श्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय १ ला

ब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.


श्री गणेशाय नम: ॥ श्री सरस्वते नम: ॥ श्री गुरुभ्यो नम: ॥ श्री सांबसदा शिवाय नम: ॥
ॐ नमोजी गजवदना ॥ चतुर्दश विद्यांचा निधाना ॥ *नागा तना पन्नग भूषणा ॥ वक्ततुंडा तुज नमु ॥१॥
जये अनंत कल्याण वरदमूर्ती ॥ त्रैलोक्य भरीत तुझी कीर्ति ॥ चरा चर तुज नमिति ॥ श्री गणपती दयार्णवा ॥२॥
परशु अंकुश इक्षुदंड ॥ पाश गदा दंतखंड ॥ पंकज आणि कोदंड ॥ अष्ठ हस्ती आयुधे ॥३॥
मग नमू ब्रह्मनंदिनी ॥ विद्यादायक हंस वाहिनी ॥ बाळकावरी कृपा करुनी ॥ वाचे स्फूर्ति द्यावीं ॥४॥
अंबे तुझी कृपा जडे ॥ तरी मुखे वेदशास्त्र पढे ॥ तूंस्ने हे पाहसी पाषाण कडे ॥ तरी तो होय महामणी ॥५॥
मातें तुझेंनी वरदान ॥ जन्मांध ही पारखी रत्ने ॥ रंक ते होती राणे ॥ कृपेनें तुझिया सरस्वती ॥६॥
नमो सद्‌गुरु ब्रह्मरुपा ॥ जग व्यापका जग स्वरुपा ॥ स्वयं मूर्ती प्रकाश दीपा ॥ करी कृपा गुरुराया ॥७॥
जो निरसी मम वेदांत ज्ञान ॥ तया असें करतला मळ पूर्ण ॥ वंदिले तयाचे चरण ॥ ग्रंथारंभे आदरे ॥८॥
गुरु पद सर्वांत श्रेष्ठ ॥ त्याहुनी नाहीं कोणी वरिष्ठ ॥ कल्प वृक्ष म्हणावा विशेष ॥ तरी कल्पीले पुरविती ॥९॥
नमो श्रोते सज्जन ज्ञानसागर विचक्षण ॥ कथा परिसावी चित्त देऊन मुक्तदेव आख्यान वंशोत्पत्ती ॥१०॥
वाराणसी महापुरी ॥ मन कर्णिकेच्या तीरी ॥ मिळाले ऋषी बहु परिवारी ॥ अठ्यांशी सहस्त्रे त्या ठायी ॥११॥
सकळ ऋषी मिळोन पुसते झाले सुता लागोन ॥ कैसे झाले मुक्तदेव अख्यान ॥ वंश निर्माण तयाचा ॥१२॥
कैसी झाली तयाची उत्पत्ती ॥ ते सांगावी आम्हाप्रती ॥ कोण दैवत कोण भक्ति ॥ गायत्री जपती कवण ती ते ॥१३॥
काय तयाचे क्रिया कर्म ॥ कोण गोत्र कवण धर्मं ॥ सांगावे तयाचे वर्मं ॥ कृपा करुनी आम्हासी ॥१४॥
ॠषी वचने ऐकोनी संतोषला सूत मुनी ॥ बरवा प्रश्न केला म्हणोनी ॥ हर्षे उल्हासे ॥१५॥
पुढे कथा सुरस फार ॥ अमृताहुनी रसीक सार ॥ एकोन पंडित चतुर ॥ गुरुभक्त प्रेमळ ज्ञानीजे ॥१६॥
स्वस्ती श्री ब्रह्मांडपुराण इतिहास ॥ भविष्योत्तराचा अर्थ विशेष ॥ धर्मंशास्त्र प्रमाण त्यास ॥ प्रथमोध्याये गोड हा ॥१७॥
श्री कृष्णार्पणमस्तु: ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 06, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP