शनिवार प्रातःस्मरण - प्रारंभीपासून भजन - गुरु...

हरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .


प्रारंभीपासून भजन - गुरुराया मजवरी ०।

उठोनिया प्रातःकाळी , जपा रामनामावळी ।

स्वये ध्यातो चंद्रमौळी , शैलबाळीसमवेत ॥१॥

राम योग्यांचे मंडण , राम भक्तांचे भूषण ।

राम धर्माचे रक्षण , संरक्षण दासांचे ॥२॥

रामे ताटका मारिली , रामे शिळा उद्धरिली ।

रामे जानकी पर्णिली , गणिका केली ते मुक्त ॥३॥

रामे पाषाण तारिले , रामे दैत्य संहारिले ।

रामे बंदी सोडविले , मुक्त केले सुरवरां ॥४॥

रामे रक्षिले भक्तांसी , रामे सोडविले देवांसी ।

रामदासाचे मानसी , रामदासी आनंद ॥५॥

भजन - गुरुवरा सदगुरुवरा ०।

गुरुघरची मी दासी । सखये ॥धृ॥

गुरुसेवेविण काही न जाणे । जन म्हणती मज पिशी ॥१॥

शब्द्स्पर्शरुपरसगंधाविषी । असे सदा उदासी ॥२॥

हर्षखेदादि द्वंद्वातीत मी । गुरुपदआश्रयासी ॥३॥

कोणी निंदो कोणी वंदो । मी नाही मोहपाशी ॥४॥

मुखी गुरुनाम ह्रदयी गुरुप्रेम । गुरुचिंतन अहर्निशी ॥५॥

मायेहुनि मवाळु गुरु माझा प्रेमळु ।

दासा निजांगे रक्षी ॥६॥

कलावंतगुरुचरणसरोजी । गया प्रयाग काशी ॥७॥

भजन - मजला उद्धरि ०।

तुम रहो किसी ठाम । करो कोईसाभी काम ।

पर भजो आठो याम । राम राम राम ॥१॥

सिद्ध हुये गणराया । आदि पूज्यपद पाया ।

उन्हे मिला यही पाया ॥राम०॥२॥

प्रल्हादको जलाया । नही जली कुछ काया ।

झट उसनेभी गाया ॥राम०॥३॥

जब मालाको चबाया ।

राम कपीने न पाया चाम चीरके दिखाया ॥राम०॥४॥

विष शंभूने पचाया । नाम नीलकंठ पाया ।

तब यही मंत्र गाया ॥राम०॥५॥

सत्तरुबीने बताया । वाल्मिकिजीको माया ।

मरा मरा से भी पाया ॥राम०॥६॥

जारी लंका महावीर । बची एकहि कुटीर ।

जहां जपता था धीर ॥राम०॥७॥

काटे रावणने पंख । गिरा गृद्ध हो अपंख ।

हुवा रटके सपंख ॥राम०॥८॥

कहे द्विज सुखधाम राम देंगे निजधाम ।

जो की भजे अभिराम ॥राम०॥९॥

रहे तुलसी निष्काम । हुवे भक्त सरनाम ।

रट गये सुरधाम ॥राम०॥१०॥

भजन - जगदीशा ०।

नको प्राण्या राहू सदा तू कष्टी ।

आनंद भोगाया सारी ही सृष्टि ॥धृ०॥

धन मान आप्त इष्ट सारे ।

दोन्हीकडुनि तुज छळिती बा रे ।

त्यांच्या मोहे तुझी अंध झाली दृष्टि ॥१॥

कनवाळु मायबाप सदगुरुराय ।

सदभावे वंदिता दिव्य पाय ।

देईल तुजला ज्ञानदृष्टि ॥२॥

गुरुबोध साठवि ह्रदयामाजारी ।

सत्यासत्यविचार करी अंतरी ।

चढेल अंगी सप्रेमपुष्टि ॥३॥

गुरुभजनामृत सिंचन करिता ।

चिंताग्नि विझुनि जाईल ताता ।

होईल तुजवरी कृपावृष्टि ॥४॥

कलिमलहरिगुरु तोचि थोर ।

त्याविण त्रिभुवनी न दिसे सार ।

पदस्पर्शे लाभे अखंड संतुष्टि ॥५॥

भजन - श्रीकृष्ण चैतन्यप्रभु नित्यानंदा ०।

तू भज रे भज रे भज रे । मानवा या रघुवीरा ॥धृ०॥

नरदेहासी आलिया प्राणी । जो राम वदे ना वाणी ।

काळ पाडिला त्यासी धरणी । सोडविता नाही कोणी ॥१॥

पळ पळ हे आयुष्य जाते । नरदेह न ये मागुते ।

तू शरण जाई संतांते । ते निजपद देतील तूते ॥२॥

रामदास विनंति करी । गुरुकृपा आम्हावरी ।

तो सबाह्य अभ्यंतरी । अवलोकी चराचरी ॥३॥

भजन - तुमबिन गुरुजी ०।

अंजनीसुत हनुमंत महाबल , वायुसुता हनुमंता हो ॥धृ०॥

हुकूम लेकर लंका फिरके बनमे जाकर बैठा हो ।

अशोकबनमे सीता बैठी हम भी जाकर देखा हो ॥१॥

चतुरंगबनमे मुद्रा डाली देखन लागी सीता हो ।

यही मुद्रा मेरे रामकी रोवन लागी सीता हो ॥२॥

सीतामाई पूछन लागी कौनका हो तुम दूता हो ।

कौन देशसे आये तुम तो कौन तुम्हारी माता हो ,

कौन तुम्हारा पिता हो ॥३॥

राम लक्षुमन दोनो भाई उनका है हम दूता हो ।

उत्तर खंडसे आये हम तो अंजनी हमारी माता हो ,

वायु हमारा पिता हो ॥४॥

अब तुम चिंता मत करो जननी रामसहित दळ आता हो ।

हुकून नही श्रीरामचंद्रका , नही तो लेकर जाता हो ॥५॥

लंका जाले बाग उखाडे बीच समंदर बैठा हो ।

तुलसीदास भगवानभरोसे चरणकमल चित्त लागा हो ॥६॥

भजन - सच्चिदानंद कृष्ण ०।

निजबोधाची दिवटी लावी । देव प्रत्यक्ष नयनी दावी ॥१॥

या गुरुसी काय बा द्यावे । यासी कैसेनि उतराई व्हावे ॥२॥

सिद्धस्वरुप चोरिले होते । ते उमगले याचेनि हाते ॥३॥

स्वामी केशवचि कृपाळु खरा । जेणे भेटविले विश्वंभरा ॥४॥

भजन - चला चला रे सर्व मिळोनि ०।

शेवट गोड करी ०। ते विज्ञापना -

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP