मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री मुक्तेश्वर आख्यान| अध्याय ३ रा श्री मुक्तेश्वर आख्यान कथा अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा श्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय ३ रा ब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे. Tags : mukteshvarpuranपुराणमुक्तेश्वर अध्याय ३ रा Translation - भाषांतर श्री गणेशाय नम: ॥ श्री शंकराय नम: ॥ शक्राने उपाय केला ते वेळी ॥ तप सांडावया उर्वशी पाठविली ॥ ते जावोनी या वहीली ॥ नाना कळा दावित ॥१॥मग जानुमंडळ तपेश्वरी । नेत्र उघडी तें अवसरी । उर्वंषी शिणली भारी ॥ लज्जित होउनी निघाली ॥२॥मग ब्रह्मा आणि शक्र चिंता करी ॥ सकळ देव निघाले जुझारी ॥ युध्द करिती नानापरी । तरी तो दैत्य नाटोपे ॥३॥अग्नी ज्वाले कासा वीस होती ॥ देवाची नचले तेथे युक्ती ॥ मग विष्णूशी करुणा भाकिती ॥ रक्ष रक्ष म्हणती आम्हातें ॥४॥मग ब्रह्मा विष्णू इंद्रादि देव सकळ मिळोन ॥ गेले सदाशिवाशी शरण ॥ म्हणती जानुमंडळ दारुण ॥ पृथ्वी वरी प्रळ्य मांडिला ॥५॥ब्रह्म वरे उन्मत झाला ॥ तो न गणी कवणाला ॥ कांही पाहिजे रचीला उपाये यासी ॥६॥नचले कवणाचा उपाय अवघे त्रासले देव पाहे ॥ त्रिभुवन हे जात आहे ॥ करावा उपाय लागेल ॥७॥ऐंसे एकता विबुध्द वचन ॥ महा कोपला त्रिनयन ॥ थरारीले जटा अतुन ॥ अद्भुत नवल वर्तंले ॥८॥स्वेद बिंदु निघाले ॥ ते मुखा परियंत आले ॥ तेंथे उध्दवले ॥ मुक्तदेव ॥९॥त्या क्रोध बिंदु चा उल्हाट तेथे ॥ पुरुष जन्माला अचाट ॥ किरिट-कुंडल सुभट ॥ पुरुष उत्कुष्ट उध्दवला ॥१०॥गळा शोभे रुद्राक्ष माळा ॥ शिवमंत्र जपे वेळो वेळा ॥ त्रीपुंड विभूति झळाला ॥ आरक्त पाटोळ नेसला ॥११॥तो उभा कर जोडोन विनवी शंकरा लागोन ॥ आम्हा निर्मिले काय कारण ॥ सांगपंचवदना ॥ दश नयेन स्वामी ॥१२॥ऐशी विज्ञाप्ती करी ॥ मग बोलिले त्रिपुरारी ॥ तूं यश वंत निर्धारी ॥ अक्षय समरी होय तुज ॥१३॥पुरुष चातुर्यंता पाहून ॥ संतोषला शिव आपण ॥ वर दिधल तया लगोन ॥ क्षत्रीय वंश म्हणोनिया ॥१४॥तुज जन्म ऋषी सवेळी ॥ म्हणोनी तुझी उत्तम कुळी ॥ मुक्तदेंव नाम ते वेळी ॥ अवडीने ठेवीले ॥१५॥मुक्तदेवासी बोलिले शंकर ॥ तुज आहे अभय वर ॥ त्रिभुवनी साचार ॥ यशवंत होसी तु ॥१६॥ऐसा वर देउनी जाण ॥ काय सांगे मुक्तदेवा लागोन ॥ तु जानु मंडळा प्रती वधून । यश घेइ सत्वर ॥१७॥सकळ परिवारा सहित ॥ सहारुनी होई यशवंत ॥ ब्रम्हा विष्णु इंद्रादि देव समस्त वर देते झाले ॥१८॥इति श्री ब्रह्मांडपुराण इतिहास ॥ धर्मंशास्त्रप्रमाण त्यास ॥ प्रसंग तिसरा संपूर्णमस्तु ॥ ओव्या ॥१९॥ N/A References : N/A Last Updated : February 06, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP