मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री मुक्तेश्वर आख्यान| अध्याय ११ वा श्री मुक्तेश्वर आख्यान कथा अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा श्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय ११ वा ब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे. Tags : mukteshvarpuranपुराणमुक्तेश्वर अध्याय ११ वा Translation - भाषांतर श्री गणेशाय नम: ॥ श्री सरस्वते नम: ॥मुक्तदेव पातला स्वनगराप्रति ॥ आनंदे किती येक काळ पर्तती ॥ स्नुशा सहित भूपति ॥ राज्य करीत स्वानंदे ॥१॥राजी स्थापून पुत्रासी ॥ आपण राज्य करी स्वदेशी ॥ स्नुशा तरुण रुपासी ॥ यौवन नी सुरे पुत्र तो ॥२॥वृध्द काळ गति कळली ॥ प्रभावती देवाज्ञा पावली ॥ पुत्र स्नुषा आक्रंदली ॥ मुक्तदेवासी ओस दस दिशा ॥३॥मुक्तदेव म्हणे आता संसारा ॥ व्यर्थ काय भूमी भार ॥ आता सेऊन वनांतर ॥ मग ऋषीश्वर बोधीले ॥४॥मुक्तदेव वनांतरी ॥ शिवार्चन वीधि ध्यान करी ॥ मग प्रसन्न झाले त्रिपुरारी ॥ आले सत्वर उमे सहित ॥५॥ शिव पार्वती म्हणे पुत्र राया ॥ कां आठविले मज सखया ॥ मुक्तदेव वदोनी पाया ॥ म्हणे भार्या देवाज्ञा पावली ॥६॥आता व्यर्थ काय संसार ॥ भार्या विण व्यर्थ नर ॥ काय वाचोनी भूमी भार ॥ येईन तव समागमे ॥७॥ ऐकोनी पार्वते ने धरीले पोटी ॥ तेव्हां बोलिले धुर्जेठी ॥ स्त्रीची कायेसी गोष्टी ॥ ऐक राहटी परंपरा ॥८॥क्षण भंगूर हा प्रपंच जाण ॥ व्यर्थ सीन कां करिसी ॥९॥प्रपंचा तितुका तितुका नाशीवंत ॥ मिथ्या मय नव्हे शाश्वत ॥ पंचभूते आव्याक्रत ॥ यथा प्रकारे वर्तती ॥१०॥परमात्मा शाश्वत जाण ॥ तो सर्वा भूति असे व्यापून ॥ आला गेला म्हणून ॥ व्यर्थ कल्पना वाढविती ॥११॥परी तो गेला ना आला ॥ जेथीचा तेंथेची राहीला । अचळ अंतरात्मा बोलीला ॥ तो चळेना ढळेना ॥१२॥तैसां तूं अखंड ब्रह्मारुप शिवशक्ती रुप तूचीं तूं ॥१३॥प्रकृति साठी शोक करिसी ॥ जैसें मृग जळ न्याये निश्चयेसी ॥ परी ते साक्षात रुप वीवसी ॥ दाटोनी घरासी आणावी ऐंसा बोध करोनी मुक्ता प्रती ॥ केले नीगृती प्रयाण ॥१४॥इति ब्रह्मांड पुराणेतिहास ॥ भविषोत्तराचा अर्थ विशेष ॥ धर्म शास्त्र प्रमाण त्यास ॥ एकादशोध्याय गोड हा ॥१५॥ श्री कृष्णार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : February 07, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP