मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|मेघदूत|पूर्वमेघ| श्लोक १०६ ते ११० पूर्वमेघ श्लोक १ ते ४ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते ११० श्लोक १११ ते ११५ श्लोक ११६ ते १२२ पूर्वमेघ - श्लोक १०६ ते ११० महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर. Tags : meghadoottranslationभाषांतरमराठीमेघदूत श्लोक १०६ ते ११० Translation - भाषांतर (१०६) वेळू जातां भरुनि पवनें वाजतो गोड पांवा ।तैसा तेथें त्रिपुरजय कीं, किन्नरीं आळवावा ॥तूझा चंडध्वनि गिरिदरीं ढोलसा जों घुमेल ।संगीताचा मदनरिपुच्या संच तेथें जमेल ॥(१०७) तीं तीं स्थानें बघुनि, तटिं तो आक्रमोनी नगेन्द्र ।गांठावें त्वां भृगुप्तियशश्चिन्ह जें क्रौंचरन्ध्र ॥तेणें जाया त्वरित, कलता डौल घे उत्तरेतें ।श्रीविष्णूचा पदचि, बलिच्या सिद्ध कीं संयमातें ।(१०८) सांधे ज्याचे निजभुजबळें रावणें सैल केले ।जेणें कार्य त्रिदशवनितादर्पणाचें जहालें ॥ज्याचीं शृंगें सुधवल, जणों हास्य कीं त्र्यंबकाचें ।गोळा झालें प्रतिदिनिं; तया शैलिं तूं जावयाचें ॥(१०९) अद्री तो कीं नवकरिरदच्छेदसा गौरवर्ण ।मूर्ती त्याच्या तटिं तव दिसे कज्जलाच्या समान ॥शोभा, डोळे भरुनि बघण्या योग्य, तेव्हां दिसेल ।वाटे कीं हा हलधर उभा लेवुनी कृष्णचेल ॥(११०) तत्र व्यक्तं द्दषदि चरणन्यासमर्धेन्दुमौले: शश्वत्सिद्धैरुपचितबलिं भक्तिनम्र: परीया: ।यस्मिन्द्दष्टे करणविगमादूर्ध्वमुद्धूतपापा: संकल्पन्ते स्थिरगणपदप्राप्तये श्रद्दधाना: ॥ Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP