श्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय १६ वा

ब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.


श्री गणेशाय नम: ॥
भातुकोटी तेज अपरीमिता ॥ विश्वव्यापका विश्व नाथा ॥ रमाधन प्रीर्य भूताधी पते अनंता ॥ अमूर्त मूर्ता विश्वपते ॥१॥
मंदस्मीत वदन दयाळा ॥ पंचदशोध्याची अति निर्मळ ॥ मुक्तदेव शिवपद पावला ॥ स्नेहाळा तु वदलासी ॥२॥
त्याचा वंश असे पृथ्वीवर ॥ तयासी म्हणतो दळ शृंगार ॥ शिवपुत्र हे साचार ॥ आर्य क्षत्रीय राजेश्वर नाम तयाचे ॥३॥
ऋषी गोत्र प्रवरा सहित ॥ चालती वेदोक्त कर्म यज्ञोपवीत ॥ रुद्र गायत्री संध्या सहित ॥ कर्म आचरण अद्यापी ॥४॥
म्हणोनी नाम दळ शृंगार ॥ गोत्र ऋषीचे अद्यापी वर ॥ परी क्षेत्री राजेश्वर थोर ॥ उत्तम वंश तयाचा ॥५॥
ऐंसा पाहून सैन्य शुंगार ॥ हर्षे पाहे शंकर ॥ वर दीधला त्रीशुळधर ॥ तयासी जाणीजें ॥६॥
तुमचे वंशी मल्हारि देव ॥ निमीजा देवी पुजीति सर्व ॥ रुद्र गायत्री जप स्वानुभव ॥ ध्यान करावे शिवाचे ॥७॥
ऐंसे मुक्तदेवाचे आचरण ॥ परी हा आर्य क्षत्रीय जाण ॥ सोमवंश: नामाभीधान ॥ श्रोते जन परियेसा ॥८॥
चार वेंद ब्रह्म या पासून ॥ ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वण ॥ चारी खाणी चारी वर्ण ॥ परीसा खूण शास्त्राची ॥९॥
मुखा पोसान ब्राह्मण झाला ॥ बाहू क्षत्रीय सागरी नारायण ॥ ब्रह्म नाभी स्थानी उत्पन्न ॥ जेणे केली सृष्टी रचना ॥ वर्णा वर्ण निर्मीले ॥११॥
मुख्य वर्ण ब्राह्मण गुरु ॥ द्बीतिये क्षत्रीय राजेश्वर ॥ वैश्य शुद्र व्यापार ॥ पृथ्वी वरी करीताती ॥१२॥
सोमवंशी आर्य क्षत्रीय मुक्तदेव ॥ तो जाण राज्याधीश सर्व ॥ स्वकर्म तयाचे वैभव ॥ सर्व राज्ये क्षत्रियाचें ॥१३॥
ऐंसी झाली वंशोत्पती ॥ वर्षे चार जाहली तया निश्चीते ॥ कृत, त्रेता, द्वापार, कलीयुग निस्छीती ॥ राजयुक्ती क्षत्रीयाची ॥१४॥
आता मुक्तेश्वराचे वंश मंडण ॥ परंपरा चाले जाण ॥ त्यांचे कर्म आचरण ॥ सांगेन सज्जनहो ॥१५॥
इते ब्रह्मांड पुराणेतिहास ॥ भविषोत्तराचा अर्थ विशेष ॥ धर्म शास्त्र प्रमाण त्यास ॥ शोडषोध्याय गोड हा ॥१६॥
श्री शिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP