मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ४|
जासी तरी जाईं संतांचिया ग...

संत तुकाराम - जासी तरी जाईं संतांचिया ग...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


जासी तरी जाईं संतांचिया गांवा । होईल विसांवा तेथ मना ॥१॥

सर्वभावें त्यांचें देव भांडवल । आणिक ते बोल न बोलती ॥२॥

करिसी तरि करीं संतांची संगति । आणिक हे मति नको मना ॥३॥

बैस तरी बैसें संतांचिया मधीं । आणिक ते बुद्धि नको मना ॥४॥

तुका म्हणे संत सुखाचे सागर । मना निरंतर धणी घेईं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP