श्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय ९ वा

ब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.


श्री गणेशाय नम: ॥ श्री गुरुभ्यो नम: ॥
मुक्तदेव हिंडता वनांतरी ॥ संगे प्रभावते सुंदरी ॥ तव एक च्युत वृक्षावरी ॥ चक्रवाक क्रीडा करिती ॥१॥
तयासी होता मुक्तदेव दर्शन ॥ गंधर्व रुप झाले सगुण ॥ तो उभा राहिला कर जोडोन ॥ मुक्त चरण वंदिती ॥२॥
तयासी पुसे मुक्तेश्वर भूपति ॥ तुम्ही कोण या वनाप्रति ॥ तव ते झाले बोलते ॥ समुळ वृत्तांत आपुला ॥३॥
आम्ही स्वर्गीचे गंधर्व जाण ॥ चित्राख्यान नामाभिधान ॥ भार्या सहित क्रीडाक्या जाण ॥ वना माजी आलो ॥४॥
भार्या सहित जळ क्रीडा करीत ॥ ऋषी कश्यप आला अकस्मात ॥ जटाधारी वलकल वेष्ठित ॥ वीभक्त रुप पाहतां दिसे ॥५॥
ऐंसे रुप पाहून अकस्मात ॥ आम्ही वीभत्स केले. अध्दूत ॥ सीकता पाषाण ताडील त्यात ॥ उन्मत्त पण बळ ॥६॥
क्रोधावला ऋषी दारुण ॥ वीभत्स रुप आरक्त लोचन ॥ पिंगट स्मभृ पूर्ण ॥ शाप शास्त्रे ताडीला ॥७॥
मदोन्मत्त झालासी नीका ॥ पत्नी सहित होईल चक्रवाक ॥ अजुत वृक्षावरी येक ॥ क्रीडा समेक दोघे जन ॥८॥
ऐंसे ऐकता शाप वचन ॥ मग चरण लागला धाऊन ॥ नानापरि विनविता जाण ॥ मग उ:शाप वचन बोलीली ॥९॥
शिवपुत्र आर्या क्षेत्री ॥ भार्यासहित येईल वनांतरी ॥ त्यासी पाहता निर्धारी ॥ मग स्वरुपधारी होसील ॥१०॥
ऐंसे बोलोनी उ:शाप वचन ॥ ऋषी आश्रमा गेला जाण ॥ तै पासोन चक्रवाक देह पावोन ॥ वनी क्रीडते अच्युत वृक्षी ॥११॥
आता आपले दर्शन भूपति ॥ गंधर्व झालो पावोन स्वर्गा प्रति ॥ मुक्तेश्वर आशमाप्रती ॥ आपल्या महीष्मती पावला ॥१२॥
इति श्री ब्रह्मांडपुराणेतिहास ॥ भविष्योत्तराचा अर्थ विशेष ॥ धर्मशास्त्र प्रमाण त्यास ॥ नवमोध्याय गोड हा ॥१३॥ श्रीकृष्णार्पमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP