TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पद ३५९ वें

श्रीशितलादेवीचें पद - पद ३५९ वें

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पद ३५९ वें
पद ३५९ वें.
शीतला देवि तूं घाल शीतळ वारा ग्‍, तुजविण आह्मां कोण रक्षिल या संसारा ग्‍ ॥धृ०॥
या रोगांतुनी संरक्षुनि दे पदिं थारा ग्‍, निज बाळकांला पाजिं शीतळ अमृतधारा ग्‍ । शीतळतेचा परिपूर्ण पुरवीं चारा ग्‍, त्रिजगीं नाहीं तुज ऐसी अन्य उदारा ग्‍ ॥शी०॥१॥
स्कंदालागीं शिव सांगे महिमा तूझा ग्‍, विस्फोटक हा तुज वांचुनि नरहरी दूजा ग्‍ । कीं उदका-मधीं निज मूर्ति चिंतुनि पूजा ग्‍, ह्मणउनि सांगे निज पूजन स्तवन नीरुजा ग्‍ ॥शी०॥२॥
अगणित घडती अपराध तुझ्या पायीं ग्‍, सहस्त्र वदनीं वर्णबेल शेषा कायी ग्‍ । या जगताची तूं केवल जनक आई ग्‍, कृपा कटाक्षें आह्मांसि निरंतर पाहीं ग्‍ ॥शी०॥३॥
शीतला शीतला जे स्मरतिल तुज या नामीं ग्‍, त्यां ज्वर द्‍ग्धां करी शीतळ अंतर्यामीं ग्‍ । आह्मां सवेकां दृढ धैर्य आपुलें स्वामी ग्‍, विवेकें पहातां सुखदात्री तूं परिणामीं ग्‍ ॥शी०॥४॥
निज सत्तेनें जगिं आश्चर्यें तूं खेळें ग्‍, बहु तकमकती ज्वर दाहें आपुलीं बाळें ग्‍ । श्रमती पाहें विस्फोटक रोग उन्हाळें ग्‍, संभाळावीं या बाळां त्रिजगत्पाळे ग्‍ ॥शी०॥५॥
बाई विस्फोट किति अंगीं या विस्तारीं ग्‍, संकट ऐसें कोण तुज विरहित निस्तारीं ग्‍ । मिथ्या बंधांतुनि लवकरीं मजला तारीं ग्‍ ॥ देवी शितले तुज शरण मीं निर्धारीं ग्‍ ॥शी०॥६॥
पूर्ण ब्रह्म चैतन्य आपण ऐसी ग्‍ जरि अवतरली तरि अद्वैता स्वरुपेंसी ग्‍ । स्वस्वरुपाची कधीं विस्मृति नां तुज तैसी ग्‍, आत्म सुखातें निज भजकां ह्लदयीं देसी ग्‍ ॥शी०॥७॥
ऐसें करिती निजध्यान सज्जन योगी ग्‍, नेणुनि तुज म्या लोभ धरिला विषय भोगी ग्‍ । त्या पापाचें फळ कीं विस्फोटक रोगीं ग्‍, अंतर्ब्राह्य तकमक झालों सर्वांगीं ग्‍ ॥शी०॥८॥
प्रियकर ऐश्या रासभीं आरूढ व्हावें ग्‍, स्वामिणी शितळे सद्वौदिणी त्वां यावें ग्‍ । निज मात्रेचें शीतळ औषध द्यावें ग्‍, अनाथ आह्मीं या संकट काळीं पावें ग्‍ ॥शी०॥९॥
सर्वां ह्लदयीं तूं सूक्ष्मरूपें आहे ग्‍, तुज माजी हें जग उद्भवलें तूं पाहें ग्‍ । दृश्य द्रष्टा दर्शन गिळुनीं राहें ग्‍, सहज स्थितिची करिं मजवरि पूर्ण कृपा ग्‍ ॥शी०॥१०॥
वैष्णव सद्नुरु पदपंकाज भ्रमरा लागीं ग्‍, भ्रांती न पडो या द्वैताची निजांगीं ग्‍ कृष्ण जगन्नाथपणाची निरसुनि पांगी ग्‍, अद्वय भावें मज लीन करिं चिद्नांगीं ग्‍ ॥ शीतला देवी तूं घाल शीतळ वारा ग्‍ ॥११॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-12-16T20:54:09.5270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

riddle

  • स्त्री. प्रचालनी 
  • कूटप्रश्न, कूट 
  • पु. कूटप्रश्न 
  • न. कूट 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

मृत व्यक्तीच्या तेराव्याचा विधी काय असतो? त्या दिवसाचे महत्व काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.