मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे ९१ ते ९६

श्री रामाचीं पदें - पदे ९१ ते ९६

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.


पद ९१ वें
या मनाचा काम पुरविता राम जगाचा रवामी । नाम गातां शाम सुंदर, प्रगटे अंतर्यामीं ॥धृ०॥
वामजानुवरि जानकि शोभे, वामलोचना साजे । काम मनोहर मूर्ति जगन्मय, धाम सुखाचें गाजे ॥या०॥१॥
भला जन्म लाभला गुडयानों, चला अयोध्ये जाऊं । न लाभ याहुनि मला वाटतो, कलाकुशल हरि गाऊं ॥या०॥२॥
थाट शोभतो कीर्तन गजरें, दाट समुह संतांचा । वाट फुटेना गांठुनि घ्याया, ब्रह्मानंदचि साचा ॥या०॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ सदां, प्रेमळ भक्तजनांचा । अखंड भजनीं तो दिनरजनीं, लंपट निज नामाचा ॥या म०॥४॥

पद ९२ वें
आला जानकिजीवन्‍, चला जाऊंया पाहुंया राम । दुष्ट दशवदनादि राक्षस बधून्‍ ॥आ०॥धृ०॥
आतां काय भय चिंतो, पाय राघवाचे ध्यातां । नित्य नाम गातां सुटे प्रपंचा मधूनू ॥आ०॥१॥
कीर्तनाच्या रंगणांत, आनंदें नाचति भक्त । टाळ तुंबुरे वाजति मृदंगें अजून्‍ ॥आ०॥२॥
वानरांचे भार किति, परस्परें आलिंगिती ॥ श्रीरामाचा प्रेम ज्याचे ह्लदयिं वेधूनू ॥आ०॥३॥
किति जन पाहों येति, दर्शनानंद घोंटितां । ऐसा हा अलभ्य लाभ घेऊंया साधून ॥आला०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ, अचला रामीं वसत । नित्य एकांत सेवित चित्त निरोधून ॥आ०॥५॥

पद ९३ वें
राम राजीवलोचन्‍, आजि जाऊंया पाहुंया । भक्त काम कल्पद्रुम करि जिवासी मोचन्‍ ॥राम०॥धृ०॥
संत आनंदें नाचति, सिंहासनिं रघुपति । वामांकिं जानकि शोमे विनतालोचन्‍ ॥रा०॥१॥
स्मरणिं रंगुनि मन, चरणिं मारुति लीन । येउनियां सुरगण करिति पूजन्‍ ॥रा०॥२॥
ह्मणे जे शरण येति, त्यासि रक्षिन निश्चिती । एक पत्निव्रत ज्याचें एकचि वचन्‍ ॥रा०॥३॥
सुग्रीवादि वानरांचे थाट, नाम गाती वाचे । धन्य धन्य अयोध्येचे, वाटति सुजन्‍ ॥रा०॥४॥
वसिष्टादि ऋषिगण, करिति वेद पठण । वाद्यें वाजताति होय, राज्याभिषेचन्‍ ॥रा०॥५॥
मानुनि सुख विषयिं, किति पडलों अपायीं । ऐसें हें सदैव कांहीं, होइल प़चन्‍ ॥रा०॥६॥
भक्तीचा सुखसोहळा, मुक्तिदायक सकळां । जरी करूं वळोंवेळां, आत्मविवेचन्‍ ॥रा०॥७॥
सांडुनि आळस सारा, ध्यातां एका रघुविरा । न राहे मोह पसारा, होतो आकुंचन ॥रा०॥८॥
वसति अचला रामीं, वैष्णव सद्‍गुरु स्वामी । विष्णु कृष्ण जगन्नाथ मुळींहुनी निष्किंचन्‍ ॥रा०॥९॥

पद ९४ वें
कोणी नाहीं कामाचे । रामाचे गुण गाई वाचे ॥धृ०॥
घटकेन घटकेन हें वय जाय । फुटक्या तुटक्या गोष्टिंत काय । पडशिल तोंडिं यमाचे ॥ माझा रामाचे०॥१॥
फटफळ चटफळ हा संसार । हटकुन झटका करुनि विचार । लुटक्या पराक्रमाचे ॥ माझा रामाचे०॥२॥
कलबल गलबल करूं नका । जिवाचें जीवन राम केवळ सखा । भलभलत्या नेमाचे ॥ माझा रामाचे०॥३॥
सिटकुन किरकुन गुरकुन वांय । घुरकुन बोलण्यांत्‍ तिळ सुख नाहीं । जिवलग सर्व श्रमाचे ॥ माझ्या रा०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ । सदैव नाचे भक्त जनांत । आवडिनें बापा प्रेमाचे ॥ माझ्या रामाचे०॥५॥

पद ९५ वें
भक्त जिव्हाळा भक्ति लाघव । राम जय सीताराम राघव ॥धृ०॥
प्रेम पुतळा जनकजाधव ॥राम०॥१॥
प्रकट होय भक्ति घडे ज्या नव ॥राम०॥२॥
तो हा ज्या स्मरत अपर्णा धव ॥राम०॥३॥
देवादि देव भेटला होउनि मानव ॥राम०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ श्री वैकुंठ रमा धवा ॥राम०॥५॥

पद ९६ वें
 नृपति भला, रमवि मला । राजाराम, निजनाम संकीर्तनिं, लावुनियां, निशिदिंनीं, घ्यानिंमनीं, एकचि आपण त्रिभुवनीं ॥धृ०॥
ह्लदयासि दया ये उदया । हरुनि भया, देव ऋषिभजन, तारक रावणादि, शत्रु निवटुनि, वेगें झडकरि, आत्मपुरिं, माजि शोभ, छत्रसिंहासनीं ॥नृ०॥१॥
आपदा हरि भक्तांचि सदा । लावुनि पदा, प्रिय आत्मसुखकारक, स्वामि जानकिनायक, चापपाणि प्रगटला, निरखिला सच्चिदानंद, आत्मनयनीं ॥नृ०॥२॥
करुणाघन गुरु विष्णु खरा । चरणिं बरा, बलभिम सेवक, विष्णु कृष्ण जगन्नाथ हात, जोडोनियां गात कीर्ति सुखें, आवडुनि अद्वय भजनीं ॥नृपति०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP