मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|मेघदूत|उत्तरमेघ| श्लोक ७१ ते ७५ उत्तरमेघ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०४ उत्तरमेघ - श्लोक ७१ ते ७५ महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर. Tags : meghadoottranslationभाषांतरमराठीमेघदूत श्लोक ७१ ते ७५ Translation - भाषांतर (७१) “जाणीं मातें घन, अविधवे ! त्वत्प्रतीचा सखा, गे ! ।आणी त्याचें कुशलवच, जें मन्मनीं पूर्ण जागें ॥जो पांथांतें, पथिं विरमल्या स्वगृहा हांकवाया ।गर्जे मंदध्वनि, रमणिंच्या वेणिमोक्षा कराया ॥”(७२) हें ऐकोनीं, पवनतनया जानकी जेविं, तूतें ।पाहे आशाभरित ह्रदयें, दावि ती आदरातें ॥लावी सारा लय तव वचीं, सौम्य !; वार्ता प्रियाची ।आली मित्राकडुनि, अबलां संगकल्पाचि साची ॥(७३) तीतें माझी विनति गणुनी, तूं कृती व्हावयास ।तैसा, सांगें :--- प्रियजन तुझा रामगिर्याश्रमास ॥आहे, देहें कुशल, विरही; तो तुझें क्षेम बाहे ।पृच्छा आधीं सुलभविपदां प्राणियां हीच आहे ॥(७४) झाली त्याची वपु कृशतरा, तापवी पंचबाण ।डोळे येती भरुनि, झुरतो नित्य सोत्कण्ठ जाण ॥उष्णोश्वास प्रसरति, अशा व्याधिनीं व्याप्त - जीव ।कल्पी त्या त्या दुरुनि तुज, जों रोधि मार्गा कुदैव ॥(७५) जें सांगावें उघड तुजला मैत्रिणीच्या समीप ।तेंही कानीं कथि, धरुन जो आननस्पर्शलोभ ॥तो, गे ! द्दष्टिश्रवणविषयांपासुनी दूर होतां ।धाडी प्रेमोत्कट मम मुखें या निरोपासि आतां ॥ Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP