श्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय १३ वा

ब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.


श्री गणेशाय नम: ॥ श्री कृष्णाय नम: ॥
नारद येवून सत्वर ॥ वृतांत सांगीतले समग्र ॥ रोमहर्षण येवून रुशेश्वर ॥ तुझे पुत्र श्रापीले ॥१॥
वेद वीरहित राज्यभ्रष्ट ॥ अनाचार कर्म प्रवीष्ट ॥ इतुके ऐकून अति कष्ट ॥ मुक्त स्पष्ट मानीले ॥२॥
म्हणे आहारे कर्म नष्टा ॥ काय पावले हे कष्टा ॥ मरणा परीस वोखटा ॥ अरीष्ट झाले जाणपा ॥३॥
मुक्तदेव जावोनी वनांतरी ॥ उभा ठाकला एका अंगुष्टावरी ॥ उर्ध्व मुख ते अवसरी ॥ स्तुति सह परिवारी आरांभिली ॥४॥
जय जयाजी शूळ पाणी ॥ कैलास वास नंदी वहनी ॥ पर ब्रह्मास्वामीनी महाराज ॥५॥
जय जयाजी त्रीपुरारी ॥ जयजी त्रेशुळधारी ॥ जये जयाजी दारीद्र हारी ॥ कृपा करी गौरी हारा ॥६॥
जय जयाजी भूत नायका ॥ जय जयाजी जगव्यापका ॥ जय जयाजी त्रीपुरांतका ॥ वरदायका भक्तासी ॥७॥
ऐंसी स्तुति करीता जाण ॥ कैलासाहुनी उतरले त्रीनयन ॥ पार्वती सहति आपण ॥ मुक्ता जवळी पातले ॥८॥
द्वादश वर्षा उपरी जाण ॥ कैलासाउन आले आपण ॥ मुक्तदेवासी म्हणे पुत्र श्रापीलें लोमहर्षण मुने ॥ काये गती पुत्रा लागोणी ॥ राज्ये भ्रष्ट झालेका ॥१०॥
जंसे पशूचे जीर्ण ॥ तैसे तया लागून ॥ पुढे गती तयाची जाण ॥ कैसी होईल सांगपा ॥११॥
धोग्ग जीर्ण पृथ्वी माजी नीगुती ॥ काय वाचोनी हे पुढती ॥ हे ऐका पशु पती ॥ काय गती माझी या पुढे ॥१२॥
तुवा पुत्राची चिंता न करणे ॥ ते होतील सर्व विद्या संपन्न ॥ नाना कळा कुशळा संपूर्ण ॥ तया अंगी वसतील ॥१३॥
चित्रकार सुवर्ण कर्म ॥ राजद्वारी संभ्रम ॥ नाना कर्म करतील ॥१४॥
जीन बंदी सैन्य मंडणे ॥ सैन्य शृंगार या पासून ॥ सरस्वती सदा प्रसन्न ॥ कळा येक्त सर्व ही ॥१५॥
चालले सकळ वेद मार्ग ॥ मौंजी बंधन वेदोक्त सांग ॥ स्वधर्माचार सवेगा । आर्य क्षत्रीय वंश ते ॥१६॥
घोडा हास्ती शृंगार करण॥ शिबीका चित्र विचित्र कर्त जाण ॥ नाना कला कुसरी जाण ॥ अक्षयी वरदान असें माझे ॥१७॥
ऋषी गोत्र प्रवर्तती ॥ भारद्वज वशीष्ट मूर्ती ॥ गौतम अंगीरा सकळ वस्ती ॥ गर्ग जांबली कौंडिण्य ऋषी ॥१८॥
प्रवरासहित गोत्र ॥ नित्य वर्तति कर्म वेदोक्त पवित्र ॥ शास्त्र युक्त प्रमार्वतत ॥ युगा युगा नीती चालीले ॥१९॥
तुझे पुत्रांची गती ऐंसी असे ॥ राज्य मात्र भ्रष्टले दीसे ॥ लग्न मुंज वेदोक्त ऐंसे ॥ परंपरा चालत्ती ॥२०॥
ऐसा वर देउन सत्वर ॥ संतोष करोनी मुक्तेश्वर ॥ शिव गेले कैलास शिखरा ॥ आपले स्वमंदिरा पै गेले ॥२१॥
इति ब्रह्मांड पुराणेतिहास ॥ भविषोत्तराचा अर्थ विशेष ॥ धर्म शास्त्र प्रमाण त्यास ॥ त्रयोदशोध्याय गोड हा ॥२२॥
प्रसंग ॥१३॥ ओव्या ॥२२॥ संपूर्णमस्तु ॥ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP