खंड ७ - अध्याय ४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ गणेशाय नमः ॥ कश्यप कथा पुढची सांगत । ममासुर शंबरासी वंदित । सांगे वृत्तान्त समस्त । ऐकून शंबर आनंदला ॥१॥
आपुली मोहिनी सुता देत । शंबरासुर त्यास विवाहांत । तिच्या सहवासांत रमत । ममासुर कांहीं काळ ॥२॥
तदनंतर शंबर शुक्रास भेटत । प्रणाम करून त्या महाभागाप्रत । सांगे सर्व वृत्तान्त । शुक्राचार्य तैं निश्चय करी ॥३॥
दैत्येंद्रासी तो प्रेरणा देत । ते सर्व एकत्र जमत । शुक्र शंबरासमवेत । स्वयं ममासुरापाशीं गेला ॥४॥
शुक्राचें होतां आगमन । ममासुर प्रतापी करि वंदन । विनयानें हात जोडून । उभा राहिला समोर ॥५॥
शुक्रविप्राचें पूजन करित । प्रणाम करी हर्षयुक्त । त्याची आज्ञा लाभता बसत । आपुल्या आसनीं नम्रपणें ॥६॥
तदनंतर दैत्यगणही तेथ येत । सारे अत्यंत हर्षित । ममासुर सर्वांचें करी स्वागत । यथाविधि त्या वेळीं ॥७॥
तदनंतर सर्वांचे मत घेऊन । नीति विशारद शुक्र बोले वचन । ब्राह्मणहस्तें अभिषेक करून । ममानुसरासी राजा केलें ॥८॥
त्या दैत्याधीशाचें पांच प्रधान । नेमिले महाबलवान । प्रेत काल कलाप भीषण । कालजित्‍ तैसा धर्महन्ता ॥९॥
दैत्य दानवभूप राक्षस । हर्षयुक्त सारे त्या समयास । जयजयकार करिती विशेष । नंतर पातले स्वगृहासी ॥१०॥
ममासुर नंतर नगर शोभन । चिंतानाश सर्व शोभायुक्त महान । निमीं परिखावलयांकित प्रसन्न । विषयप्रिय प्रजा तेथ झाली ॥११॥
वर्णाश्रमयुत समस्त जन । निवास करिती तेथ येऊन । दैत्यादि विशेषें सत्ता पावून । शोभले त्या नगरींत ॥१२॥
ममासुर राजा त्य सर्वांस पाळित । हर्षभरित अत्यंत । त्यास दोन पुत्र तेजयुक्त । जाहले मोहिनीपासून ॥१३॥
समशील ते दैत्य मोदवर्धक । धर्म अधर्म नामें विशोक । सर्वत्र सदा निःशंक । पराक्रमी ते विहार करिती ॥१४॥
ब्राह्मणांनी त्यांचें नामकरण । केलें होतें शोभन । धर्म अधर्म दोघे समान । वयरूप पराक्रमानें ॥१५॥
त्या वोघांच्या संगतींत । ममासुर अत्यंत बळवंत । एकदा सासर्‍याकडून शुक्रास बोलावित । आपुल्या नगरींत ममासुर ॥१६॥
प्रणाम करून म्हणे स्वामी मी जगांत । समर्थ प्रसादें तुमच्या अविरत । आतां ब्रह्मांड जिंकीन । समस्त । आज्ञा द्यावी महायोग्या ॥१७॥
तुझ्या आज्ञावश मी असत । दास मीं जाण विपेंद्रा निश्चित । मज उपदेश करावा सांप्रत । सांगा आपुलें मनोगत ॥१८॥
कश्यप म्हणे ममासुराचें वचन । ऐकून शुक्रभक्तिही पाहून । तयास सांगे नीति वचन । ऐक म्हणे ममासुरा ॥१९॥
महासुरा गणेशवरदान लाभूत । समर्थ तूं असुर महान । गणेशभक्तियुक्त होऊन । जिंक सारें विश्व त्वरेनें ॥२०॥
परी एक गोष्ट सांगतों तुजला । दैत्येशा ती दृढ मनाला । ठसवी तूं आपल्या । द्वेष न करी विघ्नेश्वराचा ॥२१॥
कदापि त्याचा अपमान । न करी तूं मदोन्मत्त होऊन । तरी विशेषें राज्यसुख शोभन । भोगशील तूं सर्वदा ॥२२॥
तो दैत्यमुख्य तें मान्य करित । हर्षभरें असुरवीरां बोलावित । त्यांना सांगे सर्व वृत्त । आनंदलें समस्त दैत्यें ॥२३॥
वाहवा सुंदर हा विचार । ब्राह्मणांसी विचारा अगोदर । मुहूर्त शोभन गुणकर । हल्ला करण्या देवांवरी ॥२४॥
तैसा मुहूर्त विचारून । ममासुर करी प्रयाण । अपार सेना घेऊन । चतुरंग बळराजा ॥२५॥
नाना वाहनांत बैसून । दैत्येंद्र ठाकलें युद्धा लागून । शस्त्रास्त्रें करीं घेऊन । वीरमुख्य़ तैं एकत्र आले ॥२६॥
महासुरा सन्निध आले । महाबळी ते महावीर । शोभले । पर्वत उपटण्या बळ दाविलें । ऐसें अतर्क्य शक्तियुत ॥२७॥
प्रधानांसमवेत युद्ध पारंगत । आपुल्या पुत्रांसह बैसत । रथांत ममासुर विजयोत्सुक बळवंत । भोभला अत्यंत तेजानें ॥२८॥
द्वीपसहित पृथ्वी जिंकण्यास । सरसावले वीर ते त्या समयास । क्षत्रगण सारें जिंकून तयांस । स्ववश त्यांनीं तैं केलें ॥२९॥
तदनंतर पाताळ लोकांत । जाऊन शेषास ते जिंकित । महाबळी त नमत । अतुल शक्तींपुढें त्यांच्या ॥३०॥
तदनंतर ते तैत्येंद्र स्वर्गांत । इंद्रावरी चालून जात । सारे अत्यंत क्रोधयुक्त । इंद्रही लढण्या सरसावला ॥३१॥
सुरगणांसहित तो सुदृढ । ऐरावतावरी झाला आरूढ । गेला संग्रामंडळा प्रौढ । देववीरांसहित तेव्हां ॥३२॥
दैत्येंद्र शस्त्रसंघातें मारिती । सुरेंद्रासी त्वरितगती । इंद्रासी पकडून ते नेती । ममासुराच्या पुढयांत ॥३३॥
ममासुर इंद्रासनीं बैसत । दानवेंद्र त्यास सेवित । तदनंतर सत्यलोकांत । दूत आपला पाठविला ॥३४॥
त्याचा मानस जाणून । ब्रह्मदेव गेला पळून । त्याच्या संगें युद्ध भीषण । करण्या न धजे प्रजापती ॥३५॥
विधाता विष्णू सन्निध जात । रक्षी मजल ऐसें  विनवित । विष्णू त्यास घेऊन जात । शंभुदेवाच्या शरण तेव्हां ॥३६॥
ऐसा जाणून वृत्तान्त । ममासुर प्रतापवंत । कैलासीं सत्वर जात । महेश्वराशी लढण्यासि ॥३७॥
शिवलोकीं एकत्र जमत । भानुदेव शक्ति आदि देव समस्त । ते सर्वही विचार करित । निश्चय करिती युद्धाचा ॥३८॥
मरणाचा निश्चय करून । शंभुमुख्य सुरेश्वर महान । ममासुराशीं लढण्या भयहीन । प्रिये दिति ते निघाले ॥३९॥
सुलोचने दिती ऐक वृत्त । कश्यप तैं तिजपुढें सांगत । ममासुराचेंही सैन्य अपरिमित । सुसज्ज ठाकलें लढावया ॥४०॥
एवेंद्रासी मारण्या उत्कंठित । नाना वीर दैत्य सैन्यांत । ऐसे देव असुर सैन्य उद्युक्त झाले लढण्यासी ॥४१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे सप्तमे खण्डे विघ्नराजचरिते शिवममासुरसमागमो नाम चतुर्थोऽध्यायः समाप्त । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP