TransLiteral Foundation

श्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय ६ वा

ब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.


अध्याय ६ वा
श्री गणेशाय नम: ॥ श्री गुरुभ्यो नम: ॥
राज्यभिषेक ॥ सप्त मृत्तीका पंच पल्लव ॥ चतु:समुद्राचे नीर सर्व ॥ पंचामृत आणोनी भाव । मंगळ स्नान मुक्त देवा घातले ॥१॥
मग मुक्त देवासी सिंहासनी स्थापून ॥ अर्धांगी प्रभावती दिव्य रत्न ॥ समुद्र वलयांकित राज्य संपूर्ण ॥ दिधले समस्त देव मिळोनी ॥२॥
अठ्यांशी सहस्त्र मिळोन समस्त ॥ गोत्र परीवारा सहित ॥ आशिर्वाद करोनी ॥ द्महस्त मस्तकीं ठेविले तयाचे ॥३॥
मग मुक्त देवासी शिवे आज्ञापिले ॥ जाणू मंडळ तपस्वी वधिले ॥ त्याचे शरीर पाहिजे केले ॥ कार्या कारण उद्योग ॥४॥
तरी ऐक एक मात ॥ तपस्वी तो दैत्य बहुत ॥ त्याचे आस्ती मांस समस्ता ॥ निष्कारण जाऊ नेंदी ॥५॥
अस्तीचे कवच करिइ खड्‌ग जाचे चर्म मेण ॥ कवच चर्माचे करि जाण ॥ करी शस्त्रांसी रक्षण ॥ रोमही वाया जाऊ नेदी ॥६॥
मुक्तदेव म्हणे स्वामी परम ॥ परी हे माझे नव्हे कर्म ॥ स्वामी बोलीले अनुक्रम ॥ म्हणोनी वचन परिसावे ॥७॥
आवश्य म्हणोनी मुक्तदेव ॥ मग तयाचे घेतलें आस्ते चर्म सर्व ॥ सर्व कार्याकारण अर्पूव ॥ कारणी तयासी लाविले ॥८॥
हास्त पायाचे चर्म काढून ॥ केला टोप सुंदर जाण ॥ तळव्याचे चर्म काढून ॥ कवचे तीन पै केले ॥९॥
एक कवच दिधले इंद्रा प्रती ॥ एक सूर्यसी दिधलें नीगुती ॥ एक कवच कमळा प्रति ॥ कारण दिधले जाण ॥१०॥
अस्थीचे केले म्यान ॥ सकळ श्स्त्रासी रक्षण ॥ सैन्य मंडळ तेणें करुन ॥ केलें जाण विधीयुक्त ॥११॥
वारुसी खोगीर जीण ॥ कडापट्टा शोभाय मान ॥ ऐंसे शृंगारोनी सैन्य ॥ राज्य पदी बैसले ॥१२॥
म्हणोनी नाम दळ शृंगार ॥ वंशी रुषी गोत्र अद्यापी वर ॥ वरी आर्या देशी राजेश्वर ॥ उत्तम वंश तयाचा ॥१३॥
ऐंसे झालियावरी ॥ येरी कडे अवधारी ॥ राज्य स्थापून ते अवसरी ॥ आपल्या नगराप्रती गेले सर्व देव ॥१४॥
इति श्री ब्रह्मांड पुराणेतिहास ॥ भविष्योत्तराचा अर्थ विषद ॥ धर्म शास्त्र प्रमाणत्यास ॥ शष्टमोध्याय गोड हा ॥१५॥
श्री सांबसधाशिवार्पणमस्तू ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-02-07T01:32:37.1070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

डिचकें

 • ḍicakēṃ n Washy stuff. Used of sloppily boiled rice or other corn or of pulse; as भाताचें-जोंधळ्याचें -राळ्याचें-वरणाचें डिचकें. 
RANDOM WORD

Did you know?

चंद्र व सूर्य यांच्या ग्रहणी जन्म झाल्यास त्याचे काय परिणाम होतात? शांती, विधी काही आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,450
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,879
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.