मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ४|
मिथ्या तीं अनन्य कोण तीं ...

संत तुकाराम - मिथ्या तीं अनन्य कोण तीं ...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


मिथ्या तीं अनन्य कोण तीं असती । ऐसें तंव चित्तीं विचारावें ॥१॥

आहे तो विचार आपुलिया पाशीं । कळा बिंबा ऐसी प्रतिबिंब ॥२॥

शुभ शकुन तो शुभ लाभे फळें । वाढलीं तें कळे अनुभवें ॥३॥

तुका म्हणे माझा असेल आठव । जैसा तैसा भाव तुझ्या पायीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP