शिवरात्रमाहात्म्य - अभंग ३६ ते ४०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


३६.
ऐकतांचि जीव झाला कासावीस । ह्मणे झालें कैसें अकस्मात ॥१॥
आहां कपाळींचा भोग वोढवला । कांत तो नि-घाला सांडोनियां ॥२॥
कैंची बाळें कोण कोणाची सांगाती । पाहातां हे भ्रांति वाउगीची ॥३॥
ठायींची हे काया जायाची जाईल । वांचलिया फोल पतिविण ॥४॥
पतीविण सुख काय या संसारी । दु:ख कल्पवरी भोगावें कीं ॥५॥
नामा ह्मणे ऐसें चिंतोनियां मनीं । आली ती तत्क्षणीं हरणापाशीं ॥६॥

३७.
कपाळीं कपाळ लावी चुंबी रडे । आक्रंदोनी पडे पृथ्वीवरी ॥१॥
आवडीचें चिन्ह सांगवेना वाचे । जाणावें जयांचें त्यांचें त्यांनी ॥२॥
मानेवरी मान टाकूनि राहिली । वाचाही खुं-टली बोलवेना ॥३॥
आह्मी तुजविण नें राहूं क्षणभरी । उदास न करीं चित्त आतां ॥४॥
नामा ह्मणे मृगजन्म त्यांचा खरा । लक्षितां विचारा ज्ञानी बहू ॥५॥

३८.
पट्टाची मी राणी वडील मानाची । जे गति मृगाची तेचि मज ॥१॥
जाईन सांगातें न सोडीं संगती । निश्चय हा चित्तीं दृढ केला ॥२॥
तुझीं बाळें घरीं कष्टती क्षुधेनें । जाईं वेगीं स्तनें पान देईं ॥३॥
बाळांकडे जाईं पाहें कंठीं काळ । न करीं उतावीळ मन आतां ॥४॥
नामा ह्मणे ऐसें संवादले फार । तिघांचें अंतर एकविध ॥५॥

३९.
ऐशा दोधीजणा एकविधं भावें । द्यायवासी जीव उभ्या ठेल्या ॥१॥
धन्य धन्य त्यांचा संसार सुफळ । सत्वाचेंचि बळ अंगामध्यें ॥२॥
पाजूनियां येईं बाळक्रासी स्तन । आम्ही दोघे जण येथें असों ॥३॥
न टाका मजला सांगोनि निघाली । बिर्‍हाडासी आली लागवेगें ॥४॥
घेऊनियां अंकीं पाडसें तीं दोन्ही । लावू-नियां स्तनीं शोक करी ॥५॥
एकमेकें सुखें राहावें अनन्य । तुटलें सौजन्य तुह्मां आह्मां ॥६॥
पति पडिलासे फांसीं सांडीतसे प्राण । आह्मांलागीं जाणें त्याच्यासंगें ॥७॥
ह्लदयीं धरोनी दिधलें चुंबन । तीं ह्मणती कोण पोशी आह्मां ॥८॥
येऊं तुह्मांसंगें देऊं आधीं प्राण । पुढील कारण तुह्मी पाहा ॥९॥
नामा म्हणे ऐसें पांचही ते एक । देखोनि कौतुक वाटतसे ॥१०॥

४०.
निघोनियां दखो आली त्या तटाका । झाली एकमेकां मेटी तेथें ॥१॥
परस्परें दु:ख देखतां वाढलें । धैर्याचेंचि बळ केलें त्यांनीं ॥२॥
देहभाव कांहीं नाठवे तयांसी । गुंतोनी मोहासी जीव देती ॥३॥
नामा ह्मणे देवें सोडवावें त्यांसी । हें तो अने-कांसी आटोपेना ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP