TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे ७१ ते ८०

श्री रामाचीं पदें - पदे ७१ ते ८०

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.


पदे ७१ ते ८०
पद ७१ वें

रघुनंदन वंदन करुं तुजला । भेटुनि करुं आनंद मला ॥धृ०॥
ग्राम देवतेच्या द्वारीं । नुरवुनि दुष्ट महामारी । ग्राम सकल हा तारीं । प्रभो श्रमला ॥र०॥१॥
होउनि तूंचि सहाकारी । परि हरि विघ्नें हीं सारीं । न करीं विलंब सुरक्षीं । जिवें दमला ॥र०॥२॥
भयभित मानसिम नरनारी । तुजवरि विश्वासति भारीं । रक्षिसि तूंचि जगांत । दुजा न मला ॥र०॥३॥
पाळिशि भक्तां दिवस निशीं । तरि अंत आमुचा किति पहाशी । त्वरित सकल भय नाशीं । प्रभो अमला ॥र०॥४॥
सकल देवता तूंचि खरा । दाविसि प्रत्यय हाचि बरा । विष्णु कृष्ण जगन्नाथ ह्लत्कमला ॥र०॥५॥

पद ७२ वें

जय जय रघुविर समर्थ माझा ज० वारिल सकल भय तारिल दृढ निश्चय ॥धृ०॥
काम क्रोधादिक षड्रिप नुरउनि । पुरवुनि मनोरथ करिल आनंदमय ॥ज०१॥
भक्तांसाठीं कळकळ मोठी । पाठीं पोटीं रक्षुनियां दाविल आत्मउदय ॥ज०२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथचि तो जेथें तेथें आत्म नेटें भेटेल स्वसुखमय ॥ज०३॥

पद ७३ वें

मंदमति मि प्रभु वंदितों तुज रघुनंदन दाशरथे । मति हे भ्रमत, श्रमते नावडत गृह दारा पुत्र स्नेह जाचवि मी देह भ्रमला ॥धृ०॥
काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सहा, रिपु महा विषयिं पीडिति, जन्मासि आणिति, आवेशें ताडिति, विरोध साधिति, भक्तरते ॥ मति हे भ्रमते०॥१॥
चिद्नत्न खाणि जानकि जननि आत्मध्यानि शंभुला, स्वयंभुला स्थिरवुनि प्रेम पुरवुनि, श्रम दुरवुनि, दु:ख मुरवुनि, सुख स्फुरउनि चित्त मुरविसि नित्य शुद्ध मते ॥म०॥२॥
दीन गरिब मी त्यजीं न मज । अकीर्ति हे तुला, अहेतुला तुला, विष्णु कृष्ण जगन्नाथ पदांबुज दावुनि कळविं, निज हितगुज सांडुनियां लाज भाकितसे तुज रघुपते ॥म०॥३॥

पद ७४ वें

लंकेश रिपु नृपते, साकेताधिपते, स्वनिकेतनि मनि हेत राहिन श्वेत छत्रपते ॥धृ०॥
कर कंकणान्वित ते, नर देव हित कर ते । आइबाप वर शरचाप धर, मत्पाप हर सुमते ॥लं०॥१॥
हे मंद हंसित मुख रे, संसारिं न मज सुख रे । अकलंक, दावि पदपंकद, श्रीशंकरप्रियते ॥लं०॥२॥
शिरिं रत्नमय मुकुट रे, भ्रुकुटि शुशोभित रे । आनंद जनक, जनकजासहित, दे दर्शन विश्वपते ॥लं०॥३॥
मत्‍ जनन मरण हर रे, परिपूर्ण कृपा कर रे । घेउनि भार, सहपरिवार, मज उद्धार परम गते ॥लं०॥४॥
हे मन्मन चालकरे, हे त्रिजगत्पालक रे । त्वन्मूर्ति, चिन्मय रफूर्ति, विरवित कीर्ति, तन्मय ते ॥लं०॥५॥
रघुवीर स्मरण तुझें, करिं स्थीर चित्त सहजें । तव नेट मानसिं भेट, दे मति आत्मरुपीं रमते ॥लं०॥६॥
हे नवनव हर्षद रे, मन पवन सुखास्पद रे, आनंद घन, तुज वंदन न मन, अन्यत्र पर ते ॥लं०॥७॥
तूं जग नग जरक बरें, सच्चित्सुख कनक बरें । तूं व्याप्य, व्यापक विष्णु कृष्ण जगन्नाथ, अखंद भक्त रते ॥लं०॥८॥

पद ७५ वें

मंद हसित वदन सुख सदन मंद० कुंदरदन कितिं सुंदर सांवळाराम ॥मं०॥धृ०॥
यत्स्वरूप चिंतन, भवबंघ निकृंतन, केवळ आनंद चिद्‍धन, पाहेन वेळोवेळ राम ॥मंद०॥१॥
षड्रिपु कंदन, श्रीरघुनंदन त्याचे पदि सद्भावें वंदन, पट ज्याचा पिंवळा राम ॥मं०॥२॥
रत्नमुकुट शिरीं, आंगिं वस्त्रें भरजरि, शोभे सलंक्रुत भारीं भक्तांचा सोहळा राम ॥मं०॥३॥
पदक रत्न मुक्तमाळा, लखलख होती ज्याच्या गळां, जिवाहुनि जो आगळा, प्रेमाचा पुतळा राम ॥मं०॥४॥
राम विष्णु कृष्ण जगन्नाथ, ऐसें स्मरतां स्फुरवित, विश्वतरंगीं आपण अद्वय चिज्जल राम ॥मं०॥५॥

पद ७६वें
भक्त जिव्हाळा भक्ती लाघव, राम जय सीताराम राघव ॥धृ०॥
प्रेमपूतळा जनकजा धव ॥रा०॥१॥
प्रगट होय भक्ती घडे ज्या नव ॥रा०॥२॥
तो हा ज्या स्मरत अपर्णाधव ॥रा०॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ श्री वैकुंठ रमाधव ॥रा०॥४॥

पद ७७ वें

दशरथ नंदन मेघश्याम, रविकुल मंडण राजाराम ॥धृ०॥
तारक सकलां मंत्र जपा हा, देइल सुख विश्राम ॥द०॥१॥
पापजनित संताप हरुनि, निष्पाप वरि हें नम ॥द०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ प्रभु, भक्त ह्लदय आराम ॥द०॥३॥

पद ७८ वें

मंत्र शिरोमणि मंगलधाम, श्रीराम जय राम जय राम ॥धृ०॥
नित्य जपत शिव विश्रांतीस्तव, पार्वति प्रियकर नाम ॥ज०॥१॥
साधन ऐसें त्रिजगांत नसे, पुरवित इच्छित काम ॥मं०॥२॥
विष्णू कृष्ण जगन्नाथ सदा, वश जपतां निष्काम ॥श्री०॥३॥

पद ७९ वें

राम जय राम जय राम जय राम, पवित्र सुखकर जनीं अभयकर गाउं वदनि प्रिय नाम, सीताराम जय राजाराम, जयराम जयराम जय जय राम ॥धृ०॥
दशरथ नंदन रविकुल भूषण कौसल्या विश्राम, पंकज लोचन राजाराम सीताराम ॥रा०॥१॥
रावण मर्दन राम राघव वाली मर्दन राम, सीता राघव जय जय राघव जय रघुविर सीताराम ॥रा०॥२॥
सीतारंजन मेघश्याम, कौसल्या सुत पंचवटी स्थित राम, जय जय दशरथ नंदन राम ॥रा०॥३॥
कोदंड खंडण दशशिर मर्दन कौसल्या सुत राम, सीतानंदन राजाराम, श्री सीताराम सीताराम ॥ श्रीराम राम राम ॥रा०॥४॥
राम विष्णु कृष्ण जगन्नाथ सदोदित पुरविल काम, श्रीराम जो सुखधाम गातां नाम विपद विराम ॥रा०॥५॥

पद ८० वें

चिद्‍घन मेघश्याम राम आजि पाहुं । भक्त नमो विश्राम राम आजि पाहुं ॥धृ०॥
नवरत्नान्वित दिव्य मुकुट । सुकटिं पीतपट भ्रुकुटि विराजित ॥चि०॥१॥
कुंदरदन आनंद सदन प्रभु । मंद हसित मुख सुंदर शोभित ॥चि०॥२॥
सनकादि स्तुत कनका लंकृत । जानकि जनक नृपसुतालिंगित ॥चि०॥३॥
सुरनर कपि आनंद भरित । खत्पद रज भक्तिरसामृत सेवित ॥चि०॥४॥
विष्णू कृष्ण जगन्नाथ । अखंड निजात्म सुखासनिं संस्थित ॥चि०॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-12-16T20:54:07.1370000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अफाट

  • वि. 
  • विस्तीर्ण ; विस्तृत ( स्थळ , अरण्य , तलाव , समुद्र , इमारत , काम ). जैसा कां अफाट समीर । ऐसा गाढा आणि अफाटु । आतां कोण करी यया शेवटु । - ज्ञा १५ . २१३ . 
  • मोठें ; अचाट . 
  • प्रबळ ; अतिशय सामर्थ्यवान ; आश्चर्यकारक ; उत्कृष्ट . सामाशब्द - अफाट बुध्दि , अफाटपराक्रम , अफाटसंपत्ति . [ सं . अ + स्फुट ; अ + फाट = फाटणें ? ] 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

कापूर जाळण्यामागची संकल्पना काय? कांही फायदे आहेत काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site