मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|संतचरित्रे| गोरोबा कुंभार संतचरित्रे कबीर कमाल मिराबाई भानुदास जगमित्न नागा संताजी पवार बोधलेबावा जनजसवंत जनाबाई गोरोबा कुंभार राका कुंभार नरसी मेहता चोखामेळा संतचरित्रे - गोरोबा कुंभार संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevअभंगगोरोबा कुंभारनामदेव गोरोबा कुंभार Translation - भाषांतर १. प्रेम अंगीं सदा वाचे भगवंत । प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा ॥१॥असे घराश्रमी करीत व्यवहार । न पडे विसर विठोबाचा ॥२॥कालवुनी माती तुडवीत गोरा । आठवीत वरा रखूमाईच्या ॥३॥प्रेम आंगीं से झांकुनी नयन । करीत भजन विठोबाचें ॥४॥तयाचिये कांता आणूं गेली जळ । खेळतसे बाळ आंगणांत ॥५॥रांगत लेंकरूं गेलें असे तेथें । तुडविलें त्यातें न कळतां ॥६॥तत्क्षणीं त्याचा गेला तेव्हां प्राण । घेउनी जीवन आली कांता ॥७॥पाहती तों चिखलांत दिसे रक्तमांस । केला तो आक्रोश मोठा तिनें ॥८॥पिटीयेलें तेव्हां आपुलें वदन । जळो हें भजन तुझें आतां ॥९॥डोळे असोनियां जाहलासी आंधळा । कोठोनी कपाळा पडलासी ॥१०॥कसाबासी तरी कांहीं येती दया । कांरे बाळराया तुडविलें ॥११॥विठोबानें कैसें लावियेलें वेड । नाहीं मागेंपुढें पाहिलेंसी ॥१२॥निर्दयाची तुज लागली संगती । अधर्मीं श्रीपति देखियेला ॥१३॥काय तुझा यानें केला असे अन्याय । दूर परता होय चांडाळा तूं ॥१४॥होतीं लोटोनियां केला तो परता । आग लाव आतां विठोबासी ॥१५॥ऐकूनियां शब्द सावध तो जाहला । कांगे भंग केला भजनाचा ॥१६॥विठोबासी । माझ्या कांगे त्वां गांजिलें । कर्म ओढवलें बाळकाचें ॥१७॥सांग मज ऐसें कोणाचें तें जालें । पुण्य फळा आलें लेंकुराचें ॥१८॥याजसाठीं माझ्या गांजिलेंसे देवा । पाठी लागे तेव्हां मारावया ॥१९॥हात बोट मज लावशील आतां । आण तुज सर्वथा विठोबाची ॥२०॥ऐकतांचि ऐसें ठेवियेली काठी । राहिला उगाची गोरा तेव्हां ॥२१॥न करी तो कांहीं तयेसीं भाषण । वर्जियेली तेणें कांता तेचि ॥२२॥विनवीते कांता गोरिया लागुनी । न मोडीं मी आण विठोबाची ॥२३॥जाली तेव्हां श्रमी वंश बुडविला । विठोबा कोपला मजवरी ॥२४॥मनामाजी तेणें केला तो विचार । करावें दुसरें लग्न याचें ॥२५॥बोलाविला तिनें आपुला तो पिता । सांगितली वार्तां त्याजलागीं ॥२६॥कनिष्ठ हे कन्या दे माझ्या भ्रतारा । नको या विचारा पाहूं आतां ॥२७॥अवश्य म्हणूनियां विनविला गोरा । लग्नाची हे त्वरा केली तेव्हां ॥२८॥लग्न झाल्यावरी घाली वोसंगळा । दोघीसही पाळा समानची ॥२९॥न पाळितां आण तुम्हा विठोबाची । धरा या शब्दाची आठवण ॥॥३०॥अवश्य म्हणोनियां निघाला तो गोरा । आला असे घरा आपूलिया ॥३१॥कनिष्ठ स्त्रियेसी आलें असे न्हाण । न करी भाषण तिसीं कांहीं ॥३२॥येऊ म्हणे बाई कैसा हा भ्रतार । करूं मी विचार कैसा आतां ॥३३॥पहिली ती कांता बिनवी गोरियातें । अंगिकारा इतें स्वामी आतां ॥३४॥मामानें ही मज घातलीसे आण । दोघींचें पाळण समान करा ॥३५॥गेला तरी आतां जावो माझा प्राण । न मोडी मी आण विठोबाची ॥३६॥जाहल्या दोघी श्रमी कपाळ पिटिती । पुरविली पाठी विठोबानें ॥३७॥वंश बुडविला ह्या मेल्या काळयाने । जळो थोरपण याचें आतां ॥३८॥बेडे मेले लोक घेती दरुशन । नसावें भाषण यासीं कांहीं ॥३९॥होवोनियां श्रमी बिसल्या घरांत । काढियेली युक्ति कनिष्ठेनें ॥४०॥म्हणे बाई आतां मोडूं याची आण । करील भाषण आपणची ॥४१॥निजतो हा जेथें तेथें हो जाऊन । करावें शयन दोघीनीं तें ॥४२॥निद्रेमाजी उरस्थळीं याचे हात । ठेऊं अवचित आपूलिया ॥४३॥मग हा करील सहजचि भाषण । न लगे सांगणें कोणासी तें ॥४४॥निद्रेमाजी गोरा जाहला तोनिमग्न । दोघींनीं शयन केलें तेथें ॥४५॥उचलोनियाम कर ठेविले शरीरीं । नाहीं देहावरी गोरा तेथें ॥४६॥सावध होवोनी पाहियेलें तेणें । अन्याय हातानें केला माझ्या ॥४७॥विठोबाची माझ्या मोडियेली आण । टाकाबे तोडून हातचि हे ॥४८॥घेऊनियां शस्त्र तोडियेली कर । आनंदला फार मोरा तेव्हां ॥४९॥समजलें तेव्हां लोकां त्या सकळां । भक्त हा आगळा देखियेला ॥५०॥कैसा बाई आतां करावा विचार । बुडाला संसार सर्वस्व हा ॥५१॥आतां शरण जाऊं तया पांडुरंगा । करील तो चिंता आमुचीय़े ॥५२॥सांगूं वर्तमान रुक्मिणीजवळी । विनची वनमाळी आम्हांविसी ॥५३॥शरणागतां हरी नेदीच अंतर । वर्णिताती । शास्त्रें मोठींमोठी ॥५४॥संत हें गाताती बाई सदोदीत । पाहूं तो अनंत कैसा असे ॥५५॥दोघी तेव्हां गेल्या रुक्मिणीजवळी । विनविली बाळी रुक्मिणी ॥५६॥सांगितला तिसी सकळ वृत्तांत । विनवी हा कांत आम्हाविसीं ॥५७॥ऐकेलग बाई तुझें तो वचन । समजलें पूर्ण आम्हांलागीं ॥५८॥करीं माते आम्हा येवढा उपकार । न पडे विसर जन्मोजन्मीं ॥५९॥करुनी प्रार्थना आल्या त्या अश्रमा । उभा होता नामा कीर्तनासी ॥६०॥आवडीनें गोरा करीत श्रवण । आणीक सज्जन हरिभक्त ॥६१॥नामयानें टाळीं पिटीली गजरें । गोरियासी कर फुटले ते ॥६२॥रांगत लेंकरूं आलें तयावेळीं । मातेच्या जवळी आनंदानें ॥६३॥आलिंगुनी तिणें धरिलें ह्रदयीं । झाली विठाबाई कृपावंत ॥६४॥आलिंगुनी गोरा बोले मेघ :--- शाम । करीं घराश्रम सुखें आतां ॥६५॥संशयाची जात नको धरूं चित्ता । आण तुज आतां माझी असे ॥६६॥ऐकोनियां गोरा वर्ते घराश्रमी । लक्ष असे नामीं विठोबाच्या ॥६७॥ऐसिया संतांचे आठवितां गुण । जाती हे जळोन सर्व दोष ॥६८॥नामदेव त्यासी करी विनवणी । ठाव ह्या चरणीं तुमचीया ॥६९॥हेंचि तुम्ही आतां मज द्यावें दान । आठवीन गुण वारंवार ॥७०॥२. आषाढी पर्वणी आला यात्राकाळ । निघाले सकळ वारकरी ॥१॥यांचे समागमें जात असे खुळें । स्मरे वेळोवेळे विठ्ठासी ॥२॥धन्य पुण्यतिथि आली एकादशी । पावले क्षेत्नासी विश्वजन ॥३॥स्नानविधि करोनि समस्तां भेटला । कीर्तनीं बैसला हरिदास ॥४॥निवृत्ति ज्ञानदेव सोपान सांवता । नामयाची कथा ऐकताती ॥५॥तंव तो म्हणे करा नामाचा उच्चार । टाळीचा गजर करूनियां ॥६॥गोरियाचे नेत्नीं आले जळबिंदु । मज कां गोविंदु विसरला ॥७॥कां गा केशिराजा मोकलिलें मातें । शरण कोणातें जाऊं आतां ॥८॥तुजविण मज न दिसे निर्वाणीं । माय बाप धई ग्ण गोत ॥९॥आतां माझी लाज राखें पंढरीनाथा । तुजविण आतां कोणी नाहीं ॥१०॥अनाथाचा नाथ दिनाचा कैवारी । पावला झडकरीं आपुल्या दासा ॥११॥गोरियाचे हात आले तत्क्षणीं । गर्जोनि नामध्वनी उभा ठेला ॥१२॥सकळ संत जनीं देखोनि नयनीं । टाळिया पिटोनि गर्जतती ॥१३॥निधला म्हणती भक्त हा वैषणव । अघटीत भाव न कळे याचा ॥१४॥कैसा येणें केला ऋणी पंढरीनाथा । आहे पंढरीनाथ याचे उदरीं ॥१५॥पूर्वीं तो प्रर्हाद श्रवणीं ऐकिला । किंवा हा देखिला संतांमधीं ॥१६॥नामा येऊनियां चरणासी लागला । ह्रदयीं आलिंगिला भक्तराज ॥१७॥३. कां गा केशिराजा मोकलीलें मातें । शरण मी कोणातें जाऊं आतां ॥१॥तुजविण मज न दिसे निर्वाणीं । मायबाप धणी गणगोत ॥२॥आतां माझी लाज राखें पंढरीनाथा । तुजविण अनंता आणिक नाहीं ॥३॥अनाथांचा नाथ दीनांचा कैवारी । पाव झडकरी आपुल्या दासा ॥४॥गोरियाचे हात आलेचि तत्क्षणीं । नामा कीर्ति वर्णीं विठोबाची ॥५॥४. माती तुडवितां नाहीं देहस्थिती । आठवीत चित्तीं पांडूरंग ॥१॥गोरोबाची कांता पाणियासी जातां । पुत्राला पाहतां खेळतसे ॥२॥द्दष्टी असों द्यावी स्वामि बाळावरी । नाहीं कोणी घरीं सांभाळाया ॥३॥नामा म्हणे नाहीं गोरा देहावर । सर्वही निर्धार पांडूरंगीं ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 14, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP