TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे ३२२ ते ३२५

श्री पांडुरंगाचीं पदें - पदे ३२२ ते ३२५

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पदे ३२२ ते ३२५
पद ३२२ वें.
लक्ष लागों निजपदीं पांडुरंगा । न क्षणभरि यिषयिं या जिवाचें अलक्ष आत्म विचारें ॥ल०॥धृ०॥
भ्रमतां करुनि संसारिं रुक्मिणि रमण पहा मी श्रमलों धरुनियां कुमति संगा । दमुनि बहुत तुज नमुनि विनवितों अनात्मत्व परिहारें ॥ल०॥१॥
छंद ह्लदयिं सच्चिदानंद आपणचि अनुभवें घोटिन न भुलतां दृष्य रंगा । संग रहित नि:संग होउनि श्री सद्‍गुरु वचन द्वारें ॥ल०॥२॥
वैष्णव सद्नुरु कृष्ण जगन्नाथ तुला सदैव आठवी अद्वयात्मा अभंगा । नव नव हर्षद स्वस्वरुपामृत सेविन निरहंकारें ॥ लक्ष लागो निज पदीं पांडुरंगा ॥३॥

पद ३२३ वें.
धांव दुरित भंगा हरुनि दु:ख संगा । दावि निजात्म रंगा रुक्मिणी पांडुरंगा ॥धृ०॥
कामक्रोधादिक रिपु गांजिति सारे । विषय विष सदृश मारक सारे । जनन मरण देति साहुं कसा रे । दाखविं नयनि मुख कमल ॥धांव०॥१॥
किति विनवुं मि तुज नित्य असा रे । जवळिं असुनि बसविसि कां घसा रे । तुजसाठीं घडि घडि होय मी पिसा रे । पाहेन मूर्ति शामल ॥धा०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ स्मरण रसा रे । सेउनियां लक्षी निज आत्म कसा रे । मानुनि सकल मिथ्या दृष्य पसारा रे । भजनें हरिसि मानस मळ ॥ धांव दुरित भंगा हरुनि दु:ख संगा ॥३॥

पद ३२४ वें.
यारे यारे पाहुं पांडुरंग पंढरीचा । भक्तांसाठीं प्रगटला सागर कृपेचा ॥धृ०॥
मुख विलेकितां हरि सुखमय चित्त करी । शंख चक्र पद्म गदा शोभे चतर्भुज करीं । जीवन जिवाचा प्राणपति भीमकेचा ॥या०॥१॥
बाल वृद्ध सर्व याती, टाळ विणे घेउनि हातीं । मुखें विठ्ठल विठठल गाती, सप्रेम दिवस राती । गर्दी मोठी दाट वोट थाटचि मजेचा ॥या०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ, विठ्ठल पंढरिनाथ । नारायण वासुदेव, गोविंद गोपाल गात । अखंडानंद घोंटित मूळ जो परेचा ॥ यारे यारे पाहुं पांडुरंग पंढरीचा ॥३॥

पद ३२५ वें.
आजि भला आमुचा दिवस सोनियाचा । परिपूर्ण जाहला प्रेम डोळियाचा ॥धृ०॥
इटेवरि पाहिला देव पंढरीचा । कटीवर कर शोभे हार कुंदरीचा ॥आ०॥१॥
लखलखीत मस्तकीं मुकुट सुवर्णाचा । वरि हिरे चमकती झगझग रत्नाचा ॥आ०॥२॥
करी विणा टाळ किति थाट सज्जनाचा । मुखिं रामकृष्ण हरी छंद भजनाचा ॥आ०॥३॥
मधुर मधुर उठविती शब्द मृदंगाचा । नि:सिम गाती ज्या प्रेम अभंगाचा ॥आ०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ ह्मणुनि नाचा । हाचि मार्ग समजा मोक्ष साधनाचा ॥ आजि भला आमुचा दिवस सोनियाचा ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-12-16T20:54:09.0570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सोप्ती

  • [ इ . सोबती पहा . 
RANDOM WORD

Did you know?

shreeyantra siddha kase karave ?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.