पूर्वमेघ - श्लोक ७६ ते ८०

महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर.


(७६) गम्भीराया: पयसि सरितश्चेतसीव प्रसन्ने
छायात्मापि प्रकृतिसुभगो लप्स्यते ते प्रवेशम् ।
तस्मादस्या: कुमुदविशदान्यर्हसि त्वं न धैर्यान्मोघीकर्तुं चटुलशफरोद्वर्तनप्रेक्षितानि ॥

(७७) फेडीं तीचें, हळु धरियलें, वेतसांच्या करांनीं ।
नीळें तोयांबर निसटलें तीरजंघांवरोनी ॥
होसी जेव्हां स्थिर तिजवरी, मित्र ! कष्टेंचि जासी ।
सोडोनीयां विवृतजघना, कोण जाई विलासी ? ॥

(७८) धाली धात्री नवजलकणें, घे तिच्या सौरभाला ।
शुंडाग्रांनीं कलरवसवें पीति दंती जयाला ॥
वारा देवाद्रिस तुज असा, प्रेरि, बा ! सावकाश ।
शीतस्पर्शें पिकवि वनिं जो उंबरांच्या फलांस ॥

(७९) राहें तेथें शिवसुत, तया पुष्पदेहेंचि वाहीं ।
ओले झाले कुसुमचय जे व्योमगंगाजलांहीं ॥
रक्षायातें शतमखदलें ईश्वरें, आगळें तें ।
सूर्याहूनी, दहनवदनीं, ओतिलें तेज होतें ॥

(८०) ज्याचें तेजोवलयि गळलें, पिच्छ, कैलासराणी ।
पुत्रस्नेहें, कुवलयदलस्पर्धिसें, ठेवि कानीं ॥
सेनानीच्या, नगघनकृतें गर्जितें नाचवीच ।
मोरा, ज्याचीं खुलवि नयनें भर्ग्यभालेन्दुतेज ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP