मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|शिवरात्रमाहात्म्य| अभंग ४६ ते ५० शिवरात्रमाहात्म्य अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५५ शिवरात्रमाहात्म्य - अभंग ४६ ते ५० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग ४६ ते ५० Translation - भाषांतर ४६.पापिष्टाचें जिणें काय ते जिवालें । गळां स्तन झाले शेळियेचे ॥१॥येथेंचि जो खोटा तेथें तो करंटा । व्यर्थ आला पोटा माउलीचा ॥२॥तप्त ताम्र भूमि लोळविती नरा । लेटिती अघोर नरकामाजी ॥३॥लोहोचंबुकाग टोंचिती येवोनी । मारि-ताती घणीं माथां घाव ॥४॥वांधोनियां गळां टांगिती उफराटें । ह्मणताती सोटे वंरिच्यावरी ॥५॥आसीपत्रावरी वोढिसी धरोनी । लेटिती नेउनी कुंभपाकी ॥६॥जळतिया खाबा भेटविती बळें । खैरा़च्या इंगळें नाहाचिती ॥७॥प्रळय क्रूर सर्प झोंबचिती कंठासीं । ओढोनि जिव्हेसी खंड करिती ॥८॥नामा ह्मणे ऐसी पापिष्ठाची गती । जन्म लक्ष शतीं हेंचि फळ ॥९॥४७.न करू आह्मीं तैसें घेईं आतां भाक । अंतरीं नि:शंक झालो सर्व ॥१॥तुह्मीं आह्मां साक्षी असे सदाशीव । येथें दुजा भाव धरूं नको ॥२॥पिऊनियां पाणी न येऊं तुजपाशीं । तरी घडे आह्मांसी सर्व पापें ॥३॥जातीचा ब्राह्मण न करी ब्रम्हकर्म । तो जैसा अधम तैसे आह्मी ॥४॥स्वामिद्रोही आणि विश्वास-घातकी । तो पडे ज्या नरकीं तेथें पडो ॥५॥नामा म्हणे ऐसी वाहोनियां आण । धरीले चरण पारध्याचे ॥६॥४८.पारधियासी तेव्हां दाटला गहींवर । लोटलें अपार प्रेम तेव्हां ॥१॥जीवदान दिल्हें जावें तुम्हीं आता । न करावी चिंता कांहीं येथें ॥२॥इंद्राचा मी दूत चुकलों सेवेसी । यालागीं जन्मासी आलों जाणा ॥३॥तुमचिया बोलें निवालें अंतर । घात इत:पर न करीं कांही ॥४॥नामा ह्मणे शुभकाळ त्याचा आला । ह्मणवोनि झाला पश्चात्ताप ॥५॥४९.सोडोनियां गळा मुक्त केले त्यांसी । पिऊनि उदकासी आली पुढती ॥१॥क्षुधेलासी फार न लावीं उशीर । घेऊनिय़ां शस्त्र हाणी वेगें ॥२॥घर तुझें दूर वाहावेना भार । आह्मी तेथ-वर येत असों ॥३॥सत्यत्व देखोनि ह्मणतसे पारधी । तुम्ह्यांसी न वधीं जावें आतां ॥४॥पाठोपाठी त्याच्या घरालागीं आली । वरणीं घातली मिठी त्यांनीं ॥५॥नामा ह्मणे सत्त्व आगळें तयांचें । वर्णावया वाचे नये शेषा ॥६॥५०.हरिश्चंद्र राजा सत्त्वनिष्ठ मोठा । स्त्रीपुत्र चोहोटामाजी विकी ॥१॥तैसोंचि येथें मृगाअंगीं सत्त्व । वोपियेला जीव पारध्यासी ॥२॥शिबीराजा अंग कापी नेटपाटें । सत्त्वासी पालट होऊं नेदी ॥३॥ताम्रध्वजा शिरीं कर्वत घातला । नाहीं पालटला मनोधर्मा ॥४॥नामा ह्मणे मागें बहुतीं केएले कीर्ति । तयां ऐसी रीति येथें दिसे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP