TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

केशवस्वामी - श्लोक संग्रह ४

केशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.


श्लोक संग्रह ४

रवीचंद्र कोटी प्रकशेचि लोपी । तयाचे पदीं निश्चळाव्रती गोपी ॥

असंगा अभंगा अनंगा श्रीरंगा । अनंगाचि ना भोगिती प्रेम संगा ॥१५१॥

विशाळ हें भेद दरिद्र वेली । ज्ञाना नळे आजि जळोनि गेली ॥

ऐशी दया पूर्ण दयाळ रामा । केली तुवा दीन ह्मणोनि आह्मा ॥५२॥

रज्जु ज्ञाने सर्प जैसा निमाला । आत्मा तैसा देखिला मोह गेला ॥

माया सिंधू आटला दुःख नाहीं । ब्रह्मानंदे कोंदले विश्व पाही ॥५३॥

प्राणाहुनी गोड मुकुंद वाटे । ध्याता मनी बोध समुद्र दाटे ॥

आहे मृषापूर भवार्णवाचा । पदोंपदी लाभ महत्सुखाचा ॥५४॥

केली दया सद्‌गुरु देवराजे । गेले मृषाहें भव दुःख माझें ॥

झाला महानंद सदा मनासी । विलोकितां केवळ चिद्‌घनासी ॥५५॥

गुरुभक्तिने मोह सिंधू तरेना । स्वबोधें मृषा संग त्याचा सरेना ॥

महत्सौख्य ज्याच्या निजांगी भरेना । श्रुती बोलती शीघ्र तोका मरेना ॥५६॥

धरीना कदा संग साधू जनाचा । करीना कधीं दृढ बोधें मनाचा ॥

महामूढ तो नष्ट पाखांडवादी । रमेना मुळीं सत्य मानी उपाधीं ॥५७॥

विरेना सदा वृत्ति बोधें जयाची । करीना सुखें शांति मायार्णवाची ॥

तया पामरा भेटि कैची शिवाची । वदे यापरी भारती केशवाची ॥५८॥

माया मरे भेद सरे मनाचा । चिंता विरे संग नुरे गुणाचा ॥

ऐसे करी सद्‌गुरु देवराया । पावेन तेणें निज सूख गाया ॥५९॥

तत्वार्ध हासत्व गुणे विकासे । निःशेष तेणें भव दुःख नासे ॥

भेटे सदा राम सभाग्य पाही । कवी ह्मणे पार सुखासि नाहीं ॥१६०॥

गुरु भक्तिचा लाभ जोडे जयासी । निजानंद दाटूनि भेटे तयासी ॥

समाधिस्त तो वर्ततो देह गेहीं । तया देह नाहीं ह्मणे वेद पाही ॥६१॥

विवेका नळे मोहजाळी न जाळी । न लावीच बोधें बरी नित्यटाळी ॥

न भोगी घनानंद हा सर्वकाळी । सदा आदळे दुःख त्याचें कपाळी ॥६२॥

विवेके अहंभाव ज्याचा गळेना । जनी मुक्तसाधू असे ज्या कळेना ॥

हरी अंतरी सर्वदा आ कळेना । तया पामरा मोक्ष वल्ली कळेना ॥६३॥

कडाडीत वैराग्य देही असेना । दया सिंधु संपूर्ण चित्ती वसेना ॥

विवेके मृषा भेद हा निर सेना । घनानंद तो राम डोळा दिसेना ॥६४॥

अमर पितर ज्याचे देव ब्रह्मा दिकाचे । त्दृश्य कमळ कोशी चिंतिती पाय त्याचे ॥

तरिच अखिल माया भेद संकल्प नासे । परमळ आत्मा सर्वठायीं प्रकाशे ॥६५॥

मुनिवर रमणीची पाद पद्मे सुरेखें । त्दृश्य कमल कोशी चिंतिती जेवि शोकें ॥

अविकृत पदि घेजे श्रूप साचार होती । त्रिभुवन जननीच्या गर्भ वासान येती ॥६६॥

त्रिभुवनी व्यापक येक आहे । येकत्व तेथें सहसा न साहे ॥

ऐसेचि ते केवळ येक पाही । जेथे नसे व्याप्य पदार्थ कांहीं ॥६७॥

मुनिवर मनि साचे चिंतिती पाय ज्याचे । सुखघन जगदात्मा वर्णिती वेद वाचे ॥

रघुपति दिन बंधू तो जिवी आठवावा । विसरुनि जिव भावा तोचि पै वोळखावा ॥६८॥

विटाळले मानस काम रंगे । विशुद्ध जे केवळ साधु संगे ॥

करुनिया निश्चळ रुप पाही । सर्वातरी हा मग राम पाही ॥६९॥

सांडूनी माया गुण संग पाही । जे रात ले राम रमेश पाई ॥

देहिच ते पूर्ण विदेह झालें । जिताचिये रामरुपी मिळालें ॥१७०॥

दयेचा नसे संग ज्याच्या मनासी । क्षमा अंतरंगे न भेटे जयासी ॥

वदे तो जरी ज्ञानवार्ता अनेका । तर्‍ही त्या नव्हे ठावुका राम देखा ॥७१॥

प्रपंचपै जाणुनि या विकारी । विलोकिती जे हरी निर्विकारी ॥

त्यावेगळा श्रीहरि तो असेना । देहीच हा देह तया दिसेना ॥७२॥

साधू जनाचा निज सोयरा हो । दयाळ तो माधव मंदि राहो ॥

आला सये शोक समूळ गेला । जिची रमाकांत जडोनि ठेला ॥७३॥

घडे मोक्षया सद्गुरु वाक्य मंत्रे । यदर्थी सदा गर्जिती सर्वशास्त्रें ॥

श्रुती बोलती हाचि सिद्धांत पाहीं । गुरु वेगळा सर्वथा मोक्ष नाहीं ॥७४॥

शुकादीक योगी जगद्वंद्य पाही । गुरु वेगळा त्यासिही मोक्ष नाहीं ॥

ह्मणुनी धरा सद्गुरु पाय माथा । जनी वर्तता मोक्ष पावेल आतां ॥७५॥

सखे किती गुह्य जनांत बोलो । चिंतूनिया राम मनात डोलो ॥

डोलासवे सौख्य अपार आहे । ते सेविता डोल निवांत राहे ॥१७६॥

जयाच्या पदीं पिंड ब्रह्मांड नाही । तयाच्यापदीं तूं सदा न राहीं ॥

जयाच्या पदीं गर्वनाहीं मदाचा । स्वये ठाव तूं होईरेत्या पदाचा ॥७७॥

जयाची मती आत्मयोगे निवाली । तयाची क्रिया तत्वबोधे गळाली ॥

जयाची स्थिती मुख्य तत्वार्थ झाली । तयाच्या पदीं तूं सदा दृष्टी घाली ॥७८॥

निजानंद आला जया निश्चयासी । निजानंद डोळा दिसे पूर्णज्यासी ॥

सदापूर्ण जोरे निजानंदवासी । निजानंद नाहीं कदाभिन्न त्यासी ॥७९॥

परस्थान ठेऊनिया संतपायीं । निघाला स्वयें मोक्ष पंथासिपाहीं ॥

परंधाम तोपावला मुक्त झाला । श्रुती बोलती जन्म नाही तयाला ॥१८०॥

महाशोक ज्याचे नि नामे पळाला । महामोह ज्याचे निसंगे जळाला ॥

महा बोध ज्याचे निबोधें मिळाला । स्मरा त्या तुह्मी सद्गुरु चिद्‌घनाला ॥१८१॥

जयाची दया मोह माया निवारी । जयाची तया शोक संताप हारी ॥

जयाची दया चिद्‌घना नंदकारी । स्मरा सद्गुरु तो तुह्मी निर्विकारी ॥८२॥

असो बद्ध अह्मी असा भाव नाहीं । असो मुक्त आह्मी असा भाव नाहीं ॥

जयाच्या मनी भाव काहींच नाहीं । जनी नांदतो तों स्वये राम पाही ॥८३॥

जनी राम पाहे वनी राम पाहे । मनी वीणया लोचनी राम पाहे ॥

असे सर्वदा जो धनी राम पाहे । तया आणि रामा असे भेद काय ॥८४॥

महा बोध देउनि जो भेद नाशी । सखा सद्गुरु तोचि विज्ञान राशी ॥

पदीं त्याचिया जो असे क्षेत्र वासी । नसे सर्वथा पार त्याच्या सुखासी ॥८५॥

जिता आपुला पूर्ण जो मृत्यु भोगी । श्रुतीच्या मतें तो चिरे पूर्ण योगी ॥

अस पूर्ण जोरे निजानंद योगी । सदा पूर्ण तो पूर्ण योगे वियोगी ॥८६॥

नये जाणता तेचि जाणोनि आता । दया पाणि तो ठेवी ऐसाचि माता ॥

समर्था तुते प्रार्थितो सर्व भावें । स्वभावेचि ते ते शिवे सौख्य द्यावे ॥८७॥

कळे देव तो देव पायी निवाला । कळे देव तो देव संगीच झाला ॥

कळे देव तो देव दुजाची नेणें । कळे देव तो देव मी हेचि जाणें ॥८८॥

श्रुतीसार विस्तारले सर्व श्रूती । असे जाणिजे नित्य मुक्ती महंती ॥

तया कारणें श्रूत मात्रासि तेकीं । तया स्मरती लीन होऊनि येकी ॥८९॥

महा कल्प गेले तही तीन मोडे । असा दीर्घ संसार ज्याचेनि मोडे ॥

तया देशिका देव रायासि भावे । विनादेश काले सदा आठवावें ॥१९०॥

जया चिंतता आटती दोषकोटी । जया भेटतां धावती देव भेटी ॥

तया सद्गुरु पाद पद्मींच राहे । तनु कैकटा माजि वैकुंठ लाहो ॥९१॥

मायागुणा पासुनि मुक्त व्हावे । नारायणाच्या स्वरुपी मिळावें ॥

ऐसा मनी आदर पूर्ण ज्यासी । तेणें भजावे गुरु चिद्‌घनासी ॥९२॥

ज्याच्या मनी ज्ञान समुद्र दाटे । पदोपदीं ज्यासी समाधि भेटे ॥

साधू कुळी तो निजभानु पाहीं । त्यावेगळा जानकि नाथ नाहीं ॥९३॥

यथार्थ जैसें मृगतोय नाहीं । निरंजनी विश्व तसेच पाही ॥

आता नको अन्य विच्यार कांहीं । आत्माचि तू होउनि पूर्ण राही ॥९४॥

त्दृत्पंकजी येउनी नित्य राहे । ऐसा मना एक उपाय आहे ॥

भावे धरावे गुरुपाय माथा । दयानिधी देखसि राम आता ॥९५॥

अत्यंत नाहीं नभपुष्प जैसे । समाधि काळीं जग सर्व तैसे ॥

कवी ह्मणे गुह्य किती वदावे । अद्यापि लोकासि नव्हेचि ठावे ॥९६॥

भवार्णवा माजि तरावयासि । आलो तुझे पाय धरावयासि ॥

दयाळ तूं आत्म प्रकाशि मूर्ती । वानू किती पावन पाद कीर्ती ॥९७॥

दया करी दास करी धरी रे । माया हरी पूर्ण सुखी करि रे ॥

दावी हरी एक निरंतरी रे । परोपरी तूं मज उद्धरी रे ॥९८॥

दया मनी पूर्ण दया करी रे । हाती धरी सर्व क्रिया हरी रे ॥

निरंतरी अद्वय बोध सारी । ठेवूनिया संकट सर्व वारी ॥९९॥

अत्यंत हा काळ सुकाळ झाला । गिळावया लागुनि आजि आला ॥

पावे दयाळा निजमोक्ष द्यावे । या दुर्जना पासोनि सोडवावे ॥२००॥

 

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-12-16T21:07:36.2630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

unexpired discount

  • असमाप्तानातीत बट्टा 
RANDOM WORD

Did you know?

गंध का लावावे ? अधिक माहिती द्यावी.
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site