मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पद ३१० वें

श्री महालक्ष्मीचें पद - पद ३१० वें

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पद ३१० वें.
महालक्ष्मी निज दर्शन दे मज । होय सुख सहज आत्म निरीक्षिणीं ॥म०॥धृ०॥
तूंचि जिवलगा जीवगा । अखंड सुभगा सदसद्विलक्षणी ॥म०॥१॥
असुनि निराकृति चतुर्भुजाकृति । मूर्ति तुझी भजकांसि सुरक्षणीं ॥म०॥२॥
मातुलिंग विज्ञान गदाधृति । खेट निजानुसंधान क्षणक्षणीं ॥म०॥३॥
अद्वय ब्रह्मानंद प्राशन पात्र करीं बिभ्रती श्री कमलेक्षणी ॥म०॥४॥
चतुराय धवती श्री विष्णु युवती । कृष्ण जगन्नाथ पदीं लीन स्वमोक्षणीं ॥म०॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP