मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे ४११ ते ४१२

गवळण काल्यांतील पदें - पदे ४११ ते ४१२

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

गोपिका कृष्णा प्रत-

पद ४११ वें.
कदर नसुनि तुज पदर ओढिसीनीज नदर करुनि मज कोणी पाहाती । सासुश्वशुर पती रजतम हंकृती त्यां आत्मरिथती न साहती ॥कद०॥१॥
लोक बाह्य आपण कीं श्रीहरी, धर्माधर्मही ना तळती । कळविसि हें स्वानुभवें अंतरीं, नेणती ते जन खळबळती ॥कद०॥२॥
कृष्ण जग-न्नाथा तूं सकलां, सुखकर विकला नुरविं मती । त्रिविध ताप हे वारुनि द्यावी, प्रिय परमानंदींच गती ॥कदर०॥३॥

गोपिकांचा श्रीकृष्णस्वरूपीं अद्वयानंद-

पद ४१२ वें.
आनंद आनंद बाइ सर्वही गोविंदा । श्रीहरिसिनृत्यकरिति सकल गोपिवृंद आ०॥धृ०॥
एक स्तनिं हस्त धरुनि हुंगिताति बाळा, श्रीगंधें चर्चियेला घेउनियां गळा, वनपुष्पें गुंफुनियां बहुत करुनि माळा, मुख चुंबुनि श्रीहरिच्या घालिताति गळां ॥आनंद०॥१॥
वासना हे कंचुकिचि ग्रंथि बहुत भारीं । जगद्नुरू विलोकनें मुक्त झाल्या नारी । जिवन्मुक्त कृष्ण संगें झालि नदे पुरी । कृष्ण चरणकमलिं गोपि वेधल्या भ्रमरी ॥आनंद०॥२॥
कृष्णरुपीं लीन झाल्या विषय भाग गेला । जगचि कृष्णपणें त्याच्या मोक्ष घरा आला । कृष्ण भूमी आप अनल भाव हाचि झाला । कृष्ण पुरुष प्रकृति गोपी ऐक्य भाव झाला ॥ आनंद आनंद बाइ सर्वही गोविंद श्रीहरिसि नृत्य करिती सकळ गोपिवृंद ॥३॥


श्लोक

श्रीकृष्णाच्युत पूर्णब्रह्म त्रिजगद्रूपीच चिद्नोपिका । आत्मानात्म विवेक गोपजन कीं सद्भाव ज्यांचा निका । अद्वैतामृत गोरसानुभव सर्वात्मैक्य घोंटि-मती । काला अद्वय हा स्फुरद्रुप निज ज्ञानी सदां पाहती ॥१॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥


झुला.

श्री सद्नुण गुनमंडित राघवराया । अवतरला तूं सज्जन ताप हराया । तुजविण कोणि न मज भवपार कराया । तारक निज पद मक्ति जगासि तराया ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥१॥
मत्स्यावतार घेउनि असुरां असत्री । श्रुतिहर शंखासुर त्वां वधिला निश्चिति । विधि शिव इंद्रादिक सुरवर तुज ध्याती । निजावतार चरित्रें वदनी गाती ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥२॥
समुद्र-मथनी सुरासुरांच्या थाटी । कूर्मरुपें त्वां मंदर धरिला पाठी । वधुनि हिरण्या-क्षातें भूमिसी गांठी । वराह रूपें क्रीडसि भक्तांसाठीं ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥३॥
प्रकटसि कडकड शब्दें स्तंभामाजी । नृहरे हिरण्य कशिपु वधाच्या काजीं । प्रर्‍हाद तुज परमात्माजी । कळविसि देवा सकळां सुजन समाजीं ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥४॥
छळिसि बळिसी वामन रूपें तो तूं । सच्चित्सुखमय मुळिंचा जो निर्हेतु । परिपूर्ण करिशि भक्तांचा जो हेतू । नाम तूझें संसार समुद्रीं सेतू । जय जय रघुवीर समर्थ ॥५॥
अधर्म मार्गीं जे दु:ष्कर्म पसारे । भार्गवरूपें वधिले क्षत्रीय सारे । कामक्रोध रिपु मत्सरादि सारे । गांजिति मज यां वधिसि न अजुनि कसारे । जय जय रघुवीर समर्थ ॥६॥
दशरथ कौसल्येच्या प्रगटुनि ध्यानी । जन्मा येसि अजन्मा जानकि जानी । शोधुनि वधिले राक्षस अटंग रानीं । रावण मर्दन तूं आमुचा अभिमानी ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥७॥
स्थापुनि लंकेमध्यें बिभीषणाला । ससीता पुष्पक विमानि आरुढ झाला । आनंद भरित व्हाया सकल जनाला । सुरनरवानवर थाटीं अयोध्ये आला ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥८॥
पूर्ण परात्पर परब्रह्मा श्रीरामा । स्वभक्त रक्षक मुनिजन मन विश्रामा । विष्णु कृष्ण जगन्नाथ तुझ्या नामा । सदैव गातो ध्यातो सुखैक धामा । जय जय रघुवीर समर्थ ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP