शुक्रवार प्रातःस्मरण - प्रारंभीपासून भजन - गुरुर...

हरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .


प्रारंभीपासून भजन - गुरुराया मजवरी ०।

उठि उठि रे राजगोपाला । मुखप्रक्षालन करुनि सत्वरि सेवि भाकरकाला ॥धृ०॥

दारी उभी बहु भक्तमंडळी । सप्रेमभावे जोडुनि अंजुळी ।

विनविताती तुज वनमाळी । वाढ वेळ झाला ॥१॥

संत सनकादिक अत्रिमुनि । वशिष्ठ पराशर शुक जैमिनी ।

व्यास वाल्मिक नारदमुनि । वाट पाहति नंदलाला ॥२॥

न्हाऊ घालण्या घेउनि डेरा । आला भक्त कुंभार गोरा ।

सावंत्याने आणिला हारतुरा । कबीराचा पहा शेला ॥३॥

तुझा नामदेव शिंपी । घेउनि आला अंगी -टोपी ।

आता जाऊ नको बा झोपी । दर्शन दे सकलाला ॥४॥

नरहरि सोनार कडदोरा तोडे । रोहिदास चांभार सुंदर जोडे ।

जनीने आणिले दूध दहिवडे । सेवि बा मुरलीवाला ॥५॥

अंगण झाडी महार चोखा । सडासंमार्जन करिते बंका ।

घाली लोटांगण कुंभार राका । देई तुका गूळ -खोबरे तुला ॥६॥

घाली रांगोळ्या सखु महाद्वारी । तोरणे बांधी मीरासुंदरी ।

कान्हुपात्रा नृत्य करी । गीत गाई रुक्मिणीबाला ॥७॥

भजन - गुरुवरा सदगुरुवरा ०।

भवकूपी मी पडलो रे । षड्रिपुमाजी दडलो रे ।

त्रिविधतापे कडलो रे । तू धाव बा गुरुराया ॥१॥

चौर्‍यांशी योनी फिरलो रे । विषयसुखा अनुसरलो रे ।

स्वात्मसुखा विसरलो रे । तू ०॥२॥

नवमास मायोदरी राहिलो रे । तेथे नरकाशी वाहिलो रे ।

तुज विसरुनि मी फसलो रे ॥तू०॥३॥

बाळपणी अति खेळलो रे । तरुणपणी कामी मळलो रे ।

वृद्धपणी आता गळलो रे ॥तू०॥४॥

तुजविण मी परदेशी रे । एकवेळ ने पायापाशी रे ।

करि कलिमलहरणाशी रे ॥तू॥५॥

भजन - मजला उद्धरि ०।

क्या पानीमे मल मल न्हावे । मनके मैल उतार पिया रे ॥धृ०॥

हाडमांसकी देह बनी है । जरे सदा नवद्वार पिया रे ॥१॥

पापकर्म तनके नही छोडे । कैसे होय सुधार पिया रे ॥२॥

संतसंगतकी तीर्थजल निर्मल । नित उठ गोटा मार पिया रे ॥३॥

ब्रह्मानंद भजन कर हरिका । जो चाहे निस्तार पिया रे ॥४॥

भजन - जगदीशा ०।

परदेशी मी परदेशी । बाई । माय बाप कोणी नाहीत मसी ॥धृ॥

पति म्हणे कांता सुत म्हणे माता ।

पति सुत कोणी नाहीत मसी ॥१॥

बंधु म्हणे भगिनी दीर म्हणे वहिनी ।

बंधु दीर कोणी नाहीत मसी ॥२॥

उपाधिरहित मी असे सदोदित ।

रखुमाईवराविण कोणी नाहीत मसी ॥३॥

भजन - श्रीकृष्ण चैतन्यप्रभु नित्यानंदा ०।

भवांबुधितारका । माझ्या पंढरीच्या नायका ॥धृ०॥

भीमातटनिकटी । कर ठेउनिया कटी । उभा विटेवर कां ? ॥१॥

पिवळा पीतांबर । कंठी तुळसीहार । कपाळी शोभे बुका ॥२॥

सदोदित हास्य ओठी । नासाग्री ठेउनि दृष्टी । भक्तां मारिसि हाका ॥३॥

मायबापगणगोत । सर्व असे परि । तुजविण न दिसे सखा ॥४॥

नाम तुझे बहु गोड । परि न घे मन द्वाड । प्रयत्न जाय फुका ॥५॥

निद्रा आळस सदा । भोगविती आपंदा भजनात देती धक्का ॥६॥

देई संतसंगती । भजनी रंगवी मति । पुंडलिकवरदायका ॥७॥

तेहतीस कोटी देव । तेथे न वसे भाव तुजविण नेणे आणिका ॥८॥

चरणकमली शिर । राहो निरंतर । रुक्मिणीच्या मालका ॥९॥

भजन - तुमबिन गुरुजी ०।

नजरोंसे देख प्यारे । क्या रुप है तुम्हारा ।

अपनेको भूल तनमे । बाहिर फिरे गव्हारा ॥धृ०॥

करमे कंकण छिपावे । ढूंढनको दूर जावे ।

फिरके समीप पावे । मनमे करो विचारा ॥१॥

मृगनाभीमे सुगंधी । सुंगे ओ घांस गंधी ।

दुनिया सबी है अंधी । समझे नही इशारा ॥२॥

जिम दूधके मथनसे । मिलता है घी जतनसे ।

तिम ध्यानकी लगनसे । परब्रह्म ले निहारा ॥३॥

जड जान देह सारी । क्षणभंग दुःख हारी ।

ब्रह्मानंद निर्विकारी । चेतन स्वरुप न्यारा ॥४॥

भजन - सच्चिदानंद कृष्ण ०।

गुरु माझा मी गुरुंचा । दास त्यांचा बहुजन्मीचा ॥१॥

चरणी जडले मन हे माझे । आता कवणा घालू मी ओझे ॥२॥

गुरुवाचुनि दैवत नाही । आता शिणलो बहुतां ठायी ॥३॥

म्हणे केशव मी तल्लीन । आता कवणा जाऊ मी शरण ॥४॥

भजन - चला चला रे सर्व मिळोनि ०।

शेवट गोड करी ०। ते विज्ञापना -

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP