शिवरात्रमाहात्म्य - अभंग २१ ते २५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


२१.
पुराणीं पवाडे जयाचे अपार । ऐकतांचि फार सुख वाटे ॥१॥
भोळा महादेव पाहे भोंळा भाव । एकसरें जीव उद्ध-राया ॥२॥
रावण मागों गेला पार्वतीकारणें । देते वेळे नेणे कैसें द्यावें ॥३॥
जातीची चांडाळी गोकर्णासी गेली । दरुशनें ते नेली कैलासासी ॥४॥
नामा म्हणे कैसें दैव या भिल्लाचें । आलें पूज-नाचें फल हातां ॥५॥

२२.
माथां पडतां पालां । सांब तेणें संतोषला ॥१॥
होता प्राचिनाचा ठेवा । बहु दुर्लभ मानवा ॥२॥
काय भक्तीचा जीव्हा-ळा । काय त्याचे अंगीं कळा ॥३॥
बहु केलीं दुष्ट कर्म । सेखीं तोचि झाला धर्म ॥४॥
नामा ह्मणे भोळादेव । सांगायाचा हाचि भाव ॥५॥

२३.
इतुकियासाठीं । बहु तुष्टला धुर्जटी ॥१॥
काय सांगावा विचार । दैव पारध्याचें थोर ॥२॥
झाली तीन प्रहर निशी । पूजा पावली देवासी ॥३॥
धाडियेलें यमाला । सुखी कराया तयाला ॥४॥
आला तो धांवत । माग ह्मणे अपेक्षीत ॥५॥
त्याची विषयक भक्ति । पुढती झाली तया गती ॥६॥
जें जें याचकें मागावें । तें तें दातयानें द्यावें ॥७॥
काय मागितलें तेणें । तेंचि नामा ऐका म्हणे ॥८॥

२४.
येऊनियां यम ठाकला पुढारीं । पाहे दुराचारी दुरो-नियां ॥१॥
घाबरला मनीं कोण असे नेणे । विचारितां मनीं भां-बावला ॥२॥
पुसों लागे त्याला कोण तूं आलासी । आणिक ह्मणसी माग कांहीं ॥३॥
देव किंवा यक्ष राक्षस किन्नर । करितां निर्धार न पडे ठायीं ॥४॥
नामा ह्मणे मूर्ख पारधी तो खरा । दैव त्याच्या घरा आलें जाण ॥५॥

२५.
जाणोनियां यम संतोषला मनीं । मंजुळ वचनीं काय बोले ॥१॥
केली देवें कृपा पाठविलें मज । वरदान तुज द्यावयासी ॥२॥
सर्वही जीवाचा नियंता मी यम । इच्छिसी तो काम पूर्ण करूं ॥३॥
शिवरात्री आजी उपवास केला । शंकर तोशला बिल्वदळीं ॥४॥
नामा ह्मणे ऐसें ऐकतां वचन । पार-ध्याचें मन सुखावलें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP