मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
प्रथम आदिस्थान होतें वैकु...

मोरया गोसावी - प्रथम आदिस्थान होतें वैकु...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


प्रथम आदिस्थान होतें वैकुंठ भूवन ॥ रहिवास मूळपीठ ॥

भूमंडाळसी येऊनी ॥ प्रगटली विश्वमाता ॥

नाम जगदंबा भवानी ॥ आहो जोगवा विश्वरुप ॥

ब्रम्ह परिपूर्ण स्वरुप ॥ आहो नव दिवस पूर्ण झाले ॥

योगि उत्कार दिधलें ॥ चंडमुंडा विभांडोनि ॥

आसन घातले मूळपीठी ॥ आहो जोगवा० ॥२॥

आहो जोगवा घालि माये ॥ तुज हो मागतसे पाहे ॥

देईं हो भक्तिरस ॥ विनवी मोरया गोसावी ॥

आसन ध्यानीं शयनीं हो ॥ स्मरे गणराज हृदयीं ॥३॥आहो जोगवा० ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP