मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
उद्धरिले जीव तुज येती शरण...

मोरया गोसावी - उद्धरिले जीव तुज येती शरण...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


उद्धरिले जीव तुज येती शरण ॥

कष्टलीस माते तूं हो भक्ता कारण ॥येई हो गजानन ॥

माझ्या मनाचें मोहन ॥ येई हो गजानन ॥

(माझ्या जिवाचे जिवलग ॥ येई हो गजानन ) ॥१॥

भाद्रपद मास आला भक्ता उल्हास जाहाला ॥

कधीं तुज देखेन मी आपूले डोळा ॥येई हो गजानन ॥

बहूत कष्टलो सवसारी ॥ यावें गजानन ॥

(माते न लावावा उशिर यावें गजानन ) ॥२॥

दुष्ट भोग आहे ती हो येईअ हो प्रपंची ॥

सोडवी आतां मज तूं हो चुकवी यातायाती ॥येई हो गजानन॥

माझ्या मनाचे मोहन ॥ येई हो गजानन ॥

(माझ्या जिवाचे जिवलग ॥ येई हो गजानन) ॥३॥

सत्यलोक टाकनिया येथें रहिवास धरिला ॥

तूं हो कृपाळू (दया) माऊली थोर नवलाव केला ॥येई हो गजानन॥

बहुत कष्टलों सवसारी ॥ यावें गजानन ॥

(माते न लावावा उशिर यावें गजानन) ॥४॥

माझीया धांवण्या माते धावें ग लवकरी ॥

कष्टलीस भारी ग माझी सांडी न करी ॥येई हो गजानन॥

माझ्या मनाचे मोहन ॥ येई हो गजानन ॥

(माझ्या जिवाचे जिवलग ॥ येई हो गजानन ॥५॥

सोडवण माझी तूं हो येई ग मयूराई ॥

कैसा देह ठेऊ ग आतां करुं मी कांहीं ॥येई हो गजानन॥

बहूत कष्टलों सवसारीं ॥ यावें गजानन ॥

(माते न लावावा ऊशिर यावें गजानन ) ॥६॥

जळावीण मीन जैसा भूमी तळमळी ॥

तैसा तुजवीण ग माझा देह हळहाळी ॥ येंई हो गजानन ॥

माझ्या मनाचें मोहन ॥ येंई हो गजानन ॥

(माझ्या जिवाचे जिवलग ॥ येंई हो गजानन) ॥७॥

ब्रह्मयानें ध्यान तुझें केलें ग दृढतां ॥

वर दिधला माते सृष्टी झाला करितां ॥येंई हो गजानन ॥

बहुत कष्टलों सवसारीं ॥ यावें गजानन ॥

(माते न लावावा उशिर ॥ यावें गजानन) ॥८॥

शेष भार बहूत झाला पृथ्वीचा ॥

कृपा केली माते ग भार झाला पुष्पांचा ॥येंई हो गजानन ॥

माझ्या मनाचें मोहन ॥ येंई हो गजानन ॥

(माझ्या जिवाचे जिवलग ॥ येईं हो गजानन) ॥९॥

भाद्रपद मास आला द्वारें करिती नरनारी ॥

तूं हो कृपाळु (दयाळु) माऊली इच्छा देसी ग लवकरी ॥येंई हो गजानन ॥

बहुत कष्टलों सवसारीं ॥ यावें गजानन ॥

(माते न लावावा उशिर ॥ यावें गजानन ) ॥१०॥

आतां एक ह्मणे माझी विनंती ऐकावी ॥

ह्मणतसे तुज भक्ति आपूली द्यावी ॥ येंई हो गजानन ॥

माझ्या मनाचें मोहन ॥ येंई हो गजानन ॥

(माझ्या जिवाचे जिवलग । येंई हो गजानन ॥११॥

चिंतामणी दास रंक विनवी एकभावें ॥

कृपा (दया) करी माते ग माझ्या हृदयीं रहावें ॥येंई हो गजानन॥

बहुत कष्टलों सवसारीं ॥ यावें गजानन ॥

(माते न लावावा उशिर ॥ यावें गजानन ॥ येंई हो गजानन ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP