मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
श्लोक ३१ ते ४०

पवित्र उपदेश - श्लोक ३१ ते ४०

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

स्त्रियांसि शिकवी सती जनकजा पतीसी भजा । सदा चरणतीर्थ घ्या न मनिं देव माना दुजा ॥
तप व्रतहि सर्व तें पति पदींच वासा करी । म्हणूनि नियमें करा अति पवित्र ही चाकरी ॥३१॥
धंदा तो करितां सदा उबगला आला घरीं बैसला । ऐशा या पति मानसासि निववी जी धन्य मानूं तिला ॥
थोडया त्या चवताळती पतिवरी क्रोधें जशा वाघिणी । त्यां धि:कार असो मला गमतसे त्या चाविर्‍या नागिणी ॥३२॥
पेमें सदा जे सुखवी पतीला । असो नमस्कार तया सतीला ॥
दे देवता धन्य गमे मनाला । सुमार्ग दावी सकळां जनांला ॥३३॥
पाळावें व्रत एकपत्नि पुरुषें प्रेमें मनापासुनी । दीक्षा एकचि हे सुकीर्ति फलदा जाती अघें नासुनी ॥
तैसी ते सदनीं सती पतिरता अन्या नरा बापसा । मानी या सुतपें प्रसन्न भगवान्‌ सोडील त्यांला कसा ॥३४॥
सती सीतादेवी पतिचरण भक्ती करुनियां । जगद्वंद्या झाली तरति जन नामा स्मरुनियां ॥
तिला तो वामांकीं धरुनि बसला श्रीरघुपती । अशा गोड ध्याना स्वमनिं वरुनी तरती ॥३५॥
शिकविलें सकळां करुणाघनें । सुजन हो तुम्हि या परि वागणें ॥
मग सुकीर्ति यशासि उणें नसे । सुविमळा कमळा ह्रदयी वसे ॥३६॥
चितैक्यें पति पत्नि नांदति जरी त्या पार सौख्यानसे । वैकुंठीं नरमाप्रबुद्ध वदती त्यांच्या घरीं ती वसे ॥
प्रेमानें हरिनाम नित्य वदनीं गाती तयां श्रीहरी । रक्षी देउनि अन्न वस्त्र सुयशा अंतीं गती दे बरी ॥३७॥
बंधुधर्म सकळां भरतानें । दाविला स्वसुख लाभ रतानें ॥
स्वामि सेवक नया विनयानें । बोधिलें वर मरुत्तनयानें ॥३८॥
बंधु प्रीति जरी घरीं वसतसे कांहींच त्याला उणें । नाहीं हें शिकवी जना भरत तो जो शोभला सद्‌गुणें ॥
श्रीमद्राघव काननांत असतां जीं जीं व्रतें आचरे । तीं तीं सर्वहि तो असूनी सदनीं सप्रेम पाळी बरें ॥३९॥
दशरथा परि राघव मानितो । कधिं न त्यासि पहा अवमानितो ॥
भरत बंधु समान दुजा नसे । जगतिं या मज सत्य गमे असें ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP