मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|भक्तवत्सलता १| अभंग १०६ ते १०८ भक्तवत्सलता १ भक्तवत्सलता २ अभंग १ अभंग २ अभंग ३ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ३७ अभंग ३८ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५५ अभंग ५६ ते ६० अभंग ६१ ते ६५ अभंग ६६ ते ७० अभंग ७१ ते ७५ अभंग ७६ ते ८० अभंग ८१ ते ८५ अभंग ८६ ते ९० अभंग ९१ ते ९५ अभंग ९६ ते १०० अभंग १०१ ते १०५ अभंग १०६ ते १०८ भक्तवत्सलता - अभंग १०६ ते १०८ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग १०६ ते १०८ Translation - भाषांतर १०६.सगुण संपन्न पंढरीच्या राया । आमुच्या स्वामिया केशिराजा ॥१॥रामकृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा । सज्जनीं स्वानंदा सर्वातीता ॥२॥गोविंद गोपाळ गोपवेषधारी । गोवर्धन धरी नखावरी ॥३॥दुष्ट दुर्जनासी दु:ख फार चित्तां । पावन पतितां नामा ह्मणे ॥४॥१०७.जय विठ्ठल श्रीविठ्ठल । जय जय विठ्ठल विठ्ठल ॥१॥परब्रह्म विठ्ठल मूर्ति विठ्ठल । निरंजन विठ्ठल ॥२॥जोचि नाम । तोचि देवो । ऐसें म्हणों तरी नाहीं संदेहो ॥३॥ह्मणे विष्णुदास नामा । तो नेईल परत गामा ॥४॥१०८.येंईवो विठ्ठले माते माउलीये । निढळावरी कर ठेऊनि वाट मी पाहें ॥१॥येतियास पुसें जात्या निरोप । पंढरपुरीं माझा मायबाप ॥२॥पितांबार शेला कैसा गगनीं झळकला । गरुडावरी बैसूनि माझा कैवारी आला ॥३॥विठोबाचें राज्य आह्मां नित्य दिवाळी । विष्णुदास नामा जिवेंभावें ओंवाळी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP