उत्तरमेघ - श्लोक ९१ ते ९५

महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर.


(९१) होई, शेषावरुनि उठतां श्रीहरी, शाप पूर्ण ।
चारी मासां म्हणुनि उरल्या, लोटिं डोळे मिटोन ॥
आकांक्षा ज्या प्रबल विरहें, चिंतितों ज्या मनांत ।
तर्पूं आम्ही मग शरदिंच्या स्वच्छशा चांदण्यांत ॥

(९२) मागें, माझ्या निबिड विळखा घालुनीयां गळ्यातें ।
मोठयानें तूं रडत उठसी, झोंपली, आठवे तें ? ॥
पृच्छा केल्या फिरुनी बोलसी, हांसुनीयां ।
“पाही स्वप्नीं, शठ ! रमवितां दूसरीतें !” वचा या ॥

(९३) सांगे कीं हें गुपित तुज, मी क्षेम हें तूं गणावें ।
खोटया वार्ता परिसुनि मला तूं न दोषी म्हणावें ॥
स्नेहा येई विरम विरहें, हें न साचें; अभोगें ।
तें सांचोनी प्रणयविषयीं, सागराची सरी घे ॥

(९४) संक्षिप्येत क्षण इव कथं दीर्घयामा त्रियामा
सर्वावस्थास्वहरपि कथं मन्दमन्दातपं स्यात् ।
इत्थं चेतश्चटुलनयने दुर्लभप्रार्थनं मे
गाढोष्माभि: कृतमशरणं त्वद्वियोगव्यथाभि: ॥

(९५) नन्वत्मानं बहु विगणयन्नात्मनैवावलम्बे
तत्कल्याणि त्वमपि नितरां मागम: कातरत्वम् ।
कस्यात्यन्तं सुखमुपनतं दु:खमेकान्ततो वा
नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण ॥


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP