मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ७| अध्याय १६ खंड ७ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ खंड ७ - अध्याय १६ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय १६ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ मुद्गल कथा पुढची सांगती । दक्षह्रदयीं आनंद अती । ऐश्यापरी जगाची स्थिति । मर्यादायुक्त तैं होती ॥१॥परी तदनंतर दैत्येंद्र बळयुक्त्त । देवांसी जिंकण्या वांछित । प्रल्हादास नेता नेमित । युद्धास सज्ज जाहले ॥२॥ते ब्रह्मशापानें मोहित । दितीस विनम्रपणें वंदित । कश्यपासही वंदित । त्यास देवी दिती म्हणे ॥३॥महादुष्टांनो स्वधर्म सोडून । नका करूं दैत्यांनो वर्तन । चतुर्भुजाची आज्ञा मानून । देवांनी युद्ध थांबविलें ॥४॥त्यांचें स्थान स्वर्गभूमींत । पाताळांत । तुम्हीं राज्य करा समस्त । चतुर्भुज ऐसी व्यवस्था करित । विसरलात का वचन त्याचें ॥५॥परी तिज प्रणास करून । तिचा उपदेश अव्हेरून । दैत्येश लोभयुक्त मन । देव जजार्थ निघाले ॥६॥ते अधर्मानें प्रेरि । जेव्हां युद्ध करण्या जात । तेव्हां दैत्य पक्ष सोडून जात । कश्यपासह देवी दिती ॥७॥गणेशास ती भक्तियुक्त । भजूं लागली एकचित्त । तिकडे अदितीही मुनींसहित । देवपक्ष सोडितसे ॥८॥आपुल्या पुत्रासी भजत । विनायकासी प्रीतियुक्त । दैवी प्रकृति त्यागित । मूर्ति करी मातीची ॥९॥त्या मृन्मूर्तिस्थ विनायका भजत । योगभावें प्रेमयुक्त । विनतादि कश्यपवचन मानित । त्याही भजती गणेशासी ॥१०॥तेव्हां दक्ष मुद्गलास विचारित। दैवी आपुली प्रकृती सोडून भजत । मानव गणेश्वर भावयुक्त । कसे भजती तें सांगा ॥११॥मुद्गल तेव्हां त्यास सांगती । नर जें सकाम कर्म करिती । तें जरी यथाविधि जें आचरती । परी तें आसुर जाणावें ॥१२॥देहसौख्य ते वांछित । म्हणोनी आसुर ख्यात । निष्काम जरी कर्म करित । तरी तैं दैव जाणावें ॥१३॥विधियुक्त दैवकर्म करित । तें मुक्तिप्रद असे ख्यात । स्दस्वधर्मस्थ जन करित । विविध कर्म तें योगरूप ॥१४॥देहधर्म समजून । कर्में करिती जे जन । देवप्रीत्यर्थ करितां कर्म पावन । भक्तिमय तें होतसे ॥१५॥तैसेंच भक्तिभावार्थ कर्म करित । स्त्रीसहित मुनि प्रमुदित । हें तुज कथिलें समस्त । चरित्र विनराजाचें ॥१६॥सर्वसिद्धिप्रद शांतिद । पूर्णंरूप भक्तिकारण सौख्यद । ऐसे नाना अवतार विशद । अशक्य त्यांचें वर्णन ॥१७॥हा विघ्नेश्वर देव समस्वानंदांत । सत्यासत्य निर्मून खेळत । आपुल्या मायाप्रभावें सतत । पूर्ण योगमय विघ्नराज हा ॥१८॥त्याचा अर्थ ऐक भावयुक्त । जेणें ब्रह्मबुद्धि प्रकाशत । संप्रज्ञानमय असत । ब्रह्म तसेंचि असंप्रज्ञात ॥१९॥भ्रमयुक्त महाविघ्नयुक्त । भ्रमहीन तेच विघ्नहीन ज्ञान । ब्रह्मांत होतां ब्रह्मभूत । उभयही तीं न राहती ॥२०॥सर्वांचा हा विघ्नराज असत । विघ्नकर्ता प्रजापते जगांत । तैसाचि विघ्नहर्ता साक्षात । ब्रह्मांचा हा निरंतर ॥२१॥स्वयं विघ्नयुत वा विघ्नहीन । नसे हा देव गजानन । ऐसें जाणून नर पावन । ब्रह्मभूत होतसे ॥२२॥हें विघ्नेश्वराचें चरित । जो नर ऐकत अथवा वाचित । त्यावरी विघ्नेश प्रसन्न होत । सर्वदा जाण सर्वत्र ॥२३॥विघ्नराजेंद्र होता प्रसन्न । दुर्लभ काय त्या नरास महान । सर्वसिद्धियुक्त होऊनी जन । ब्रह्मचि अंतीं होईल ॥२४॥ह्यासम पावन कांहीं नसत । भुक्तिमुक्तिप्रद दक्षा हें चरित । पंचाग्नि साधनादि तपांनी लाभत । त्याहून अधिक हें पुण्यप्रद ॥२५॥ह्या चरित्राचें करितां श्रवण । तें सारें पुण्य लाभे तत्क्षण । विविध तीर्थयात्रा करून । जें पुण्य लाभतें जनांस ॥२६॥त्याहून अधिक पुण्य लाभत । नरास ह्या खंडाच्या श्रवणें त्वरित । सर्व यज्ञांचें जें फळ असत । त्याहून अधिक पुण्य यांत ॥२७॥इष्टपूर्तादिक जें कर्म करून । लाभे नर पुण्य पावन । त्याहून अधिक पुण्य लाभ महान । हें थोर चरित्र वाचतां ॥२८॥पुत्रपौत्रादि संयुक्त । धनधान्यादींनी युक्त । आरोग्यसंपन्न पुण्यवंत । याच्या श्रवणें नर होई ॥२९॥वंध्यत्वादि दोषयुक्त । जरी असेल मानव पीडित । तरी या खंडाच्या श्रवणें होत । वीर्यवंत अपल्य युक्त ॥३०॥ज्याच्या घरांत हा खंड असेल । त्यास पिशाच्च चोरबाधा न बाधेल । विघ्नेश भक्तिप्रद हा विमल । चरित्र ग्रंथ जाणावा ॥३१॥अग्निसंभव वा राजसंभव । ग्रहसंभव तैसें राशिसंभव । पूतनादिक वा संभव । भय न बाधे पाठका श्रोत्या ॥३२॥हा खंड धर्मार्थभाव बोधप्रद । श्रवणें आधार ब्रह्मभूयद । काय वर्णावें बहुत मोदद । विघ्नेश्वर जेथ तेथ सौख्य ॥३३॥ऐसें हें विघ्नराजाचें चरित । सांगितलें तुज अद्भुत । त्या गणेशा भज एकचित्त । तेणें सुख तुज लाभेल ॥३४॥हें चरित्र सुखकर । दुर्जनासी वाचून न दाख्वा गंभीर । जो जन साधुवृत्ति गणेशभक्तिपर । त्यासीच वाचून दाखवावें ॥३५॥सूत म्हणे शौनकाप्रत । इतुकें बोलून मुद्गल थांबत । ह्रष्टचित्त दक्ष वंदित । कर जोडोनी तयासी ॥३६॥जैसे मुद्गल मुखांतून स्त्रवलें । विघ्नपाचें चरित्र हें भलें । तैसें समग्र तुज सांगितलें । संपूर्ण मी शौनक मुने ॥३७॥तुमच्या संगतीनें मी पुनीत । जाहलों निश्चित । शौनका आणखी काय वांछा असत । श्रवण करण्या तें सांग ॥३८॥विघ्नराजासम नसत । विप्रा अन्य कांहीं बळवंत । चरित्र विघ्नराजाचें सतत । सर्व सिद्धिप्रदायक हें ॥३९॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराए सप्तमे खंडे विघ्नराजचरिते चरितमाहात्म्यवर्णनं नाम षोडशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।॥ इति श्रीमुद्गलपुराणे सप्तमः खंडः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP