मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|शिवरात्रमाहात्म्य| अभंग ५१ ते ५५ शिवरात्रमाहात्म्य अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५५ शिवरात्रमाहात्म्य - अभंग ५१ ते ५५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग ५१ ते ५५ Translation - भाषांतर ५१.आधींच कृपाळू भोळा महादेव । जाणितला भाव कुरंगांचा ॥१॥कृपा केली देवें मांडिला सन्मान । धाडिलें विमान दूताहातीं ॥२॥लखलखित टके पताका डोलती । तयामाजी होती गीत नृत्य ॥३॥नाना सुमनांची शय्या आरुवर । करिती उपचार सिद्धि आड ॥४॥आले अकस्मात तयाचियेपाशीं । पाहतां सर्वांसी नवल वाटे ॥५॥दिव्य दएह झाले पांचांचे ते काळीं । विमानीं बैसली लागवेगें ॥६॥पारधी देखोनी तटस्थ राहिला । दूतीं तया केला उपदेश ॥७॥शिवरात्री आजी जागरण उपवास । केला तेणें दोष सर्व गेला ॥८॥करोनी पारणें होईं शिवभक्त । आशापाशीं चित्त गोवूं नको ॥९॥अखंड कीर्तन शिवनामाचें करीं । तेणें मोक्षपुरी पावसील ॥१०॥पुढिल्या शिवरात्री नेऊं कैलासासी । सांगोनियां त्यासी गेले वेगीं ॥११॥नामा ह्मणे मोक्ष झाला त्या पांचासी । वस्ति चंद्रापाशीं केली त्यांनीं ॥१२॥५२.तेणें उपदेशें पारध्यासी ज्ञान । करी तो कीर्तन नाम-घोषें ॥१॥संचिताचा नाश क्रियमाण बुडविलें । त्या सहज जोडलें मोक्ष सुख ॥२॥दुसर्या शिवरात्री पूजिलें शंकरा । करोनियां बरा भाव शुद्ध ॥३॥विमानीं वाहोनी स्वस्थानीं स्थापिला । येथूनि संपला कथाभाग ॥४॥नामा ह्मणे शिव विष्णु एकरूप । जाणो-नियां जप करा त्यांचा ॥५॥५३.शिवरात्री कथा धन्य जे ऐकती । इच्छिलें पावती सर्व कांहीं ॥१॥पातकाचा नाश पुण्य वाढे फार । शेखीं विश्वंभर कृपा करी ॥२॥भोग भोग्य ज्ञान वाढेल संतान । काल करी चरण सेवा त्यांची ॥३॥नामा म्हणे शिव अक्षरें हीं दोन्हीं । जपावीं सज्जनीं वारंवार ॥४॥५४.नामाचा महिमा कोण जाणे सीमा । चतुर्मुख ब्रह्मा-नेणे कांहीं ॥१॥संसारा आलिया हेचि आहे जोडी । अखंड घ्यावी गोडी हरिनामें ॥२॥सहस्त्रमुखें शेष वाखाणितां कीर्ती । नाहीं तया तृप्ति आजीवरी ॥३॥पशु पक्षी तृण कीटक अपार । नामें गेले पार उतरोनि ॥४॥कापुराचे राशी पडे अग्निकण । तैसें नाम जाण पातकासी ॥५॥नामाग्नीनें दोष जळती एकसरा । कैवल्य जे धरा बसल्या ठायीं ॥६॥नामा म्हने धन्य नामाचा प्रताप । ध्याती एकरूप देवभक्त ॥७॥५५.लिंगपुरानीं हा बोलिला इतिहास । तोचि म्यां तु-म्हांस निवेदिला ॥१॥अनेक पुराणीं अनेक प्रकार । ताराक्या नर नारी लोक ॥२॥मुख्य हेचि कथा शिवरात्रीची जाणा । कैलासीं चा राणी तोष पावे ॥३॥नामा म्हणे मन करोनि निश्चळ । करा गदा-रोळ नामघोष ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP