TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
श्री राघवाष्टक

श्री राघवाष्टक

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

श्री राघवाष्टक
॥ श्री राघवाष्टक ॥

दिला देह त्वां राघवा मानवाचा । धरूनी अभीमान माझ्या जिवाचा ॥
तरी भेटि दे आपली रामराया । सदा आवडीनें स्वभक्ती कराया ॥१॥
दिले नेत्र त्वां रूप तूझें पहाया । स्वरूपीं तुझ्या स्थीर द्दष्टी रहाया ॥
कृपाळपणा काय वर्णूं तुझा मी । तरी दाखवीं दिव्य जे पाय स्वामी ॥२॥
कधीं भेटसी देसि तूं दर्शनातें । असा लागला वेध माझ्या मनातें ॥
त्वदंशें भवाब्धीस म्यां या तरावें । करूनी कृपा भेटिनें उद्धरावें ॥३॥
दिले हात वंदावया, या करानें । स्वसेवा करावीच म्यां चाकरानें ॥
असा भरंवसा हा मला ठांस पाहे । म्हणूनी तुझी वाट लक्षीत आहें ॥४॥
मना इंद्रियां जो अधिष्ठान तो तूं । करीसी सदा पूर्ण जो भक्त हेतू ॥
दयासागरा त्या तुला म्यां पहावें । सुखें सूख होवोनि आंगें रहावें ॥५॥
असा हेतु माझा प्रभो राम राजा । करीं पूर्ण तूं साधिसी भक्त काजा ॥
तुझ्याविण वाटे उदासीन दीशा । मला येउनी भेट रे जानकीशा ॥६॥
किती वेळ झाला तुला यावया रे । प्रभो पाहतो प्राण हा जावया रे ॥
उडी घाल या संकटीं राघवा रे । अहंभाव हा ग्रासि तूं आवघा रे ॥७॥
मुखें विष्णु कृष्ण जगन्नाथ नामा । स्मरें सर्वदा मी न राहे रिकामा ॥
तुझ्या दर्शनें सच्चिदानंद रामा । सदा होय आनंद आनंदधामा ॥८॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-06-08T02:12:57.0970000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ओट्यांत रोट्या, काष्टांत तुराट्या

 • १. काबाडकष्ट करून, शेती करून उपजीविका करणार्‍या लोकांस पुरती भाकरी खाण्यासहि वेळ नसतो, याकरितां ओटीत भाकरी घेऊन ती एकीकडे काम करीत असतांच खावी लागते व एकीकडे कपड्यामध्ये केर कचरा वगैरे जात असतो व तूर कापून राहिलेले ठोंब वगैरे वस्त्रास टोचत असतात. अशी गरीब शेतकर्‍यांची अवस्था असते. २. तुराट्या (तुरीच्या काट्या) विस्तव पेटविण्यास उपयोगी पडतात. इतकी विपन्नावस्था की अन्न ओटींत (अंगावरच्या वस्त्रांत) व इंधन कमरेशी बाळगावें लागते. 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मात स्त्रियांना उपनयनाचा धर्मसंमत अधिकार का नाही?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.