मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे ३१७ ते ३२१

श्री विरविठ्ठलाचीं पदें - पदे ३१७ ते ३२१

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पद ३१७ वें.
नीरद नील विरविठ्ठल स्थिर पाहूं ॥धृ०॥
विषय विषाशा निमुनि पाशा, गुंतुनि यांत न राहुं ॥नी०॥१॥
हें भव वैभव दावि पुनर्भव, गर्भवास किति साहूं ॥नी०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ प्रिय, भजनें निज सुख लाहूं ॥नी०॥३॥

पद ३१८ वें.
धीर तुझा गंभीर ह्लदयिं विरविठ्ठल करिं स्थीर विलोकन ॥धृ०॥
नीरदाभ मृग नीर भवांबुधि, तीर आत्म पद नीरज लोचन ॥धी०॥१॥
चीरकाल हे क्षीर धिजापति, मीरवितों निज नाम यशोघन ॥धी०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा निज, स्मरण मला दे प्रिय सुख शोधन ॥ धीर तुझा गंभीर ह्लदयिं विरविठ्ठल करिं स्थीर विलोकन ॥३॥

पद ३१९ वें
नमन तुज पुंडरीक नयना, पुंड असुर जन धुंडुनि मारिसि पुंडलीक वरद विरविठ्ठल हरि ॥धृ०॥
अखिल कोटि ब्रह्मांड जनक शुक, सनकादि योगी घ्याति पदरज अंतरीं ॥न०॥१॥
दिव्य मुकुट शिरिं कुंडल मंडित भाव अखंडित, जाणुनि प्रगटलसि अभय वरद करिं ॥न०॥३॥
मंद हसित मुख निरखुनि होय सुख, विष्णु कृष्ण जगन्नाथ विसरे क्षणभरी ॥ नमन तुज पुंडरीक नयना ॥४॥

पद ३२० वें.
विनवितों पदांबुजिं शीर ठेवुनि श्री विरविठ्ठल, न उशीर लविं मज स्थीर दे सुख अनंत अपार ॥धृ०॥
नीरदास्य मृदुहास्य रुचिर तव, दास्य करिन तूं उपास्य सुरां जरि । वरद करिसि तरि कदा हरिसि, वदति असें मुनि वेद चार ॥वि०॥१॥
क्षणिक विभव रत धणिक बहुत मज, आणिक न तुजहुनि प्रिय दुसरा । कांहिं कणिक भक्षुनि आत्मस्वरूप लक्षिन, हेतु हा वसे पुरे पुरे संसार ॥वि०॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ मस्तकीं, ठेवीं कृपाकर वरद बरा । निज चरणिं शरण चिंता नसे ज्याचा तुजवरि, भार विनवितों पदांबुजिं शीर ॥वि०॥४॥

पद ३२१ वें.
कधीं भेटसी विरविठ्ठला । निज सदय ऐसी गर्जें वेद वाणी ॥धृ०॥
संसार जनित त्रिविध ताप अनुभवितां देह कष्टला । दुष्ट दुरात्मे कल्पुनि कपटें नाना गांजिती मला । मोठे कुटील कुमति जाती नरकासि प्राणी ॥क०॥१॥
सच्चित्सुख स्वरूपीं वृत्ती विराया जिव तिष्टला । मुक्ति सुखास्तव भक्ति नवविधा लागला छंद आपला । मज नावडे विषयि जन पातकाची खाणी ॥क०॥२॥
राम नाम स्वहितातें नेणुनि ज्याचा हेतु भ्रष्टला । नष्ट खलांचा संग नको मज देवा प्रार्थितों तुला । विष्णु कृष्ण जगन्नाथ जोडितसे पाणी ॥ कधीं भेटसी विरविठ्ठला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP