मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|शिवरात्रमाहात्म्य| अभंग १ ते ५ शिवरात्रमाहात्म्य अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५५ शिवरात्रमाहात्म्य - अभंग १ ते ५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग १ ते ५ Translation - भाषांतर १.कैलासींचा देव भोळा चक्रवर्ती । पार्वतीचा पति योगिराज ॥१॥तयाचिया पाया माझे दंडवत । घडो आणि प्रीत जडो नामीं ॥२॥जटाजूट गंगा अर्धचंद्र भाळीं । तिजा नेत्रज्वाळी जात वेद ॥३॥कंठीं काळकूट डौर त्रिशूल हातीं । सर्वांगीं विभूति शोभतसे ॥४॥गळां रुंडमाळा खापर हस्तकीं । रामनाम मुखीं सर्व-काळ ॥५॥व्याघ्रचर्मधारी स्मशानीं राहिला । संगें भूतमेळा बिरा-जित ॥६॥नामा ह्मणे नामें नासोनियां पाप । करीं मुखरूप भक्तांलागीं ॥७॥२.डवरला गिरी कैलास ढवळा । सिंहासन ज्याला ढव-ळेची ॥१॥पाहतां पाहतां निवाले लोचन । भव्य ज्याचें ध्यान एक-रूप ॥२॥ढवळा सर्वांगीं देव तो आपण । लेइला भूषण तेंहि तैसें ॥३॥पर्वताची बाळ पार्वती ढवळी । अर्धांगीं शोभली एकरूप ॥४॥स-र्वांगीं लविली ढवळी विभूती । माळा विराजती स्फटिकाच्या ॥५॥पांढरिया जटेमध्यें गंगा आहे श्वेत । गळ्यांत सोभत श्वेत सर्प ॥६॥शंखपाळ श्रवणें कुंडलें ढवळीं । देखतां भूतळीं दुजा नाहीं ॥७॥नामा ह्मणे ऐसें दाऊनियां ध्यान । भाविकाचें मन तोषवित ॥८॥३.एके दिनीं रत्नसिंहासनावरी । कैसा त्रिपुरारी शोभ-तसे ॥१॥सांगों जातां चार्ही वाचा विसांवती । तेथें माझी मति काय सांगों ॥२॥वामभागीं साजे सुंदरी भवानी । सिद्ध ऋषि मुनि करिती सेवा ॥३॥नारद तुंबर गर्जती गायन । तेथें कर जोडोन उभे देव ॥४॥गणेश शण्मुख ढाळिती चामरें । रिद्धिसिद्धि द्वार राखिताती ॥५॥नामा चा गजर मृदंगाची घाई । पाहाती नवाई ब्रह्मादिक ॥६॥नामा म्हणे करीं देतसे विडिया । लागोनियां पायां वारंवार ॥७॥४.तेव्हां प्रश्र करी पार्वती आदरें । शिवाप्रती कर जो-डोनियां ॥१॥सांगावाजी स्वामि ऐसा इतिहास । गातां जोडे वास तुझे पायीं ॥२॥जाळोनियां पापें सुखाची उन्नती । विश्व सुखी होती जेणें योगें ॥३॥नामा ह्मणे सुटे काळासी दरारा । विश्वासिया नरा मुक्ति जोडे ॥४॥५.ऐकोनियां वाणी । संतोषला शूळपाणी ॥१॥देवी चांगलें पुसिलें । तुझ्या बोलें चित्त धालें ॥२॥बोल नव्हती साचार । जड जीवाचा उद्धार ॥३॥बोल तुझे गोडावले । जगीं सुदिन पाहिजे ॥४॥शिवरात्रीचें महिमान । नामा ह्मणे ऐका जन ॥५॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP