मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ४|
याणें माझी लपविली पिंवळी ...

संत तुकाराम - याणें माझी लपविली पिंवळी ...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


याणें माझी लपविली पिंवळी गोटी । उलटा भोंवर्‍याची चोरी लावी पाठीं ॥

बाईं कंचुकिची सोडुनियां गांठी । हृदय सखोल एकांतीं घाली मिठी ॥१॥

पहा पाहा सांवळा कैसा धीट । बोलूं नये तें बोलतो उद्धट ॥

याच्या बोलण्याचा कोणा न ये वीट । याच्या वरुनी देह ओवाळूं चतुष्ट ॥२॥

अवचित माझ्या डोळ्यांत गेले कणु । फुंकुन काढितां वाटलें समाधानु ॥

शाहणा कानडा तुझा गे नारायणु । चुंबन देतां हरपलें देहभानु ॥३॥

नवनीत पाहुनी लावितो लाडिगोडी। राधिका पाहुनी राजस डोळे मोडी ॥

आगमनिगमा नकळे त्याची खोडी । दास तुका शरण हात जोडी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP