मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
बाळसंतोष (चिंतामणमहाराजा...

मोरया गोसावी - बाळसंतोष (चिंतामणमहाराजा...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


बाळसंतोष (चिंतामणमहाराजांचा)

मोरेश्वरा तूं मज भेटलासी दाता तत्वता ॥

दान देईं तूं समर्था ॥ बाबा बाळ संतोष ॥

करुणा भाकितों येकदंता ॥ बाबा बाळ संतोष ॥१॥

दान मागतों तुज मी एक ॥

चरणीं (पायीं) ठेवी मज निकट ॥बाबा बाळ संतोष ॥

आणिका अर्थी रे नाहीं काज ॥ बाबा बाळ संतोष ॥२॥

तूं म्हणसील देईन धन संपत्ती ॥

नलगे मज रे धन प्राप्ती ॥ बाबा बाळ संतोष ॥

हृदयीं राहे रे गणपती ॥ बाबा बाळ० ॥३॥

तुज वाटलें दिधलें पुत्र कलत्र ॥

याचें नलगे रे मज सुख ॥ बाबा बाळसंतोष ॥

याच्या संगें रे दुःख प्राप्त ॥ बाबा बाळ संतोष ॥४॥

प्राप्ति गतीच्या ठांई न येती कोणी कामा ॥

शरण आलों रे तुझीया नामा ॥बाबा बा०॥

विटलों विषय (विषयाच्या) सुखास ॥ बाबा बा० ॥५॥

लक्ष चौर्‍यासीं योनी हिंडोनी ॥ कष्ट झाले रे माझ्या देहीं ॥बाबा बा०॥

तेणें दुःख रे राही चरणीं ॥ बाब बा०॥६॥

मागणें नाहीं तुज कांहीं उत्कट ॥ उद्धरावे रे वेगीं भक्त ॥ बाबा बा०॥

दाना उशीर जाला बहुत ॥ बाबा बा०॥७॥

तुझें दान गा जयासीं ॥ चुकले गर्भ रे रहिवासासीं ॥बाबा बा०॥

त्याच्या झाल्या रे पुण्यराशी ॥ बाबा बा०॥८॥

प्राप्ति केली तुझी म्यां पुरवी ॥ विनवी चिंतामन गोसावी ॥बाबा बा०॥

कृपा (दया) स्नेह रे भक्ता पाहे ॥ बाबा बा०॥

बाबा बाळ संतोष ॥बाबा बाळ संतोष॥ बाबा बाळ संतोष ॥

कृपा (दया) स्नेह रे भक्ता पाहे ॥बाबा बाळसंतोष ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP