पूर्वमेघ - श्लोक ४१ ते ४५

महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर.


(४१) उद्यानांच्या वइ, तव दिनीं, पांडुरा केतकांनीं ।
चैत्यें सारीं घरटिं करुनी व्यापिलीं वायसांनीं ॥
रानें जेथें करिति पिकल्या जांभळी श्यामवर्ण ।
हंसां थोडी वसति जिकडे, होति ऐसे दशार्ण ॥

(४२) जातां, लोकीं प्रथित, विदिशा राजधानी तयांची ।
लाधे तूतें, परिणति परा, बा ! विलासीपणाची ॥
तीरीं वीचिध्वनिमुखर जें, चंचलभ्रू तरंगीं ।
प्यावें वेत्रा - जल मधु, तिचें आस्य कीं, प्रेमरंगीं ॥

(४३) नीचैर्नामा गिरिवरि वसें; कांहिं विश्रांति चाखीं ।
जो कादंबीं पुलकित तव स्पर्शनें जाहला कीं ॥
जेथें वेश्यारतिपरिमळें व्यापिल्या कंदरांनीं ।
चंदोद्दामें प्रकटिलिं निजें यौवनें नागरांनीं ॥

(४४) वर्षीं जातां पथिं नवजलें, घेउनी विश्रमास ।
तीरोद्यानीं वनतटिनिच्या, यूथिकाजालकांस ॥
गंडस्वेदा पुसुनि कमलें कर्णिंचीं म्लान होती ।
छायादानें क्षणचि सुखवी माळिणींचीं मुखें तीं ॥

(४५) घ्यावा लागे, त्यजुनि उदिची, वांकुडा मार्ग तूतें ।
प्रासादांचा विसर न तरी उज्जनीच्या पडों दे ॥
विद्युत्तेजें पुररमणिचे नेत्र भेणें विलोल ।
त्यांहीं तेथें जरि न रमसी, बा ! तुझा जन्म फोल ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP