मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|शिवरात्रमाहात्म्य| अभंग ३१ ते ३५ शिवरात्रमाहात्म्य अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५५ शिवरात्रमाहात्म्य - अभंग ३१ ते ३५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग ३१ ते ३५ Translation - भाषांतर ३१.देखतांचि कांता दु:खी झाली फार । डोंगर तिजवर कोसळला ॥१॥बोलतां तियेशी न निघती बोल । ऐसाची तो वेळ अवधारी ॥२॥नको आतां पडूं मायेचिये भरी । जाये वो सुंदरी स्वस्थळासी ॥३॥माझी गति मज तुझी गति तुज । काय काज व्यर्थ प्राण द्यावा ॥४॥घरीं तुझीं बाळें गोजिरें गोमटीं । जाऊनियां पोटीं धरीं त्यांसीं ॥५॥न लावी उशीर जाई वो माघारी । जंव तो दुराचारी न देखतां ॥६॥बाळा पाळण हाचि स्त्रियांचा धर्म । सां-गतसे वर्म जाई आतां ॥।७॥माझिया प्रारब्धीं होतें तैसें झालें । तूं कां येथें बळें प्राण देसी ॥८॥नामा ह्मणे ऐसें सांगे तिच्या हिता । प्री ते नाइकतां कष्टी होय ॥९॥३२.नेत्रीं अश्रुधारा पडती अपार । तेणें पृथ्वीवर पूर ताहे ॥१॥ह्मणे तुह्यांवीण कैसा प्राण धरूं । वांचुनियां करूं काय आतां ॥२॥माझिया भारानें दाटेल मेदिनी । तुह्मां आव्हेरूनि गेल्यें जरी ॥३॥सुखाचे सांगाती होतों दोघीजाणी । दु:ख ह्मणवूनि सांडी केली ॥४॥सांडिलिया तुह्मां देवा न मानेल । वेदशास्त्र बोल हाकारिती ॥५॥तुजविण क्षण कंथवेना काळ । मीना जैसें जळ तैसेम आह्मा ॥६॥तुज-विण जिणें व्यर्थ या संसारीं । नामा ह्मणे खरी गोष्ट बोले ॥७॥३३.चण्डभिल्ल तेणें ऐकिलें बोलणें । सावधान मनें करो-नियां ॥१॥तेव्हां होती चित्तीं वासना जे खोटी । जिरऊनि पोटीं चाकाटला ॥२॥भीतिल यालागीं वृक्षा आड आला । ऐकों जो लागला शब्द त्यांचे ॥३॥नामा ह्मणे ऐसा राहिला पारधी । ऐकावें ते संधि काय झालें ॥४॥३४.दुसरी जे होती गर्भिण कुरंगी । तेही लागवेगीं आली तेथें ॥१॥आहा ऐसें काय केलें वो साजणी । नयेसी अझुनी कोंपटासी ॥२॥लहान पाडसें आक्रंदती भुकें । कैसी येथें सुखें राहिलिसी ॥३॥जाईं लवलाही त्यांसी स्तन देईं । सांगूं आतां कांहीं बोलवेना ॥४॥नामा ह्मणे धन्य तयाचें सौजन्य । नाही भावभिन्न कोणामाजी ॥५॥३५.येरी म्हणे काय करूं वो सुंदरी । आतां आहे धरीं काय माझें ॥१॥प्राणनाथें पेणें केलें स्वर्गलोकां । जाईन मी देखा तयासयें ॥२॥वडिलपणें तुह्मी लोभ असों द्यावा । सांभाळ करावा बाळकांचा ॥३॥वागुरे माझारी गुंतलासे कांत । कायसें जीवित विचारी पां ॥४॥न लावीं उशीर जाईं येच क्षणीं । अससी गर्भिणी पूर्ण दिवस ॥५॥जरी देसी प्राण पतन गर्भासी । होय ते दोषासी पात्र होसी ॥६॥पोसोनियां बाळें वाढवीं वंशाला । द्यावें चित्त बोला माझ्या आतां ॥७॥पळावया तुज नाहीं अंगीं बळ । न देखतां खळ जाईं वेगीं ॥८॥नामा ह्मणे ऐसीं उत्तरें ऐकिलीं । तेही घाबरली तयेवळे ॥९॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP