शनिवार सायंस्मरण - भजन - सदगुरुनाथे माझे आ...

हरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .


भजन - सदगुरुनाथे माझे आई ०।

रंगणी तू येई आता शीघ्र गणपते हो ॥धृ०॥

वक्रतुंड एकदंत । पाशांकुश वरदहस्त ।

अर्धचंद्र शिरी किरिट । रत्न झळकते हो ॥१॥

नंदीवाहन मदनदहन । भक्त त्रिविधताप शमन ।

भस्म अंगी रुंडमाळ । कंठी शोभते हो ॥२॥

आनंदतनय मधुरवाणी । गणपतीगुण नमनपाणी ।

चरणकमली भ्रमर होउनि । अमृत सेविते हो ॥३॥

भजन - पार्वतीच्या नंदना ०।

प्रेमळ तू गुरुमाय । माझी ॥धृ०॥

जगदोद्धारा अवतरोनि । दाविले आम्हा पाय ॥१॥

बद्ध मुमुक्षु साधकांसि तू । दाविसि सुलभ उपाय ॥२॥

तुज सोडुनि व्रत जप तप खटपट ।

करिता होती अपाय ॥३॥

निजभक्तांसी इच्छित देउनि ।

दिननिशी श्रमविसी काय ॥४॥

कलिमलदहन करोनि सखंया ।

पाजी निजप्रेमपय ॥५॥

भजन - आनंदे गुरुमाय ०।

श्रीसदगुरुपदकमली भृंग होई रे ॥धृ०॥

पळ पळ आयुष्य जाय । न मिळे पुन्हा मानवकाय ।

भवसागर तरणोपाय । हाचि पाहि रे ॥१॥

विषयसुखी होउनि रत । जनीमृति आपदा प्राप्त ।

सोडविण्या गुरुविरहित । कोणी नाही रे ॥२॥

चारी -सहा -अठरा वदति । गुरुविण नाही जीवा गति ।

ऐसे सांगे रुक्मिणीप्रति । सिद्धआई रे ॥३॥

भजन - शांत किती ही ०।

दीनको दयाळ छांड कौन शरण जाऊं ।

एक धाम निराकार सोहि धाम पावूं ॥धृ०॥

एक वचन , एक बाण , एकपत्नि शय्या ।

ऐसे प्रभु छांडके हम कौनकू भजूं भैय्या ॥१॥

जिन घटमे रामनाम सोहि घट सच्चा ।

रामको स्वरुप जाने सोहि गुरुका बच्चा ॥२॥

रघुरामचंद्रने स्वरुपसगुणधारी ।

सबनको करी उद्धार पिंगला उद्धारी ॥३॥

प्रभु गरीबनके निवाज मैं गरीब तेरा ।

एक बार मुखसे कहो तुलसीदास मेरा ॥४॥

भजन - सीताराम जय जय राम ०।

हे कमलजीवना कमललोचना तारी आता । देवा ॥धृ०॥

कमलावरा तुजवाचुनि कष्टी । कमलाधीशा तुज पहाता पुष्टी ।

कमलाकरा तू पाहुनि दृष्टी । तोषवि झणी ताता । देवा ॥१॥

कमलाकांता नाम दे ओष्टी । कमलानाथा करी कृपावृष्टी ।

कमलाक्षा मज करी संतुष्टी । तुजविण न त्राता । देवा ॥२॥

कमलप्रियतमा वारी भवभया । कमलापते मज देई अभया ।

कमलारमणा रुक्मिणीप्रिया । ठेविन पदी माथा । देवा ॥३॥

भजन - उपेंद्रा ०।

भवसिंधु तारी ही गुरुमाय । त्रिताप हारी ही गुरुमाय ।

पाप दूर करी ही गुरुमाय । संकट वारी ही गुरुमाय ॥१॥

दयेचा सागर ही ०। ज्ञानाचे आगर ही ०।

प्रेमाचा पाझर ही ०। भक्तांचे माहेर ही ०॥२॥

अनाथनाथ ही ०। करी सनाथ ही ०।

त्रिगुणातीत ही ०। त्रिपुटिरहित ही ०॥३॥

सुमार्ग दावी ही ०। अज्ञान घालवी ही ०।

बोधामृत पाजवी ही ०। आनंदे नांदवि ही ०॥४॥

पतितपावन ही ०। नित्यनिरंजन ही ०।

करी मनरंजन ही ०। कलिमलदहन ही० ॥५॥

भजन - ॐ नमः शिवाय , तरणोपाय ०।

हरिसे कोई नही बडा । दीवाने क्यों गफलतमे पडा ॥धृ०॥

प्रल्हाद बेटा हरिसे लपटा । जबी खंब कडकडा ॥१॥

गोपीचंदा बचन सुनाकर । महाल मुलुख सब छोडा ॥२॥

हनुमानने सेवा कीनी । ले द्रोणागिरि उडा ॥३॥

पुंडलिकने सेवा कीनी । विठ्ठल बिटपर खडा ॥४॥

कहत कबीर सुन भाई साधु हरिचरण चित्त जडा ॥५॥

भजन - बेळगांव शहरी अनगोळमाळी ०।

साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ।

ठायीच मुराला अनुभवे ॥१॥

कापुराची वाती उजळली ज्योती ।

ठायीच समाप्ति झाली जैसी ॥२॥

मोक्षरेखे आला भाग्ये विनटलां ।

साधुचा अंकीला हरिभक्त ॥३॥

ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी

हरि दिसे जनी वनी आत्मतत्त्वे ॥४॥

भजन - सदगुरुमाय दाखवि पाय ०।

अर्जी ते गुरुपादुकाष्टक

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP