श्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय १२ वा

ब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.


श्री गणेशाय नम: ॥ श्री सरस्वते नम: ॥
मुक्तदेव राहिले वनांतरी ॥ ध्यान अनुष्ठान तपश्चर्या करी ॥ येरी कडे ते अवसरी ॥ कथा कैंसी वर्तली ॥१॥
मुक्तदेवाचे पुत्र जाण ॥ निघाले जळक्रीडा करावया जाण ॥ भार्यासहित वन भोजना ॥ करावया चालिलें ॥२॥
वन पाहोनी संपूर्ण ॥ तेथे सरोवर होतें जाण ॥ गंधर्व गाती गायन ॥ मृग पक्षी नाना कुळ ॥३॥
सिंह शार्दुल घनदाट ॥ वृक्ष लागले अचाट ॥ वन शोभीवंत परीपाट ॥ झुळ झूल नदी असें वाहत ॥४॥
ऐंसीया वनामाजी जाण ॥ स्त्रींया करी जळक्रीडा नग्न ॥ करिती जाण उन्मत भोगविलास परीमान ॥ क्रीडा संपूर्ण करिताती ॥५॥
क्रीडा करिताम ते समई ॥ रोमहर्षण आले ते ठाई ॥ वलकल वेष्टीत वीभत्स पाही ॥ पाहते झाले ॥६॥
ऐंसे देखोनी ऋषी ने शाप शस्त्रे ताडीले ॥७॥ ऋषी क्रोधावला भारी ॥ म्हणे तुम्ही व्हाल व्यभिचारी ॥ वेद विरहित नानापरी ॥ अनाचार वर्तला ॥८॥
व्हाल तुम्ही राजभ्रष्ट ॥ ऐंसे शापीत रुपी श्रेष्ठ ॥ मग सद्‌गदित होउनी स्पष्ट ॥ कर संपुष्ट जोडीला ॥९॥
म्हणे स्वामी अपराध घडला ॥ म्हणोनी साष्टांग दंडवत घातला ॥ न जाणोनी स्वामीस छळ केला ॥ आता क्षमा केली पाहिजे ॥१०॥
बाळक पासून अन्याय होती ॥ ते कार्य मायबापे धरावे चित्ती ॥ तैसीच हे ही जाहली गती ॥ कृपा मूर्ती उ:शापावे ॥११॥
ऐंसे म्हणोनी धरीलें चरण ॥ ऋषीस कळवळा आला जाण ॥ तयासी बोलीले वचन ॥ ऐंका सावधान सकळही ॥१२॥
ऋषी गोत्रि परिवार चालती ॥ स्वकर्म राहिली निश्चीती ॥ परी राज्याची प्राप्ती ॥ पासून भ्रष्टले ॥१३॥
भारद्वज वशीष्ट गौतमांगीर ॥ च्यवन गर्ग जाबळी कौंडिण्य परी कर ॥ अष्ट गोत्र वंश प्रवर ॥ समरसे चालती ॥१४॥
मग मुक्त पुत्र म्हणती जाण ॥ स्वामी झालो राज्येहीन ॥ पशु वत देहे: झाला गळीन ॥ उदर पोषण कैसे करावे ॥१५॥
ऋषी म्हणते चिंता न करी नाना ॥ कळा कुशळ विद्या प्रवीण ॥ चित्र तगटगर, सुवर्ण ॥ कर्म करणे लोहारी सुतारी सर्वही ॥१६॥
जं कला दृष्टी पडे ॥ तें तें तुम्ही करणे घडे ॥ आता शिव वर देईल पुढे ॥ तैसे घडे तुम्हासी ॥१७॥
ऐंसे बोलून वचन ॥ आश्रमा गेले ऋषी जाण ॥ यरी कडे वर्तमान ॥ मुक्तदेवाप्रती कळला ॥१८॥
इती श्री ब्रह्मांडपुराणेतिहास । भविष्योत्तराचा अर्थ विशेष ॥ धर्मशास्त्र प्रमाण त्यास ॥ द्वादशोध्याय गोड हा ॥१९॥
श्री कृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP