मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|भक्तवत्सलता १| अभंग २ भक्तवत्सलता १ भक्तवत्सलता २ अभंग १ अभंग २ अभंग ३ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ३७ अभंग ३८ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५५ अभंग ५६ ते ६० अभंग ६१ ते ६५ अभंग ६६ ते ७० अभंग ७१ ते ७५ अभंग ७६ ते ८० अभंग ८१ ते ८५ अभंग ८६ ते ९० अभंग ९१ ते ९५ अभंग ९६ ते १०० अभंग १०१ ते १०५ अभंग १०६ ते १०८ भक्तवत्सलता - अभंग २ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग २ Translation - भाषांतर N/Aहोसि भक्तांचा कोंवसा । तुझीं ब्रीदें ह्लषिकेशा । निव-विलें सायासा । कृपासिंधु मुरारी ॥१॥अंबरुषिकारणें । दहा वेळ गर्भवासा येणें । अवतार धरिला नारायणें । गजापूर नगरीं ॥२॥अंदुरायाच्या घरीं । बाळ जळसेनाच्या कुमरीं । मत्स्य रूप अवतार धरी । वेद हरणकैवारी नारायण ॥३॥विद्यापुर नगरीं । अंधरुराजा राज्य करी । श्रियादेवी त्या सुंदरी । उदरीं कुमरु जन्माला ॥४॥पृथ्वी रसातळवटीं । जातां थोर अंदोळली सृष्टी । धांवण्या धांवले जगजेठी । धर पृष्ठीं सांवरिली ॥५॥मर्गजपुरीं पुरपती । हिर-ण्याक्ष चक्रवर्ती । अग्नि असे जनवंती । घरीं बाळ वराह ॥६॥त्रिदश-देवश्रिया चाडा । हिरण्याक्ष वधिला गाढा । भूगोल धरूनियां दाढा । केला निवाडा स्वर्यीचा ॥७॥कर्पूरपुरपाटण । हरिभक्तीचें हें स्थान । सदयादेवी प्रिया नंदन । उदरीं नृसिंह जन्मला ॥८॥पित्या पुत्रा झाली कळी । स्तंभीं प्रगटला तयेवेळीं । असुर मारिला करकमळीं । भक्त प्रर्हाद रक्षिला ॥९॥कश्यपनंदनवर्धन । कोवळादशाचा वामन । खुजट रूप धरून । महेंद्रपुरीसी आला ॥१०॥दानें तपें व्रतें बळी । सोही घातला पाताळीं । अद्यापि राहिला जवळी । चरणातलीं पद देउनी ॥११॥रेणापुरीं देवी रेणुका । लाधली जमदग्नीस देखा । तिचे उदरीं विश्वतारका । परशुराम जन्मला ॥१२॥असुरीं वधि-येली माया । ह्मणे धांवें पुत्रराया । अवचित पातला धावया । सह-सार्जुन मारिला ॥१३॥अयोध्या नाम नगरी । जन्म कौसल्ये उदरीं । देवभक्तांचा कैवारी । दशरथनंदन राघव ॥१४॥राम त्रैलोक्यीं वीर दारुण । तेणें वधियेला रावण । अढळपद देऊन । राज्यीं बिभीषण स्थापिला ॥१५॥मथुरा नामें नगरीं । वसुदेव दे-वकी उदरीं । कृष्ण आठबा अवतारी । लीला विग्रहि जन्मले ॥१६॥कंस चाणूर मर्दिले । विमळार्जुन उन्मळिले । सप्त गर्भाचे सूड घेतले । रक्षिलें गाई गोपाळां ॥१७॥बौद्ध श्रीवत्साच्या घरीं । जन्म शांभवीच्या उदरीं । राजा कांतिये नगरीं । निरंतर रूपें राहिला ॥१८॥ध्यान मुद्रा मांडूनियां । वस्त्रें शस्त्रें त्यजूनियां । राहिला पैं निरंजनिया । भक्तिभाव ओळखे तो ॥१९॥कल्कि जसरा-याचा पुत्र । सावित्री देवीचा कूमर । शंभलापुरीं करील अवतार । दाही रूपें प्रगटला ॥२०॥ऐसा अमूर्त मूर्ति विटेव र । उभा राहिला निरंतर । विष्णुदास नाम्याचा दातार । वर विठ्ठल पंढरीये ॥२१॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP