सकळ लोक ॥४५॥जगमित्र नागा आला वेसीपासीं । उघडा द्वारासी हांका मारी ॥४६॥ऐकोनियां कोणी न देती उत्तर । मोडियेलें द्वार व्याघ्रानें तें ॥४७॥प्रवेशला नागा सुभेदारा घरीं । हांका त्यासी मारी यावें आतां ॥४८॥करा करा कार्य सिद्धि घेऊनियां व्याघ्र । हांका वारंवार मारीतसे ॥४९॥द्वारपाळ त्याचे नुघडिती द्वार । मोडोनियां व्याघ्र शिरे आंत ॥५०॥करीत गर्जना आपटूनि पुच्छ । जाहले भयाभीत सकळ लोक ॥५१॥सुभेदार होता जया मंदिरांत । व्याघ्र नागा आंत गेले दोघे ॥५२॥सुभेदार बोले द्वाराचे आंतून । देईं जीवदान मज आतां ॥५३॥पतीत मी पापी तुझा शरणागत । होईं कृपावंत जगमित्रा ॥५४॥कर जोडोनियां करितों विनंती । अज्ञानाची भ्रांति झाली मज ॥५५॥वारंवार तुज घेतों लोटांगणीं । देई वा सोडोनी वनीं व्याघ्र ॥५६॥कृपावंत साधु वर्णिताती वेद । करीं अपराध क्षमा माझा ॥५७॥ऐकोनियां व्याघ्र गर्जना करीत भक्षावया धांवत त्याजलागीं ॥५८॥जगमित्र नागा अवरीत त्यासी । चाल तूं वनासी मायबापा ॥५९॥घेऊनियां व्याघ्र चालिला जगमित्र । पाहती सर्वत्र लोक तेव्हां ॥६०॥भक्तांनीं जिंकिला भाव बळें देव । घालीतसे धांव संकटीं तो ॥६१॥संतांचा महिमा न वर्णवे कांहीं । जाहला लीन पायीं नामदेव ॥६२॥ N/A References : N/A Last Updated : January 14, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP