मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री मुक्तेश्वर आख्यान| अध्याय ५ वा श्री मुक्तेश्वर आख्यान कथा अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा श्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय ५ वा ब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे. Tags : mukteshvarpuranपुराणमुक्तेश्वर अध्याय ५ वा Translation - भाषांतर श्री मंगल मूर्तीय नम: ॥ श्री सरस्वते नम: ॥शक्तीने त्वरें करोनी ॥ सत्वर योगीनी मेळवोनी ॥ राक्षसाचे कधिर भक्षुनी ॥ विजयी झाले ते काळी ॥१॥ऐंशा परी राक्षस वधूनी विजयी झाला समरांगणी ॥ वाद्य ध्वनी गर्जत ॥२॥राक्षस वधिला सह परिवारी ॥ सकळ गर्जती जय जय कारी ॥ अपार वर्षती सुमनसंभारी ॥ सकळ सुरवर मिळोनी ॥३॥देव दुंदुभी गर्जीन्नले ॥ सकळ ऋषी आनंदले । मुक्तदेव परतोनी आले ॥ यज्ञा जवळीके ॥४॥ऋषीस साष्टांग नमस्कारीले ॥ सकळे मुक्तासी अलंगिले ॥ करोनि यज्ञाची समाप्ती ॥५॥मुक्तदेव घेऊनी सांगाती ॥ सकळ सुरगण संगती ॥ शिवपुरा पातले ॥६॥ब्रह्मा विष्णू इंद्रादी देव ॥ हर्षे निर्भंर झाले सर्वं ॥ गंधर्व गाती अपूर्व ॥ आनंद किती वर्णिती भाट ॥७॥मग बैसोनी दिव्य विमानी ॥ आनंदे नेला कैलास भुवनी ॥ मुक्तदेंवाची कीर्ति जनी । देव मूर्खे वर्णिती ॥८॥पाहोनि हर्षला श्री शंकर ॥ अवघी केला साष्टांग नमस्कार । म्हणती धन्य धन्य हे वीर ॥ विजयी असे सर्वदा ॥९॥क्षत्रीया माजी सुर ॥ पृथ्वीचे राज्य दोधले समग्र ॥ आर्यां देशी भूपति वीर ॥ ऐसे उत्तर शिवे केले ॥ सकळासही मानीली मात ॥१०॥दुर्वास ऋषीं आवश्य म्हणत ॥ मंगल लग्न कयावया समस्त ॥ बृहदारण्या पातले ॥११॥ ब्रह्मा विष्णू इंद्रादि देव समस्त ॥ शिव पातले गणा सहित ॥ पार्वती लक्ष्मी सावित्रि सत्य ॥ मुख्य तेथे वर्हाडिणी ॥१२॥आणिक ऋषी पत्न्या पातल्या ॥ ते वेळे देव पत्न्या आल्या ॥ सकळ विश्व कर्म्याशी बोलाविले ॥ मंडपासी संभ्रमे ॥१३॥विष्णूने आज्ञपिले विश्व कर्म्यांसी ॥ मंडप करावा चौपासी ॥ आज्ञा होताची ऐंसी ॥ मंडप सिध्द केला ॥१४॥सुमुहुर्त पाहोनि सत्वर ॥ लग्न आरंभिले गजर ॥ तत चित्तंत घन सस्वर ॥ नाद अपार गर्जती ॥१५॥सुमुहुर्त पाहोनी सुभट ॥ ब्रह्मा धरी अंतर पाट ॥ ॐ पुण्य करोनि एकवट ॥ वेदघोष गर्जती ॥१६॥मंगळाष्टक झालियावरी ॥ लाज्याहोम करोनी ते अवसरी ॥ कन्यादान करावया झडकरी ॥ दुर्वास भार्या सहित पातला ॥१७॥कन्यादान करुनि निगुती ॥ देव दुंदुभी वाजविती ॥ नाना वाद्य वाजविती ॥ कन्या मुक्ता होती समीपले ॥१८॥ऐसा जाहला लग्न सोहळा नाना उपचार वेळो वेळा ॥ दुग्ध वाटी पार्वती वेंल्हाळा ॥ मुक्त तोंडी लाविली ॥१९॥ऐंसा महोत्सव पांच दिवस ॥ मुक्तदेव पुजोनी सर्वांस ॥ ब्रह्मा विष्णूशी पूजीले ॥२०॥सर्वांसी पूजोनी यकसरा ॥ वस्त्र भूषणे शोडशोपच्चारण रत्न खचित अलंकार ॥ सुरवरा पुजीलें ॥२१॥मग समस्त देव मिळोन ॥ महीष्मती नगरी जाण ॥ राज्यभिषेक करुन ॥ विधीनें भूपति स्थापिला ॥२२॥इती श्री ब्रह्मांडपुराणे तिहास ॥ भविषोतराचा अर्थ विशेष ॥ धर्मंशास्त्र प्रमाणे त्यास । पंचमोध्याय गोड हा ॥ श्रीपरमेश्वरार्पंणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : February 07, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP