मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|भक्तवत्सलता १| अभंग ३१ ते ३५ भक्तवत्सलता १ भक्तवत्सलता २ अभंग १ अभंग २ अभंग ३ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ३७ अभंग ३८ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५५ अभंग ५६ ते ६० अभंग ६१ ते ६५ अभंग ६६ ते ७० अभंग ७१ ते ७५ अभंग ७६ ते ८० अभंग ८१ ते ८५ अभंग ८६ ते ९० अभंग ९१ ते ९५ अभंग ९६ ते १०० अभंग १०१ ते १०५ अभंग १०६ ते १०८ भक्तवत्सलता - अभंग ३१ ते ३५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग ३१ ते ३५ Translation - भाषांतर ३१.देव आपण नाटक । भक्तां दाखवी वैकुंठ ॥१॥देव आपण संसारें । होसी भक्तांचा साहकारी ॥२॥देव आपण निराळा । भक्तां दावितो सोहळा ॥३॥नामा ह्मणे भक्तांसाठीं । हात जोडी जगजेठी ॥४॥३२.गोविंद गुणाचें निधान । गोविंद नयनींचें अंजन । गोविंद बाळकाचें स्थान । गो़विंद चिंतन योगियांचें ॥१॥गोविंद पांघुरे कांबळा । गोविंद क्रुपे़चा कोंवळा । गोविंद भावालागीं भोळा । गोविदें अजामेळा उद्धरिलें ॥२॥गोविंद बुद्धिची बुद्धि । गोविंद एकली मांदी । गोविंदें हरिली विघ्नव्याधि । गोविदें सिद्धि स्मर-लिया ॥३॥गोविंद गोकुळपाळक । गोविंद अंगवणें एक । गोविंदें दैत्या लवियला धाक । गोविंद शेष शयनीं ॥४॥गोविंद आडलि-या काजा कैवारी । गोविंद बुडतियातें तारी । गोविंदा सोळसहस्र नारी । गोविंद बाळ ब्रह्मचारी ॥५॥गोविंद दान दीक्षा गुरु । गोविंदे अढळ धुरु । गोविंद नामया दातारु । रुक्मिणीवरु गोविंदु ॥६॥३३.विठ्ठल माउली कृपेचि सावली । आठवितां घाली प्रेम पान्हा ॥१॥न सांगतां सर्व जाणे तान्ह भूक । जवळी व्यापक न विसंबे ॥२॥माया मोह कैसा करावा सर्वथा । अंतरींची व्यथा तोचि जाणे ॥३॥सुखशांति रूपें लेवविली अंगीं । लागों नेदी धगी संसाराची ॥४॥देऊनि अभय करें कुरवाळी । करित सावली पितांबरें ॥५॥मुखीं नाम माळा कीर्तन श्रवणीं । लेवविलीं लेणीं नवविध ॥६॥नयनीं अंजन सूदलें सांवळें । समाधान झालें सर्व अंग ॥७॥अच्युत अनंत सुवर्णाची पेटी । घातलिसे कंठीं निर्वि-कार ॥८॥चतुर्भुज शोभा रूप मध्यें मणि । प्रभा त्रिभुवनीं विरा- जित ॥९॥मुक्तलग शुद्ध बिंदुली गोजिरीं । पद्महस्त शिरीं स्थापि-तसे ॥१०॥संत पायरज कपाळीं टिळका । नाहीं भय शंका कळिकाळा ॥११॥सगुण साजिरा कटीं कडदोरा । अवर्ण दुर्भरा दृढबोधु ॥१२॥काम क्रोधादिक करूनि पुतळे । पाय जे घातले पायवाट ॥१३॥वासनेची दृष्टि लागएल त्या झणीं । उभा चक्रपाणि मागें पुढें ॥१४॥संतपायीं नामा शृंगार मंडितु । अखंड क्रीडतु महाद्वारीं ॥१५॥३४.एक गोक्षीर धाम धवळा । एक तो सहज मेघ सां-वळा । एक कंठीं रुंडमाळा । एक गळां वैजयंती ॥१॥एक तो वृषारुढ जाण । एका साजे गरुडवाहन । एक स्मशानीं भस्मोद्धु-ळण । एका शयन क्षीरसागरीं ॥२॥एक तो भोळा कैलासीं चक्रवतीं । एक तो वैकुंठाधिपती । एका सुरवर मुगूटीं वंदीती । एका अंगुष्ठी गंगा वाहे ॥३॥एकाचे चरणीं नेपुरें झणत्कारु । एका पायीं रुळे तोडरु । एका परिधान व्याघ्रांबरु । एका पीतांबरु कसियला ॥४॥एका नरकपाला खट्वांग डमरु त्रिशूल । एका शंख चक्र गदा कमळ । एका अर्धांगीं हैमवती बाळ । एका कमळा वामभागीं ॥५॥एक त्रिपुर संधानीं लक्ष न चुके । एकबाणें वाळि वधिला कैतुकें । विष्णुदास नामा एक रूप देखे । हरि-हर कौतुकें वर्णितसे ॥६॥३५.अपराधाविण बळी । घातला पाताळीं । सवें कणव उपजली । द्बार राखिसी तयाचें ॥१॥गार्हाणें सांगवें कवणा । केशवा सुजाणा । कोणी आणिक तुजविणा । नाहीं दुसर आह्मातें ॥२॥बाळमित्र सुदामा सवें जेवी । धान्य जो मागे गांवोगांवीं । विपत्ति त्याची दूर व्हावी । ह्मणून दिधली राणीव ॥३॥तुझें नाम न तोंडीं । वसुदेव देवकी बांधोडी । कंसा केली धांडडी । ऐसी विपत्ति दाखवुनी ॥४॥इंद्र वर्षे शिळा धारा । पर्वत केला सामोरा । इंद्रा लविला दरारा । एवढी विपत्ति दाखवुनी ॥५॥जोहरीं सूदलें पांडवां । सवेंचि उपजली कणवा । त्यासी केला त्वां रिघावा । आंगीं पाहण्या धांवसी ॥६॥सभा पिशुनाची दाटली । द्रौपदिकाया आंसुडली । तिये वस्रें पुरविलीं । येवढी आपदा दाखवुनी ॥७॥दैत्ये गांजिला प्रर्हादु । तुझ्या नामाचा प्रसादु । ऐसा करूनि वि-नोदु । तया दैत्या वधियेला ॥८॥बिभीशण हाणितला लाथां । लंका दिधली त्या उचिता । कृपा करें रघुनाथा । समर्थ केला तये वेळीं ॥९॥गजेंद्र पानेडी । धरिला यमदूत सुसरीं । वैकुंठीहूनि घा - लिसी उडी । येवढी आपदा दाखवुनी ॥१०॥आह्मां डिंगराचें बोलणें । अनाथनाथा परीसणें । विष्णुदास नामा ह्मणे । शाहणें व्हावें यापरतें ॥११॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP